पुण्यात लॉकडाऊन वाढवला, वाचा नवीन नियमावली

पुणे: केंद्र आणि राज्य सरकारपाठोपाठ महापालिकेनेही शहरात मॉल्स आणि शॉपिंग मार्केट उघडण्यास परवानगी दिली आहे. दि.5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत हे मॉल्स सुरू असतील. येथील सिनेमागृह आणि रेस्टॉरंट मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शुक्रवारी सायंकाळी याबाबतचे आदेश काढले आहेत.

या आदेशानुसार शहरातील लॉकडाऊनही दि.31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर, रात्रीची संचारबंदी रद्द करण्यात आली आहे. आता कंटेन्मेंट झोनमधील दुकाने सकाळी आणि सायंकाळी अशा दोन टप्प्यांत उघडली जाणार आहेत. तर गोल्फ, नेमबाजी, जिम्नॅस्टिक, मल्लखांब तसेच आऊटडोअर बॅटमिंटन खेळण्यास मान्यता देण्यात आली आहे. व्यापाऱ्यांसाठी तयार केलेला पी-1 पी-2 नियम बंद करण्याबाबत या आदेशात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच दुकानांसाठी या पूर्वीचेच नियम कायम असणार आहेत.


दुचाकीवर डबल सीटला मुभा

पालिका आयुक्तांनी नव्याने काढलेल्या आदेशानुसार, आता दुचाकीवर दोघांना प्रवास करता येणार आहे. या व्यक्‍तींना मास्क वापरणे बंधनकारक असेल, तर चालकाला हेल्मेट सक्तीचे असेल. चारचाकीत चालकासह तीन जणांना, टॅक्‍सी, कॅबमध्ये चालकासह 3 जण, रिक्षात वाहकासह 2 जणांना प्रवासाला मुभा देण्यात आली आहे.


प्रतिबंधित क्षेत्रांत 2 वेळा उघडणार दुकाने

प्रतिबंधित क्षेत्रांत सध्या अत्यावश्‍यक सेवांची दुकाने सुरू राहणार असून, त्यासाठी सकाळी 8 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 6 अशी वेळ देण्यात आली. तर दवाखाने आणि औषध विक्रीच्या दुकानांसाठी नियमित वेळ असणार आहे.


सर्व बांधकामे सुरू राहणार

बांधकामांच्या सर्व ठिकाणे (खासगी तसेच शासकीय) ज्यांना परवानगी देण्यात आली आहे, ती सुरू राहणार आहेत. तसेच पावसाळ्यापूर्वीच्या ज्या कामांना परवानगी दिली आहे, ती कामेही सुरूच राहणार आहेत.


यांना बंदीच…

– 65 वर्षांवरील व्यक्ती, 10 वर्षाखालील मुलांना घराबाहेर पडण्यास मनाई
– नाट्यगृहे, सांस्कृतिक केंद्र, सभागृहे
– शाळा, महाविद्यालय तसेच इतर शैक्षणिक संस्था
– सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, जलतरण तलाव, जीम, स्पा
– चित्रपटगृहे, हॉटेल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा, मुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबई : मराठा(Maratha) समाजाच्या आरक्षणासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांसोबत राज्यपालांची(Governor) भेट घेतली. केंद्र व राष्ट्रपतींना (Presidents)विनंती करण्यासाठी राज्यपालांची भेट

Read More »
rickshaw-drivers-Start-Jugaad-Ambulance

पुण्यात रुग्णांसाठी धावून आली ‘जुगाड अँब्युलन्स’

पुणे, कोरोनाच्या वाढत्या भयानक परिस्थितीमुळे आरोग्य (Health)यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. एकीकडे ऑक्सिजनची(Oxygen) कमी आहे. तर दुसरेकडे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सची(Ambulance) व्यवस्था करणेही

Read More »
Kali Mati

‘काळी माती’ चित्रपटाला 135 दिवसांत 159 विक्रमी पुरस्कार

हेमंतकुमार (Hemantkumar)महाले दिग्दर्शित-निर्मित काळी माती या चित्रपटाने (Cinema)केवळ 135 दिवसांत (Days)159 पुरस्कारांवर (Awards) मोहोर उमटवली आहे. हा एक प्रकारचा जागतिक विक्रम असल्याचा दावा यावेळी दिग्दर्शक

Read More »
Mucormycosis

विदर्भात म्युकरमायकोसीस आजाराचा शिरकाव

अमरावती : राज्यात कोरोनाचा(corona) कहर किंचित प्रमाणात कमी होताना दिसत आहे. म्हणून काही दिवसात राज्याला दिलासा मिळेल अशी आशा असतानाच एका वेगळ्या आजाराने पुन्हा डोके वर

Read More »
infections in children

पुण्यात लहान मुलांना सर्वाधिक कोरोनाची लागण

पुणे : कोरोनाच्या(Corona) तिसर्‍या लाटेमुळे लहान मुलांमध्ये संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज्यातील काही बालरोग

Read More »

कोंढव्यातील दोन बड्या बेकायदेशीर इमारती होणार जमिनदोस्त

पुणे,  कोंढवा (Kondwa) परिसरात क्लोवर हायलॅंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून (Clover Highlands Cooperative Society) बांधलेल्या दोन 22 मजली इमारती जमिनदोस्त करण्याचा आदेश पुणे सिव्हील कोर्टाकडून (Civil Court)

Read More »