शिरूरचे आजी-माजी खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार?

मुंबई,  शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. या पार्श्वभूमीवर स्वत: आढळराव पाटील यांनी फेसबुवकर पोस्ट लिहीत खुलासा केला आहे. तसंच राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचाही चांगलाच समाचार घेतला आहे.

दुसरीकडे, अमोल कोल्हे यांच्याही भाजप प्रवेशाबाबत वृत्तपत्रातील बातमीचा फोटो व्हायरल करून त्यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. ‘राष्ट्रवादीतील चार आमदारांनी अमोल कोल्हे यांना हैराण केल्याने ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.’

शिरूर मतदारसंघातील या दोन्ही नेत्यांचे समर्थक एकमेकांच्या नेतृत्वाबद्दल भाजप प्रवेशाची बातमी शेअर करून टीका करत असल्याने मतदारसंघात चांगलाच गोंधळ उडाला.

शिवाजी आढळराव आणि अमोल कोल्हे आमने-सामने

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे हे शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव यांचा पराभव करत जायंट किलर ठरले. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत राज्यात सत्तास्थापन केली. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांचे गणित बदलले आहे. नेमक्या याच कारणामुळे आढळराव पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची एक बातमी मतदारसंघात व्हायरल केली जात आहे. मात्र आता ही बातमी खोडून काढत आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर घणाघात केला आहे.

‘ज्यांनी विनोदाची सुरुवात केली अशांवर त्यांचेच विनोद उलटल्यावर त्यांना सहनही होत नाही अन त्रागाही करता येत नाही. मग सुरू होते आभाराची भाषा! करमणूक अनं कल्पनाविस्तारात रमण्यापेक्षा मोठ्या विश्वासानं लोकांनी सोपविलेली जबाबदारी पार पाडावी म्हणजे जनतेत हसं होणार नाही. माझ्याविषयी खोटी माहिती पसरवून शिरूर लोकसभेतील जनतेला तुम्ही मूर्ख बनवू शकत नाही,’ अशी फेसबुक पोस्ट लिहित आढळराव यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात व्हायरल होत असलेल्या बातमी शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याने त्यांनी अभिनेत्री कंगना रणौत हिच्यावर टीका केली नसल्याचं म्हटलं आहे. मात्र आढळराव यांनी स्वत: एक ब्लॉग लिहित कंगनावर निशाणा साधला आहे. हा ब्लॉग त्यांनी सोशल मीडियावरही शेअर केलेला आहे.

“कृतघ्नतेचा आजार जडलेली कंगना!” या शीर्षकाखाली लिहिलेल्या ब्लॉगमध्ये आढळराव पाटील यांनी कंगनाच्या टीकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिरूरमधील या दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक युद्धामुळे मतदारसंघातील वातावरण ढवळून निघालं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा, मुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबई : मराठा(Maratha) समाजाच्या आरक्षणासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांसोबत राज्यपालांची(Governor) भेट घेतली. केंद्र व राष्ट्रपतींना (Presidents)विनंती करण्यासाठी राज्यपालांची भेट

Read More »
rickshaw-drivers-Start-Jugaad-Ambulance

पुण्यात रुग्णांसाठी धावून आली ‘जुगाड अँब्युलन्स’

पुणे, कोरोनाच्या वाढत्या भयानक परिस्थितीमुळे आरोग्य (Health)यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. एकीकडे ऑक्सिजनची(Oxygen) कमी आहे. तर दुसरेकडे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सची(Ambulance) व्यवस्था करणेही

Read More »
Kali Mati

‘काळी माती’ चित्रपटाला 135 दिवसांत 159 विक्रमी पुरस्कार

हेमंतकुमार (Hemantkumar)महाले दिग्दर्शित-निर्मित काळी माती या चित्रपटाने (Cinema)केवळ 135 दिवसांत (Days)159 पुरस्कारांवर (Awards) मोहोर उमटवली आहे. हा एक प्रकारचा जागतिक विक्रम असल्याचा दावा यावेळी दिग्दर्शक

Read More »
Mucormycosis

विदर्भात म्युकरमायकोसीस आजाराचा शिरकाव

अमरावती : राज्यात कोरोनाचा(corona) कहर किंचित प्रमाणात कमी होताना दिसत आहे. म्हणून काही दिवसात राज्याला दिलासा मिळेल अशी आशा असतानाच एका वेगळ्या आजाराने पुन्हा डोके वर

Read More »
infections in children

पुण्यात लहान मुलांना सर्वाधिक कोरोनाची लागण

पुणे : कोरोनाच्या(Corona) तिसर्‍या लाटेमुळे लहान मुलांमध्ये संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज्यातील काही बालरोग

Read More »

कोंढव्यातील दोन बड्या बेकायदेशीर इमारती होणार जमिनदोस्त

पुणे,  कोंढवा (Kondwa) परिसरात क्लोवर हायलॅंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून (Clover Highlands Cooperative Society) बांधलेल्या दोन 22 मजली इमारती जमिनदोस्त करण्याचा आदेश पुणे सिव्हील कोर्टाकडून (Civil Court)

Read More »