पुण्यात २६० किमीचे रस्ते, १९० पूल उद्ध्वस्त भोरला सर्वाधिक फटका, नुकसानीचा आकडा समोर

अशोक बालगुडे

पुणे,पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान आता समोर येत आहे. अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील केवळ रस्ते आणि पुलांचे 55 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकसानीचा हा अंदाज वर्तवला आहे. भोर तालुक्याला सर्वाधिक फटका असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील रस्ते आणि लहान मोठे पूल मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले असून, वाहतुकीचा पुरता खेळखंडोबा झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील तब्बल 260 किलो मीटरचे रस्ते आणि 190 पुलांना पुराचा फटका बसला. महापुरामुळे रस्ते आणि पूल वाहून गेले. त्यामुळे त्यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल 55 कोटी 49 लाख रुपयांचा निधी लागणार असल्याचा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तवला आहे.

जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालं आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक फटका भोर तालुक्यातील रस्ते आणि पुलांना बसला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राथमिक अहवाल तयार केला आहे. यामध्ये तब्बल 260 किलोमीटरचे रस्ते आणि 190 पुलांचे नुकसान झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

कोणत्या तालुक्यात किती नुकसान?
मुळशी 29.76 किलोमीटरचे रस्ते, 47 पूल
भोर 117.85 किलोमीटरचे रस्ते, 33 पूल
वेल्हा 34.47 किलोमीटरचे रस्ते, 16 पूल
जुन्नर 27.32 किलोमीटरचे रस्ते, 35 पूल
आंबेगाव 24 किलोमीटरचे रस्ते, 31 पूल
मावळ 18.35 किलोमीटरचे रस्ते, 16 पूल
खेड 8. 2 किलोमीटरचे रस्ते 12 पूल
एकूण 260.25 किलोमीटरचे रस्ते, 190 पूल

पुण्यात शेतीचं नुकसान

पुण्यात शेतीचे प्रचंड नुकसान पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे व शेत पिके आणि जमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजन देशमुख यांनी या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्यात आपत्ती व्यवस्थापनाचा मुंबई पॅटर्न

यंदाच्या अतिमुसळधार पावसामुळे राज्यभरात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता पुणे महानगरपालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग अद्ययावत करण्यात येईल. हवामानात होत असलेल्या बदलामुळे अचानक मोठा पाऊस, नाले, नद्यांना पूर आल्याने जिल्ह्यात बिकट परिस्थिती निर्माण होते. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुण्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारली जाईल, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

वापरलेल्या घातक खाद्यतेलांचा काळाबाजार , अन्नसाखळीत पुनर्प्रवेशाची शक्यता .

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्विक फूड डिलीव्हरी चेन आणि फूड बिझनेस ऑपरेटर यांनी टाकलेले तेल अनेक वेळा अनियंत्रित बाजारातील भेसळखोरांद्वारा ब्लिचिंग करून आणि ताज्या तेलामध्ये भेसळ म्हणून

Read More »
agralekh

शासनाच्या सहाय्यक योजना नक्कीच दिलासा देणाऱ्या ठरोत

पीएम केअर फॉर चिल्ड्रन या योजनेअंतर्गत कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या मुलांचे भवितव्य अधांतरी राहूनये यासाठी दर महिन्याला केंद्र सरकारने मदत देण्याची योजना आखली. त्याच प्रमाणे

Read More »

“इंजिनिअर्स जगत असतात , प्रत्येक कल्पक क्षण – 60X60X7X 24”

नुकताच “इंजिनीअर्स डे” जगभर साजरा झाला.सकाळपासून ढीगभर शूभेच्छा फिरत होत्या.कांहीं उपहासात्मक जोक्स पण येत होते.असे वाटले की आजचा दिवस खरं म्हणजे आपला मानाचा दिवस आहे.सकाळी

Read More »
agralekh

लाखोंचा पोशिंदा जगाला तर आपण जगू हे ध्यानात घेऊ या

आपण थांबलो, कारागीर थांबला, कष्टकरी थांबला, उद्योगधंद्यात मंदी आली अशा कितीतरी गोष्टींवर कोरोनामुळे मंदावल्या/थाबल्या हे सर्वांना माहीत आहे. स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेकांनी विविध मार्ग

Read More »

“मेरे अपने” …

मी सोलापूर येथे 1980 साली मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला शिकत होतो.भरपूर खेळणे जास्त करून क्रिकेट ग्राऊंडवर असणे ,खूप पिक्चर पाहणे, हॉस्टेल मधील बेफिकीर धम्माल

Read More »

शाळा उघडण्यासाठी आंदोलन का करत नाही सामान्यजनांची हाक- आता तरी… गरिबांच्या मुलांसाठी शाळा उघडा

अशोक बालगुडे पुणे, प्रतिनिधी“आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो. तितकेच महत्त्व शिक्षण प्रसार यांना दिले पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय आपल्याला माऱ्यांच्या जागा काबीज करता येणार नाहीत

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place