नमस्कार !

आदरणीय वाचक,

सर्वप्रथम आपण श्रीनाथ पब्लिकेशनच्या “विसभा .कॉम ”च्या या ऑनलाईन न्यूज पोर्टल’ला भेट दिल्याबद्दल आपले मनस्वी आभार…!

“विसभा .कॉम” हे “डिजिटल इंडिया” संकल्पनेतील ऑनलाईन न्यूज पोर्टल असून, ते आपणासमोर सादर करताना आम्हाला अत्यानंद झाला आहे. “व्यवसाय नाही, सेवा म्हणून सुरु केलेले हे न्यूज पोर्टल” प्रामुख्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक ताज्या घडामोडीसह, सर्व प्रकारच्या लहान मोठ्या, लोकांची गरज असलेल्या, वाचकांची मागणी असलेल्या, मोठ्या समस्येपासून लहानात लहान समस्येसह, तळागाळातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंतच्या, त्यांच्या उपक्रमांच्या बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी तसेच, त्यांना न्याय देण्यासाठी सुरु केले आहे. एकूणच वाचकांच्या सर्व प्रकारच्या समस्या बातम्यांमधून सोडवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे.
. “विसभा .कॉम ” मध्ये फक्त वाचल्या जाणाऱ्या बातम्या नसून, आवश्यक तेथे व्हिडीओ न्यूज देखिल आहेत. त्याचबरोबर व्हिडीओ मुलाखती, वाचकांना बातमी कशी वाटली त्याबाबत बातम्यांवर प्रतिक्रिया देण्यासाठी बातमीखाली जागा (कमेंट बॉक्स), लाईक / डीस-लाईक, आपल्या पसंतीची बातमी शोधण्यासाठी सोपे सर्च इंजिन आणि आपल्याला आवडलेली बातमी सोशल मिडीयावर (उदा: फेसबुक, ट्विटर, व्हाटस अॅप) शेअर करण्यासाठी बातमीशेजारीच आयकॉन देखिल अंतर्भूत करण्यात आले आहेत.

आम्ही नगरसेवक, इच्छूक उमेदवार यांचे स्वतंत्र पेज देत आहोत. त्यामध्ये त्यांची सर्व माहिती, त्यांनी केलेली कामे याचा समावेश आहे.