अजित पवारांनी विचारलं झाडाचं नाव; वन अधिकाऱ्यांची बोलती बंद

पुणे , प्रतिनिधी
वनविभागामध्ये जास्तीत जास्त आयुर्वेदिक देशी झाडांची लागवड व्हायला हवी. याच बरोबर झाडांचे काळजीपूर्वक जतन होणे गरजेचे आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, वन अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वृक्षारोपण करण्याची विनंती केली. वृक्षारोपण करण्यासाठी जात असताना पवारांनी अचानक एका झाडाकडे इशारा करत नाव विचारले, बराच वेळ कुणालाच उत्तर देता आले नाही. तेवढ्यात एका अधिकाऱ्याने झाडाच्या नावांचा उल्लेख करत वेळ मारुन नेली.


वानवडीमध्ये वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १६ जुलै २०२१) सकाळी करण्यात आले. याप्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, प्रधान मुख्य वनसंरक्षक साईप्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक, वाय.एल.पी.राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक (प्रा.) पुणे वनवृत्तचे सुजय दोडल, पुणे (प्रा.) वनविभागाचे उपवनसंरक्षक राहूल पाटील, सहायक वनसंरक्षक पुण्याचे आशुतोष शेंडगे, पुण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, वरिष्ठ पोलीस निरिक्षक दीपक लगड, माजी महापौर वैशाली बनकर, नगरसेविका रत्नप्रभा जगताप यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

वृक्षांची माहिती नसलेले वनाधिकारी…
वन अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वृक्षारोपण करण्याची विनंती केली. वृक्षारोपण करण्यासाठी जात असताना पवारांनी अचानक एका झाडाकडे इशारा करत नाव विचारले, बराच वेळ कुणालाच उत्तर देता आले नाही. तेवढ्यात एका अधिकाऱ्याने झाडाच्या नावांचा उल्लेख करत वेळ मारुन नेली. मात्र, वन अधिकाऱ्यांनाच झाडाचे नाव सांगता येईना, ही बाब निश्चितच उपस्थितांना खटकली. वनअधिकारी म्हणवितात आणि त्यांना झाडांची नावे माहित नाहीत, यांना वनाधिकारी का म्हणायचे अशी चर्चा पाठीमागे थांबलेल्या मंडळींमध्ये सुरू होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट यांच्या वतीने 300 लोकांना पुरेल एवढं राशन

हडपसर, ” कारोना पाठोपाठ आलेल्या निसर्गाच्या प्रकोपाला पुन्हा एकदा पुण्यातील डॉक्टर पुढे सरसावले आहेत यामध्ये पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट ,पुणे यांच्या

Read More »

आश्रमशाळेतील इ. 8 वी ते 12 वी चे वर्ग 2 ऑगस्ट पासून होणार सुरु

नाशिक, ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.            कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार

Read More »
agralekh

प्रशासनाचा वृद्धांसाठी स्वतंत्र कक्ष दिलासा देणारा ठरावा

पूर्वी म्हातापणाची काठी म्हणून मुलांकडे पाहिले जात होते. काळ बदलला, एकत्र कुटुंब पध्दत जावून काळच्या गरजेनुसार विभक्त कुटुंब पध्दतीचा स्विकार केला गेला. तर काही कुटुंबात

Read More »

हडपसर-सासवड रस्त्यावर दुचाकी-ट्रकच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

पुणे, प्रतिनिधीहडपसर-सासवड रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरून ट्रकखाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंतरवाडीजवळील हॉटेलसमोर शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) रोजी झाला. ट्रकचालकाला ताब्यात

Read More »

‘या’ शाळेत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने मैत्रीदिन साजरा

पुणे, प्रतिनिधी आपल्या देशात रोज कोणता ना कोणता दिन ‘खास’ दिन म्हणून साजरा केला जातो. आज अमका दिन उद्या फलाणा दिन सरकारतर्फे किंवा खासगीरीत्या साजरा

Read More »

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची कर्जमुक्ती व वीजबिल माफी हवेत- विठ्ठल पवार राजे

नवी दिल्ली,केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती आणि वीजबिलमाफीची घोषणा केवळ राजकीय फायद्यासाठी केली होती. त्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे,

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place