रुग्णांना बेड, एका क्लिकवर मिळेल माहिती….

पुणे, कोरोना बाधित रुग्णाला बेड मिळवणं अत्यंत अवघड जात आहे. रुग्णांच्या नातेवाईकांची ही गरज लक्षात घेऊन पुण्यातील दोघांनी एक आगळं वेगळं स्टार्ट अप सुरू केलं आहे. कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांच्या नातेवाईकांची मदत करण्यासाठी त्यांनी तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे.

त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील रिकाम्या बेड्सची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांची होणारी ससेहोलपट कमी होण्यास मदत होतं आहे. पुण्यातील 30 वर्षीय युवा उद्योजक चिन्मयी डुंबरे आणि त्यांचे सहकारी 38 वर्षीय आरिफ अमिरानी यांनी मिळून हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या स्टार्ट अपचं नाव इंडिया क्रिटिकल रिसोर्स नेटवर्क असं असून covidpune.com/reach या संकेतस्थळावर तुमच्या शहरातील रिकाम्या बेडबद्दलची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

युवा उद्योजक चिन्मयी डुंबरेनं तिच्या स्टार्टअपबद्दल माहिती देताना असं म्हटलं आहे की, ‘अशा प्रकारची सुविधा सरकारी यंत्रणांकडून देखील पुरवली जात आहे. पण त्यामधील माहिती अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीची आहे. त्यामुळे त्याचा वापर करणं नागरिकांना थोडं अवघड जात आहे. त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीनं नागरिकांना सहज वापरता येईल, अशा पद्धतीनं या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचबरोबर हे संकेतस्थळ स्थानिक भाषेतही उपलब्ध करू दिलं आहे.

हे वाचा-कोरोना संसर्गाने अशक्त झाला तर या टीप्स वापरुन बरे व्हाल !

सध्या हे संकेतस्थळ आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातील एकूण 11 शहरातील रिकाम्या बेडची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पुणे, नाशिक, नागपूर, राजकोट, दिल्ली, सुरत, अहमदाबाद, बीड, गांधीनगर, बंगळुरू आणि वडोदरा या शहरातील विविध सरकारी आणि खाजगी रुग्णालये या वेब साइटशी जोडून घेण्यात आली आहे. या रुग्णालयातील उपलब्ध बेड्ससोबतचं रुग्णालयाचा पत्ता आणि फोन नंबर देखील उपलब्ध करून दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा, मुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबई : मराठा(Maratha) समाजाच्या आरक्षणासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांसोबत राज्यपालांची(Governor) भेट घेतली. केंद्र व राष्ट्रपतींना (Presidents)विनंती करण्यासाठी राज्यपालांची भेट

Read More »
rickshaw-drivers-Start-Jugaad-Ambulance

पुण्यात रुग्णांसाठी धावून आली ‘जुगाड अँब्युलन्स’

पुणे, कोरोनाच्या वाढत्या भयानक परिस्थितीमुळे आरोग्य (Health)यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. एकीकडे ऑक्सिजनची(Oxygen) कमी आहे. तर दुसरेकडे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सची(Ambulance) व्यवस्था करणेही

Read More »
Kali Mati

‘काळी माती’ चित्रपटाला 135 दिवसांत 159 विक्रमी पुरस्कार

हेमंतकुमार (Hemantkumar)महाले दिग्दर्शित-निर्मित काळी माती या चित्रपटाने (Cinema)केवळ 135 दिवसांत (Days)159 पुरस्कारांवर (Awards) मोहोर उमटवली आहे. हा एक प्रकारचा जागतिक विक्रम असल्याचा दावा यावेळी दिग्दर्शक

Read More »
Mucormycosis

विदर्भात म्युकरमायकोसीस आजाराचा शिरकाव

अमरावती : राज्यात कोरोनाचा(corona) कहर किंचित प्रमाणात कमी होताना दिसत आहे. म्हणून काही दिवसात राज्याला दिलासा मिळेल अशी आशा असतानाच एका वेगळ्या आजाराने पुन्हा डोके वर

Read More »
infections in children

पुण्यात लहान मुलांना सर्वाधिक कोरोनाची लागण

पुणे : कोरोनाच्या(Corona) तिसर्‍या लाटेमुळे लहान मुलांमध्ये संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज्यातील काही बालरोग

Read More »

कोंढव्यातील दोन बड्या बेकायदेशीर इमारती होणार जमिनदोस्त

पुणे,  कोंढवा (Kondwa) परिसरात क्लोवर हायलॅंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून (Clover Highlands Cooperative Society) बांधलेल्या दोन 22 मजली इमारती जमिनदोस्त करण्याचा आदेश पुणे सिव्हील कोर्टाकडून (Civil Court)

Read More »