भाजप नगरसेवकाची अरेरावी, महिला आरोग्य अधिकाऱ्यावर गेले धावून

पुणे, पुण्यातील भाजप नगरसेवक धनराज घोगरे हे सहायक आरोग्य महिला अधिकाऱ्यावरच धावून गेल्याची घटना घडली आहे. धनराज घोगरे यांनी अरेरावी केल्यामुळे महिल्या अधिकाऱ्याला रडू कोसळले आहे. या घटनेचा ऑडिओ व्हायरल झाला आहे.

नगरसेवक धनराज घोगरे यांनी सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांच्याकडे नवीन लसीकरण केंद्राच्या परवानगीबाबत विचारणा केली होती. याबद्दल ते पाठपुरावा करण्यासाठी वैशाली जाधव यांच्याकडे गेले होते. त्यावेळी धनराज घोगरे आणि डॉ. वैशाली जाधव यांच्यात नवीन लसीकरण केंद्राच्या परवानगीवरून आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्या दालनातच प्रचंड वाद झाला. यावेळी नगरसेवक घोगरे यांनी महिला डॉ. वैशाली जाधव यांच्यावर अरेरावी केली.

‘दहा तास तुमचा मोबाईल बंद आहे, तुम्ही नीट काम करत नाही. दोन दिवस झाले तुमच्याकडे कागद मागत आहे. घरचे काम असल्यासारखे करत आहात, हे तुमच्या घरचे काम नाही, आयता पगार घेता तुम्ही’ असं धनराज घोगरे यांनी वैशाली जाधव यांना म्हणत असल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये समोर आलं आहे.

वैशाली जाधव यांनी ‘आपण एका महिला अधिकाऱ्याशी बोलताय, तुम्ही कसं बोलताय ते आधी पाहा, आम्ही काही घरची काम करत नाही. गेल्या वर्षभरापासून इथं काम करतोय’ असं म्हणत असताना रडू कोसळले आणि त्यांचा संताप अनावर झाला. वैशाली जाधव यांच्या घरातील चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. यात चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीही वैशाली जाधव या कामावर हजर होत्या.

डॉ. वैशाली जाधव या लसीकरण विभागाच्या प्रमुख आहेत. दहा दिवसांपूर्वीच लसीकरणाचा चार्ज डॉ. वैशाली जाधव यांच्याकडे सोपवला गेला आहे. प्रत्येक नगरसेवकाला स्वत:च्या वार्डात लसीकरण केंद्र हवे आहे. त्यातूनच हा प्रकार घडला आहे. परंतु,  नगरसेवकाच्या अशा  दमदाटीमुळे अधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.  नगरसेवक घोगरे यांच्या दमदाटीमुळे डॉक्टरांनी काम बंदचा पवित्रा घेतला होता.

दरम्यान, हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि लाजीरवाणा आहे. वैशाली जाधव यांनी कोरोनाच्या काळात अत्यंत उत्तम काम केले आहे. भाजप नगरसेवकाने त्यांच्या अंगावर धावून जाणे हा अत्यंत लाजीरवाणा प्रकार आहे, ही घटना घडल्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी 2 तास अधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात आली होती. जर तुमच्या पक्षाचा नगरसेवक अधिकाऱ्यांवर अशी मुजोरी करत असेल तर त्याच्यावर कारवाई करावी,

– प्रशांत जगताप

माजी महापौर,पुणे

1 thought on “भाजप नगरसेवकाची अरेरावी, महिला आरोग्य अधिकाऱ्यावर गेले धावून”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा, मुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबई : मराठा(Maratha) समाजाच्या आरक्षणासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांसोबत राज्यपालांची(Governor) भेट घेतली. केंद्र व राष्ट्रपतींना (Presidents)विनंती करण्यासाठी राज्यपालांची भेट

Read More »
rickshaw-drivers-Start-Jugaad-Ambulance

पुण्यात रुग्णांसाठी धावून आली ‘जुगाड अँब्युलन्स’

पुणे, कोरोनाच्या वाढत्या भयानक परिस्थितीमुळे आरोग्य (Health)यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. एकीकडे ऑक्सिजनची(Oxygen) कमी आहे. तर दुसरेकडे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सची(Ambulance) व्यवस्था करणेही

Read More »
Kali Mati

‘काळी माती’ चित्रपटाला 135 दिवसांत 159 विक्रमी पुरस्कार

हेमंतकुमार (Hemantkumar)महाले दिग्दर्शित-निर्मित काळी माती या चित्रपटाने (Cinema)केवळ 135 दिवसांत (Days)159 पुरस्कारांवर (Awards) मोहोर उमटवली आहे. हा एक प्रकारचा जागतिक विक्रम असल्याचा दावा यावेळी दिग्दर्शक

Read More »
Mucormycosis

विदर्भात म्युकरमायकोसीस आजाराचा शिरकाव

अमरावती : राज्यात कोरोनाचा(corona) कहर किंचित प्रमाणात कमी होताना दिसत आहे. म्हणून काही दिवसात राज्याला दिलासा मिळेल अशी आशा असतानाच एका वेगळ्या आजाराने पुन्हा डोके वर

Read More »
infections in children

पुण्यात लहान मुलांना सर्वाधिक कोरोनाची लागण

पुणे : कोरोनाच्या(Corona) तिसर्‍या लाटेमुळे लहान मुलांमध्ये संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज्यातील काही बालरोग

Read More »

कोंढव्यातील दोन बड्या बेकायदेशीर इमारती होणार जमिनदोस्त

पुणे,  कोंढवा (Kondwa) परिसरात क्लोवर हायलॅंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून (Clover Highlands Cooperative Society) बांधलेल्या दोन 22 मजली इमारती जमिनदोस्त करण्याचा आदेश पुणे सिव्हील कोर्टाकडून (Civil Court)

Read More »