लस देण्याचा पूर्ण अधिकार केंद्राकडे – अजित पवार

पुणे : जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने काळजी घेत आहोत. आपण तयारी करतोय. मात्र, लस कमी पडत असल्याने लसीकरणाला थोडी खीळ बसत आहे. केंद्र सरकारने लस देण्याचा पूर्ण अधिकार आपल्या हाती घेतला आहे, अशी टीका करत लसीचे उत्पादन लक्षात घेता परदेशातील लस ही आपल्याकडे आयात करता येतील का, याबाबत विचार सुरु आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

हिरक महोत्सवी वर्ष असूनही कोरोनामुळे आपण साजरे करु शकलो नाही, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.  सुरुवातीला तयार होणारी लस दुसऱ्या देशात देण्याची गरज नव्हती. त्यामुळे आपल्याला लसींची कमतरता भासली नसती, असे माझे स्पष्ट मत आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरणाचा सुरुवात करायचा निर्णय घेतला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
5 कोटी 71 लाख, म्हणजे 6 कोटी साधारण संख्या होती. यासाठी एक रकमी पैसे भरण्याचे आमचे नियोजन होते. लस देण्याचा पूर्ण अधिकार केंद्राने हाती घेतलाय आहे. भारत बायोटेक कडे ही आपण प्रयत्न करतोय,  आजच्या दिवशी फक्त 3 लाख लसचे डोस मिळाले. त्यात पुण्याला 20 हजार मिळतील. दुर्गम भागात ऑनलाईन नोंदणीची अडचण येते. -तरुणांना आणि ज्येष्ठाना लस कुठे दिली जाईल याची नियोजन करावे लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीसीद्वारे सगळ्यांना सूचना दिल्या आहेत. त्याचे पालन करावे लागले, असे ते म्हणाले.

 कुंभमेळा आणि सार्वत्रिक निवडणुका यामुळे इतर राज्यातही कोरोना बधितांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, राज्यात ऑक्सिजन किंवा रेमडेसिवीरचा पुरवठा कमी होणार नाही याची काळजी घेत आहोत. 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला, साखळी तोडण्यासाठी शेवट चा उपाय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय. टेस्टिंगच्या संख्येपेक्षा डिस्चार्ज ची संख्या जास्त असेल तर बेड्सची कमतरता भासणार नाही.

लसीचे उत्पादन लक्षात घेता परदेशात तील लस ही आपल्याकडे आयात करता येतील का याबाबत विचार सुरु आहे. या अनुभवातून भारत सरकार आणि वेगवेगळे राज्य ही सरकार ही शिकलेत. लसींचा पुरवठा कमी असल्याने 18 ते 44 वयोगटासाठी 3 लाख लस आली, त्यात पुणे जिल्ह्याला केवळ 20 हजार मिळाली आपल्यापेक्षा मुंबईला अधिक आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे जेव्हा रेमडेसिवीरचा चार्ज आल्यापासून परिस्थिती सुधारली आहे, असे अजित पवार म्हणाले.

1 thought on “लस देण्याचा पूर्ण अधिकार केंद्राकडे – अजित पवार”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा, मुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबई : मराठा(Maratha) समाजाच्या आरक्षणासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांसोबत राज्यपालांची(Governor) भेट घेतली. केंद्र व राष्ट्रपतींना (Presidents)विनंती करण्यासाठी राज्यपालांची भेट

Read More »
rickshaw-drivers-Start-Jugaad-Ambulance

पुण्यात रुग्णांसाठी धावून आली ‘जुगाड अँब्युलन्स’

पुणे, कोरोनाच्या वाढत्या भयानक परिस्थितीमुळे आरोग्य (Health)यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. एकीकडे ऑक्सिजनची(Oxygen) कमी आहे. तर दुसरेकडे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सची(Ambulance) व्यवस्था करणेही

Read More »
Kali Mati

‘काळी माती’ चित्रपटाला 135 दिवसांत 159 विक्रमी पुरस्कार

हेमंतकुमार (Hemantkumar)महाले दिग्दर्शित-निर्मित काळी माती या चित्रपटाने (Cinema)केवळ 135 दिवसांत (Days)159 पुरस्कारांवर (Awards) मोहोर उमटवली आहे. हा एक प्रकारचा जागतिक विक्रम असल्याचा दावा यावेळी दिग्दर्शक

Read More »
Mucormycosis

विदर्भात म्युकरमायकोसीस आजाराचा शिरकाव

अमरावती : राज्यात कोरोनाचा(corona) कहर किंचित प्रमाणात कमी होताना दिसत आहे. म्हणून काही दिवसात राज्याला दिलासा मिळेल अशी आशा असतानाच एका वेगळ्या आजाराने पुन्हा डोके वर

Read More »
infections in children

पुण्यात लहान मुलांना सर्वाधिक कोरोनाची लागण

पुणे : कोरोनाच्या(Corona) तिसर्‍या लाटेमुळे लहान मुलांमध्ये संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज्यातील काही बालरोग

Read More »

कोंढव्यातील दोन बड्या बेकायदेशीर इमारती होणार जमिनदोस्त

पुणे,  कोंढवा (Kondwa) परिसरात क्लोवर हायलॅंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून (Clover Highlands Cooperative Society) बांधलेल्या दोन 22 मजली इमारती जमिनदोस्त करण्याचा आदेश पुणे सिव्हील कोर्टाकडून (Civil Court)

Read More »