शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची कर्जमुक्ती व वीजबिल माफी हवेत- विठ्ठल पवार राजे

नवी दिल्ली,
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती आणि वीजबिलमाफीची घोषणा केवळ राजकीय फायद्यासाठी केली होती. त्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे, असे स्पष्ट मत शरद जोशी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते विठ्ठल पवार राजे यांनी व्यक्त केले.

पवार म्हणाले की, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची २९ जुलै रोजी भेट घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व वीजबिल माफी, शेतमालाला हमी भाव, पिक संरक्षण याविषयीचे कायदे मान्य करावेत. शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत. १२६ संघटनेची मदर संस्था, राष्ट्रीय किसान समन्वय समितीचे पाचही राष्ट्रीय प्रतीनिधींना नविन कृषी कायद्याबाबत चर्चेसाठी बोलावावे, असे सांगितले. याप्रसंगी संघटनेचे नाँर्थ विभागप्रमुख कमलजीत सिंह राणावत उपस्थित होते.

भारतातील शेतातील कामे मनरेगांतर्गत ९० दिवस काम दिले पाहिजे. २००५ अॅक्ट त्यातील आर्टिकल ६ नुसार कायद्याने बंधनकारक करावे, ९० दिवस दिलेल्या मजूरी कामामध्ये २००५ अॅक्ट व आर्टिकल ६ मधील तरतुदी मनरेगांतर्गत शेतीकामाला जोड दिली पाहिजे. त्यामुळे शेतीच्या खर्चामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. उत्पादनाच्या खर्चामध्ये कपात होऊन शेतकऱ्यां दोन पैसे जास्तीचे मिळतील, अशा आशयाचे निवेदन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिल्ली येथे दिले. याप्रसंगी संघटनेचे कायदेशीर कमलजीत सिंह राणावत, दिल्ली चे अध्यक्ष जे पी चौधरी, हरियाणा च्या अध्यक्षा राजबाला शर्मा, युपी च्या अध्यक्षा सुषमा बजाज, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कृषिमंत्री तोमर यांच्याकडे शेती पिककर्ज, विमा, शेतीकर्ज, वीजबिल माफी, शेतमालाला ग्यारेंटी हमीभाव, पिक हमी, पिक संरक्षण शेतीशी निगडित थेट उद्योग-व्यवसाय या संदर्भात चर्चा करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

1 thought on “शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची कर्जमुक्ती व वीजबिल माफी हवेत- विठ्ठल पवार राजे”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

वापरलेल्या घातक खाद्यतेलांचा काळाबाजार , अन्नसाखळीत पुनर्प्रवेशाची शक्यता .

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्विक फूड डिलीव्हरी चेन आणि फूड बिझनेस ऑपरेटर यांनी टाकलेले तेल अनेक वेळा अनियंत्रित बाजारातील भेसळखोरांद्वारा ब्लिचिंग करून आणि ताज्या तेलामध्ये भेसळ म्हणून

Read More »
agralekh

शासनाच्या सहाय्यक योजना नक्कीच दिलासा देणाऱ्या ठरोत

पीएम केअर फॉर चिल्ड्रन या योजनेअंतर्गत कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या मुलांचे भवितव्य अधांतरी राहूनये यासाठी दर महिन्याला केंद्र सरकारने मदत देण्याची योजना आखली. त्याच प्रमाणे

Read More »

“इंजिनिअर्स जगत असतात , प्रत्येक कल्पक क्षण – 60X60X7X 24”

नुकताच “इंजिनीअर्स डे” जगभर साजरा झाला.सकाळपासून ढीगभर शूभेच्छा फिरत होत्या.कांहीं उपहासात्मक जोक्स पण येत होते.असे वाटले की आजचा दिवस खरं म्हणजे आपला मानाचा दिवस आहे.सकाळी

Read More »
agralekh

लाखोंचा पोशिंदा जगाला तर आपण जगू हे ध्यानात घेऊ या

आपण थांबलो, कारागीर थांबला, कष्टकरी थांबला, उद्योगधंद्यात मंदी आली अशा कितीतरी गोष्टींवर कोरोनामुळे मंदावल्या/थाबल्या हे सर्वांना माहीत आहे. स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेकांनी विविध मार्ग

Read More »

“मेरे अपने” …

मी सोलापूर येथे 1980 साली मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला शिकत होतो.भरपूर खेळणे जास्त करून क्रिकेट ग्राऊंडवर असणे ,खूप पिक्चर पाहणे, हॉस्टेल मधील बेफिकीर धम्माल

Read More »

शाळा उघडण्यासाठी आंदोलन का करत नाही सामान्यजनांची हाक- आता तरी… गरिबांच्या मुलांसाठी शाळा उघडा

अशोक बालगुडे पुणे, प्रतिनिधी“आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो. तितकेच महत्त्व शिक्षण प्रसार यांना दिले पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय आपल्याला माऱ्यांच्या जागा काबीज करता येणार नाहीत

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place