महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढवणार- शहराध्यक्ष रमेश बागवे

अशोक बालगुडे

पुणे, प्रतिनिधी

महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे. शहर झोपडपट्टीमुक्त करण्याची काँग्रेसची योजना आहे. मॅरेथॉन, नॅशनल गेम, कॉमनवेल, क्रीडानगरी म्हणून पुणे शहराला नावलौकिक मिळवून दिला, त्यातून शहराच्याच नव्हे, तर देशाच्या विकासासाठी काँग्रेसचे मोठे योगदान आहे. मागिल काही वर्षांत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कमी पडलो, मात्र आता ती चूक होणार नाही. भाजपने खोटा प्रचार करून कुटील नीती वापरून फोडाफोडीचे राजकारण केले. त्यामुळे काँग्रेसला फटका बसला. मात्र, आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली नेतेमंडळी, कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक, माजी आमदार आता पुन्हा जोमाने कार्यकर्ते कामाला लागले. काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता, त्याची आर्थिक परिस्थिती कमी असली तरी, त्याने लोकांना विश्वास मिळविला आहे, त्याला ताकद देऊन त्याची निवड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून केली जाणार आहे, असे माजी गृहराज्यमंत्री आणि शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.

मंडई विद्यापीठ कट्टाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांनी विचारांची देवाण-घेवाण चर्चासत्रामध्ये काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री व शहराध्यक्ष रमेश बागवे, पुणे महानगरपालिका गटनेते आबा बागुल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांना आमंत्रित केले होते. यावेळी महापालिका निवडणुका आणि काँग्रेसची रणनीती या विषयावर साधण्यात आला.

बागवे म्हणाले की, पालिकेमध्ये ज्या ठेकेदार काळ्या यादीमध्ये आहे, त्यालाच पुन्हा काम दिले जात आहे. मागिल पाच वर्षांमध्ये ५८ प्रोजेक्ट कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले आहे, ते नागरिकांना पुराव्यानिशी दाखवून देणार आहोत. पुण्याचा विकास कोणी केला आणि भ्रष्टाचार कोणी केला ही बाब नागरिकांपुढे मांडणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

आबा बागुल म्हणाले की, काँग्रेसला प्रचंड मोठे नेतृत्व आहे. मात्र, काँग्रेस आपसातच वाद घालत आहेत. स्थानिक पातळीवर किंवा वरिष्ठांकडून आदेश येतात, त्यामुळे स्थानिकांवर अन्याय होतो, त्यामुळे मंडळी दुखावली जातात. कार्यकर्त्यांची निवड करताना काही निकष लावण्याची गरज आहे. काँग्रेस सामान्यांना न्याय देणारा आणि पुरोगामी विचारांचा पक्ष आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसच सत्तेवर येईल. महापालिकेमध्ये गावे समाविष्ट केले आहे, त्यांचे गावपणही टिकविण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

अभय छाजेड म्हणाले की, शहरातील रस्ते रुंदीकरण्याचे काम काँग्रेसने केले. पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठ्याची योजना राबविली. नदीसुधार योजना मोठ्या प्रमाणात राबविली. शहरवासियांना सुविधा देण्यासाठी बीआरटी आणली, त्यावेळी याच सत्ताधाऱ्यांनी विरोध केला होता. मेट्रोचे नियोजनही काँग्रेसनेच केले, त्याचे श्रेय सत्ताधारी घेऊ पाहत आहे, हे दुर्दैव आहे, काँग्रेस विचारांचा पक्ष आहे, काँग्रेसच्या विचारधारा असणाऱ्या कार्यकर्त्याला येत्या निवडणुकीमध्ये प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

संजय बालगुडे म्हणाले की, भाजपला जनाधार नव्हता, शिवसेनेमुळे भाजप वाढला. स्मार्ट सिटीविरोधात मी कोर्टात न्याय मागितला आहे. १४ प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली, त्यातील एकही प्रकल्प पूर्ण झाला नाही. नदी सुधार योजनेसाठी ९२७ कोटी आणले. त्याचे जगभर होर्डिंग्ज लावले, प्रत्यक्षात काही कामे झाली नाहीत, असा त्यांनी आरोप केला.

मंडई विद्यापीठ कट्टाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे म्हणाले की, विद्येच्या माहेरघरामध्ये पुणे शहरातील मान्यवरांच्या विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणारी ही कट्टा संस्कृती आहे. आज या कट्ट्यावर शहरातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले होते. येत्या काळात एक एक करून सर्व प्रमुख पक्षाना आम्ही कट्टावर आमंत्रित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

वापरलेल्या घातक खाद्यतेलांचा काळाबाजार , अन्नसाखळीत पुनर्प्रवेशाची शक्यता .

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्विक फूड डिलीव्हरी चेन आणि फूड बिझनेस ऑपरेटर यांनी टाकलेले तेल अनेक वेळा अनियंत्रित बाजारातील भेसळखोरांद्वारा ब्लिचिंग करून आणि ताज्या तेलामध्ये भेसळ म्हणून

Read More »
agralekh

शासनाच्या सहाय्यक योजना नक्कीच दिलासा देणाऱ्या ठरोत

पीएम केअर फॉर चिल्ड्रन या योजनेअंतर्गत कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या मुलांचे भवितव्य अधांतरी राहूनये यासाठी दर महिन्याला केंद्र सरकारने मदत देण्याची योजना आखली. त्याच प्रमाणे

Read More »

“इंजिनिअर्स जगत असतात , प्रत्येक कल्पक क्षण – 60X60X7X 24”

नुकताच “इंजिनीअर्स डे” जगभर साजरा झाला.सकाळपासून ढीगभर शूभेच्छा फिरत होत्या.कांहीं उपहासात्मक जोक्स पण येत होते.असे वाटले की आजचा दिवस खरं म्हणजे आपला मानाचा दिवस आहे.सकाळी

Read More »
agralekh

लाखोंचा पोशिंदा जगाला तर आपण जगू हे ध्यानात घेऊ या

आपण थांबलो, कारागीर थांबला, कष्टकरी थांबला, उद्योगधंद्यात मंदी आली अशा कितीतरी गोष्टींवर कोरोनामुळे मंदावल्या/थाबल्या हे सर्वांना माहीत आहे. स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेकांनी विविध मार्ग

Read More »

“मेरे अपने” …

मी सोलापूर येथे 1980 साली मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला शिकत होतो.भरपूर खेळणे जास्त करून क्रिकेट ग्राऊंडवर असणे ,खूप पिक्चर पाहणे, हॉस्टेल मधील बेफिकीर धम्माल

Read More »

शाळा उघडण्यासाठी आंदोलन का करत नाही सामान्यजनांची हाक- आता तरी… गरिबांच्या मुलांसाठी शाळा उघडा

अशोक बालगुडे पुणे, प्रतिनिधी“आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो. तितकेच महत्त्व शिक्षण प्रसार यांना दिले पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय आपल्याला माऱ्यांच्या जागा काबीज करता येणार नाहीत

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place