पुण्यात आज लसीकरण बंद

पुणे, पुण्यात (Pune) आज लसीकरणच होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. लशीचा साठा नसल्यामुळे पुण्यातील सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहे.

पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मिनी लॉकडाऊन लावण्यात आला होता. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर राज्य सरकारने भर दिला आहे. पण आता पुण्यातच लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. पुण्यातील 150 लसीकरण केंद्र आज बंद राहणार आहे. लसीकरणाचा पहिला डोस घेण्यासाठी आलेल्या लोकांना आज साठा नसल्यामुळे लस मिळणार नाही. ज्या लोकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाणार होता, त्यांच्यासाठीच लसीकरण सुरू आहे. त्यामुळे नव्याने लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना लसीकरण केंद्रावरून माघारी परतावे लागणार आहे.

राज्य सरकारकडून लशीचा साठा पुरवण्यात आला होता. पण त्याचा साठाही आता संपला आहे. त्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. पुण्यापाठोपाठ मुंबईत सुद्धा लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ आली आहे. मुंबईतील बिकेसी केंद्रावरील लशीचा साठा संपला आहे. त्यामुळे ज्या लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. त्यांना मेसेज करून न येण्याची माहिती दिली जात आहे.

लसीकरण राज्सात योग्य वेळेत व्हावे, यासाठी वेगळे खास विभाग सुरू करण्याचा शासनाचा विचार आहे. जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर हा विभाग काम करणार आहे.  राज्यात साधरण ५ कोटी ७१ लाख नागरिक १८ ते ४५ वयोगटात आहे. राज्य शासन या वयोगटातील लोकांना साधरण जास्तीत जास्त 6 महिन्यात संपूर्ण लसीकरण करण्साचा विचारत असल्याचे समजते, या समन्वय यासाठी खास वेगळे खाते असते त्याच धर्तीवर विभाग करून त्यास अधिकार द्यावा का यावर आज कॅबिनेट बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

नोंद घ्यावी अशी सिल्व्हर क्रेस्ट स्कूल मधील ऑनलाईन शिक्षण पद्धत

सध्या अचानक उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून शाळा बंद आहेत.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचणं कठीण झालंय.पण हे जरी खरं असलं तरी शासनाने वेळीच राबवलेल्या online

Read More »
agralekh

वेळचं नाही-अग्रलेख

संभ्रमात पडलात ना ! वेळच नाही हे छोटेखानी वाक्य एकूण, अहो अशीच काहींशी परिस्थिती सध्या चालू आहे. कामात व्यस्त असणारे आणि नसणारी मंडळी सुद्धा सर्रास

Read More »

बारावीच्या विद्यार्थ्यांची गणिताची भीती दूर व्हावी- प्रा. बोराडे

पुणे ः प्रतिनिधी बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये गणिती संकल्पना रुजावी, तसेच गणित संज्ञा स्पष्ट होऊन गणित विषयाची भीती दूर होऊन आवड निर्माण झाली पाहिजे. प्रश्नमंजुषाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील

Read More »

थोपटेवाडी येथे बैलगाडा शर्यती प्रकरणी पोलिसांची कारवाई

नीरा , थोपटेवाडी (ता.पुरंदर ) येथे एका माळरानावर बेकायदा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी यावर कारवाई करून दहा बैलगाडे व बारा मोटार सायकल

Read More »

पायी वारीबाबत वारकऱ्यांच्या आशा पल्लवीत

पुणे : प्रतिनिधीकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी शासन सांगेल, त्या संख्येत संपूर्ण पायी व्हावी, अशी अद्यापही वारकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, यंदाही राज्य सरकारने वाहनांनी त्या

Read More »