गेम’ करण्याआधीच सुपारी किलर हत्यारासह ‘जेरबंद’, कोंढवा पोलिसांची कारवाई- खूनाच्या सुपारीचा डाव फसला

पुणे ः प्रतिनिधी
भाजपच्या माजी नगरसेवकाने त्याच्यावर झालेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी दोन सुपारी किलरला खुनाची सुपारी दिली होती. मात्र, गेम करण्याआधीच सुपारी कीलर हत्यारासह पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन माजी नगरसेवकाच्या कृत्याचा पर्दाफाश झाला आहे. या माजी नगरसेवकावर सन 2016 मध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी गोळीवार करण्यात आला होता.

राजन जॉन राजमनी (वय 38, रा.भाग्योदय नगर, कोंढवा), इब्राहिम उर्फ हुसेन याकुब शेख (वय 27, रा काळा खडक वाकड,पिंपरी-चिंचवड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, पुणे कॅन्टोन्मेंटचे तत्कालीन उपाध्यक्ष व भाजपचे माजी नगरसेवक विवेक महादेव यादव यांनी कारागृहातून सुटलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदाराला आपला विरोधक बबलू गवळी याच्या खूनाची सुपारी दिली होती. गवळी हा येरवडा कारागृहात अंडरट्रायल असून, नुकताच कोविड रजेवर बाहेर आला आहे. या दोघा सुपारी किलरना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्यासंह नगरसेवक विवेक यादव तसेच मांडवली करून हत्यारे व रोकड पुरविणारा व्यक्ती अशा चौघांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अंगझडतीत त्यांच्याकडे मिळून आलेल्या मोबाईलची पाहणी केली. त्यामध्ये राजन याने व्हिके व व्हिके न्यू या नावाने सेव्ह असलेल्या दोन मोबाईल क्रमांकावर संशयास्पद संभाषण केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बर सय्यद व उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

आश्रमशाळेतील इ. 8 वी ते 12 वी चे वर्ग 2 ऑगस्ट पासून होणार सुरु

नाशिक, ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.            कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार

Read More »
agralekh

प्रशासनाचा वृद्धांसाठी स्वतंत्र कक्ष दिलासा देणारा ठरावा

पूर्वी म्हातापणाची काठी म्हणून मुलांकडे पाहिले जात होते. काळ बदलला, एकत्र कुटुंब पध्दत जावून काळच्या गरजेनुसार विभक्त कुटुंब पध्दतीचा स्विकार केला गेला. तर काही कुटुंबात

Read More »

हडपसर-सासवड रस्त्यावर दुचाकी-ट्रकच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

पुणे, प्रतिनिधीहडपसर-सासवड रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरून ट्रकखाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंतरवाडीजवळील हॉटेलसमोर शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) रोजी झाला. ट्रकचालकाला ताब्यात

Read More »

‘या’ शाळेत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने मैत्रीदिन साजरा

पुणे, प्रतिनिधी आपल्या देशात रोज कोणता ना कोणता दिन ‘खास’ दिन म्हणून साजरा केला जातो. आज अमका दिन उद्या फलाणा दिन सरकारतर्फे किंवा खासगीरीत्या साजरा

Read More »

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची कर्जमुक्ती व वीजबिल माफी हवेत- विठ्ठल पवार राजे

नवी दिल्ली,केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती आणि वीजबिलमाफीची घोषणा केवळ राजकीय फायद्यासाठी केली होती. त्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे,

Read More »

२०२२ मध्ये राष्ट्रवादीचा महापौर ; त्यासाठी समविचारी पक्ष आमच्या बरोबर : शहराध्यक्ष प्रशांत जगताप

पुणे, प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे महानगरपालिकेची निवडणूक सर्व प्रभागात स्वबळावर लढण्यासाठी ताकदीने उभी आहे. मात्र, राज्यात आम्ही महाविकास आघाडी म्हणून सत्तेत असल्याने सर्वप्रथम सत्ताधारी

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place