दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी श्रीनिवास रेड्डीला अटक

अमरावती,  वन अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. निलंबित अप्पर मुख्य प्रधान सचिव श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत RFO (परिक्षेत्र अधिकारी) दीपाली चव्हाण यांनी 25 मार्च रोजी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली होती.  मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्य जीव परीक्षेत्रात त्या गेल्या दीड वर्षापासून RFO (वनपरिक्षेत्र अधिकारी) या पदावर कार्यरत होत्या. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर तिची सुसाईड नोट पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी विनोद शिवकुमारला अटक केली होती.

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे DFO विनोद शिवकुमार यांच्यासह निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनीही अटक करण्यात यावी अशी मागणी जोर धरली होती. अखेर तपासाअंती धारणी पोलिसांनी श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. धारणी पोलिसांनी आज गुरुवारी पहाटे रेड्डी यांना अटक केली आहे.

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेतली होती. त्यानंतर मार्च महिन्यात या प्रकरणात मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आणि  अप्पर प्रधान सचिव श्रीनिवास रेड्डी यांना लेखी खुलासा आयोगाने मागावला होता. तसंच, पदावरून हटवण्यात आले होते. या प्रकरणी सर्वात आधी 25 मार्च रोजी DFO विनोद शिवकुमार यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा 306 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा, मुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबई : मराठा(Maratha) समाजाच्या आरक्षणासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांसोबत राज्यपालांची(Governor) भेट घेतली. केंद्र व राष्ट्रपतींना (Presidents)विनंती करण्यासाठी राज्यपालांची भेट

Read More »
rickshaw-drivers-Start-Jugaad-Ambulance

पुण्यात रुग्णांसाठी धावून आली ‘जुगाड अँब्युलन्स’

पुणे, कोरोनाच्या वाढत्या भयानक परिस्थितीमुळे आरोग्य (Health)यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. एकीकडे ऑक्सिजनची(Oxygen) कमी आहे. तर दुसरेकडे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सची(Ambulance) व्यवस्था करणेही

Read More »
Kali Mati

‘काळी माती’ चित्रपटाला 135 दिवसांत 159 विक्रमी पुरस्कार

हेमंतकुमार (Hemantkumar)महाले दिग्दर्शित-निर्मित काळी माती या चित्रपटाने (Cinema)केवळ 135 दिवसांत (Days)159 पुरस्कारांवर (Awards) मोहोर उमटवली आहे. हा एक प्रकारचा जागतिक विक्रम असल्याचा दावा यावेळी दिग्दर्शक

Read More »
Mucormycosis

विदर्भात म्युकरमायकोसीस आजाराचा शिरकाव

अमरावती : राज्यात कोरोनाचा(corona) कहर किंचित प्रमाणात कमी होताना दिसत आहे. म्हणून काही दिवसात राज्याला दिलासा मिळेल अशी आशा असतानाच एका वेगळ्या आजाराने पुन्हा डोके वर

Read More »
infections in children

पुण्यात लहान मुलांना सर्वाधिक कोरोनाची लागण

पुणे : कोरोनाच्या(Corona) तिसर्‍या लाटेमुळे लहान मुलांमध्ये संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज्यातील काही बालरोग

Read More »

कोंढव्यातील दोन बड्या बेकायदेशीर इमारती होणार जमिनदोस्त

पुणे,  कोंढवा (Kondwa) परिसरात क्लोवर हायलॅंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून (Clover Highlands Cooperative Society) बांधलेल्या दोन 22 मजली इमारती जमिनदोस्त करण्याचा आदेश पुणे सिव्हील कोर्टाकडून (Civil Court)

Read More »