दररोज सकाळी दोन खारीक आणि गुळ खाणे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी

पुणे : प्रतिनिधी
सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमध्ये आपण आरोग्यासाठी दुर्लक्ष करतो. यामुळे अगदी कमी वयातच आपल्याला विविध आजार होण्यास सुरूवात होते. जरी आपल्याला काही कामामुळे आरोग्यासाठी लक्ष देणे होत नसेल, तरीदेखील आपण खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. विशेष करून आपण दररोज सकाळी आपल्या आहारात दोन खारीक आणि गुळ घेतला पाहिजे. यामुळे अनेक आजार आपल्यापासून दूर राहण्यास मदत होते.

खारीकमध्ये अनेक प्रकारचे पौष्टीक घटक असतात. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. खारीकमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरी असते. ज्यामुळे आपल्याला दिवभराची ऊर्जा या दोन खारीकांमुळे मिळते. गुळात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅग्नेशियम या सारखे घटक आढळतात. विशेषतः गुळात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात.

आपल्या त्वचेसाठी जे नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करतात. हे घटक शरीराला आतून स्वच्छ ठेवून त्वचेला चमकदार बनवतात. त्याचबरोबर गुळ शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करतो. गूळ हा दमा आणि ब्राँकायटिसपासून बचाव करण्यासाठी मदत करते. ज्या लोकांना श्वसनासंबंधी काही त्रास असेल त्यांनी आवर्जुन गूळ खायला हवं. तिळ-गुळाचे लाडू खाणंही फायदेशीर ठरेल. गूळ खाल्ल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. गूळ हा पोटॅशिअमचा चांगला स्त्रोत आहे.

दूध आणि गुळ एकत्र करुन पिण्याचे देखील काही महत्वाचे फायदे आहेत. दुधात गूळ मिसळून पिल्यास शरिराच्या अनेक मुलभूत गरजा पूर्ण होतात. रोगप्रतिकारक शक्ति वाढवते, रक्त पुरवठा सुरळित होणे, थकवा दूर होतो, असे अनेक फायदे होतात. दुधात गुळ मिसळून पिल्यास रक्त स्वच्छ राहण्यास मदत होते. रक्तामध्ये गाठी तयार होणे, रक्त पुरवठ्याचा त्रास होणे, अशा समस्या कमी होतात. पचनक्रिया तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि कफ टाळण्यासाठी याचा फायदा होतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट यांच्या वतीने 300 लोकांना पुरेल एवढं राशन

हडपसर, ” कारोना पाठोपाठ आलेल्या निसर्गाच्या प्रकोपाला पुन्हा एकदा पुण्यातील डॉक्टर पुढे सरसावले आहेत यामध्ये पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट ,पुणे यांच्या

Read More »

आश्रमशाळेतील इ. 8 वी ते 12 वी चे वर्ग 2 ऑगस्ट पासून होणार सुरु

नाशिक, ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.            कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार

Read More »
agralekh

प्रशासनाचा वृद्धांसाठी स्वतंत्र कक्ष दिलासा देणारा ठरावा

पूर्वी म्हातापणाची काठी म्हणून मुलांकडे पाहिले जात होते. काळ बदलला, एकत्र कुटुंब पध्दत जावून काळच्या गरजेनुसार विभक्त कुटुंब पध्दतीचा स्विकार केला गेला. तर काही कुटुंबात

Read More »

हडपसर-सासवड रस्त्यावर दुचाकी-ट्रकच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

पुणे, प्रतिनिधीहडपसर-सासवड रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरून ट्रकखाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंतरवाडीजवळील हॉटेलसमोर शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) रोजी झाला. ट्रकचालकाला ताब्यात

Read More »

‘या’ शाळेत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने मैत्रीदिन साजरा

पुणे, प्रतिनिधी आपल्या देशात रोज कोणता ना कोणता दिन ‘खास’ दिन म्हणून साजरा केला जातो. आज अमका दिन उद्या फलाणा दिन सरकारतर्फे किंवा खासगीरीत्या साजरा

Read More »

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची कर्जमुक्ती व वीजबिल माफी हवेत- विठ्ठल पवार राजे

नवी दिल्ली,केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती आणि वीजबिलमाफीची घोषणा केवळ राजकीय फायद्यासाठी केली होती. त्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे,

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place