पालिकेत समाविष्ट अकरा गावांतील नागरिक मुलभूत सुविधांपासून कोसो दूरच

अशोक बालगुडे


पुणे : मागिल तीन वर्षांपूर्वी उपनगरालगतची अकरा गावे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली. शहरात आल्याने गावांचा कायापालट होईल, ही अपेक्षा होती. मात्र, त्यांना अद्याप मुलभूत सुविधाही मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. आजही टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने आमची ग्रामपंचायतच बरी होती, असे म्हणण्याची वेळ आल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा महापालिका हद्दीत नव्याने समावेश करण्यात आलेल्या २३ गावांमध्ये विकास होणार का, अशी विचारणा नागरिक करू लागले आहेत.

ऑक्टोबर २०२७ मध्ये महापालिका हद्दीमध्ये ११ गावांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर तीन वर्षांनंतरही या गावांचे खेडेपण कायम राहिले आहे. कागदोपत्री गावे स्मार्ट सिटी असलेल्या शहराचा भाग आहेत. पाणीपुरवठय़ाचे जाळे, सांडपाणी वाहिन्या आणि प्रकल्प, प्रशस्त रस्ते, प्राथमिक शिक्षण, आरोग्य, घन कचरा व्यवस्थापना आदी बाबबीत गावकऱ्यांना अद्यापही संघर्ष करावा लागत आहे. साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरूळी देवाची आणि केशवनगर या गावांमध्ये अद्यापही पाणीटंचाई आहे. पुण्याच्या पूर्व भागातील फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथे दर दिवसाआड पाणी येते, अशी नागरिकांची तक्रार आहे. विस्कळीत पाणीपुरवठय़ामुळे टँकरद्वारे महापालिकेला पाणीपुरवठा करावा लागत आहे. महापालिकेने येथे साठवणूक टाक्या उभारल्या आहेत, मात्र, त्याचा वापरच होत नसल्याचे चित्र येथे दिसून येते. लोहगांव, साडेसतरा नळी आणि उंड्री या गावांमध्ये विकासकामे झालेली नसून प्रशस्त रस्ते, आरोग्य केंद्रही येथे पुरेशा प्रमाणात नाहीत.


अकरा गावांचा महापालिका हद्दीत समावेश झाल्यानंतर सर्वागीण विकासाचा दावा करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर निधीचे कारण पुढे करण्यात आले. गावांच्या समावेशानंतर महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये सातत्याने तरतूद करण्यात आली. मात्र त्यातील दहा टक्के निधीही गावात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खर्ची पडलेला नाही. सन २०१७-१८ मध्ये १०० कोटींची तरतूद करण्यात आली. त्यानंतर २०१८-१९ मध्ये ३० कोटी तर सन २०१९-२० वर्षांसाठी ६५ कोटी रुपये तरतूद होती. चालू वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात आलेली नाही. यापूर्वी झालेली आर्थिक तरतूद शहरातील विविध कामांसाठी वापरण्यात आलेली आहे. त्यामुळे गावातील विकासाचा वेग संथ राहिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.


शहरालगतच्या सर्वच गावांमध्ये सर्वाधिक निवासीगृह प्रकल्पांची भाऊगर्दी होत आहे. मात्र, कचरा, सांडपाणी, पिण्याचे पाणी, रस्ते अशा मुलभूत सुविधांची मोठी समस्या आहे. मोकळ्या जागांमुळे या भागात मोठय़ा प्रमाणावर गृह प्रकल्प उभारले जात आहेत. मात्र रस्त्यांच्या अभावामुळे वाहतूक कोंडीही आंबेगावमध्ये पहायला मिळते. धायरी, उत्तमनगर भागात पर्यायी रस्ते, सेवा रस्तेही नाहीत. त्यामुळे गावांचा बकालपणा कायम राहिला आहे.
-राजाभाऊ होले, फुरसुंगी


फुरसुंगी परिसरात कचरा आणि पाणीपुरवठय़ाची मोठी समस्या आहे. कधी दिवसाआड पाणीपरवठा होतो. सध्या टँकरद्वारे ठिकठिकाणी ठेवलेल्या टाक्यांतून पाणीपुरवठा केला जात आहे. रस्ते, स्ट्रीट लाईटसह मुलभूत सुविधा अद्याप मिळत नाहीत.
– अॅड. अमोल कापरे, फुरसुंगी

आंबेगाव बुद्रुक आणि धायरी महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वीच मोठ्या नागरिकरण झाले आहे. शहरालगतचा परिसर असल्याने बांधकामे मोठय़ा प्रमाणावर होत आहेत. मात्र पायाभूत सुविधा कोसो दूर आहेत. नागरीकरण वाढल्याने वाहतूककोंडीचा सामना दररोज करावा लागत आहे.

– चंद्रकांत मोरे, कात्रज


पाणी, रस्ते, कचरा समस्या प्रकर्षाने जाणवतात, ग्रामपंचायत बरी म्हणण्याची वेळ

पिण्याच्या पाण्याची समस्या,
सांडपाणी वाहिन्यांचा अभाव
रस्ते विकसन रखडले
अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट
प्राथमिक शिक्षण, आरोग्य सुविधांची वानवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट यांच्या वतीने 300 लोकांना पुरेल एवढं राशन

हडपसर, ” कारोना पाठोपाठ आलेल्या निसर्गाच्या प्रकोपाला पुन्हा एकदा पुण्यातील डॉक्टर पुढे सरसावले आहेत यामध्ये पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट ,पुणे यांच्या

Read More »

आश्रमशाळेतील इ. 8 वी ते 12 वी चे वर्ग 2 ऑगस्ट पासून होणार सुरु

नाशिक, ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.            कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार

Read More »
agralekh

प्रशासनाचा वृद्धांसाठी स्वतंत्र कक्ष दिलासा देणारा ठरावा

पूर्वी म्हातापणाची काठी म्हणून मुलांकडे पाहिले जात होते. काळ बदलला, एकत्र कुटुंब पध्दत जावून काळच्या गरजेनुसार विभक्त कुटुंब पध्दतीचा स्विकार केला गेला. तर काही कुटुंबात

Read More »

हडपसर-सासवड रस्त्यावर दुचाकी-ट्रकच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

पुणे, प्रतिनिधीहडपसर-सासवड रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरून ट्रकखाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंतरवाडीजवळील हॉटेलसमोर शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) रोजी झाला. ट्रकचालकाला ताब्यात

Read More »

‘या’ शाळेत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने मैत्रीदिन साजरा

पुणे, प्रतिनिधी आपल्या देशात रोज कोणता ना कोणता दिन ‘खास’ दिन म्हणून साजरा केला जातो. आज अमका दिन उद्या फलाणा दिन सरकारतर्फे किंवा खासगीरीत्या साजरा

Read More »

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची कर्जमुक्ती व वीजबिल माफी हवेत- विठ्ठल पवार राजे

नवी दिल्ली,केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती आणि वीजबिलमाफीची घोषणा केवळ राजकीय फायद्यासाठी केली होती. त्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे,

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place