अपघातानंतर प्रत्येक क्षण रुग्णासाठी महत्त्वाचा-डॉ. संपत डुंबरे पाटील

अपघातानंतर प्रत्येक क्षण रुग्णासाठी महत्त्वाचा असतो. प्रथमोपचार करून त्याला जवळच्या डॉक्‍टरांकडे तातडीने नेऊन उपचार केला, तर संजीवनी देणारा काळ (गोल्डन अवर) ठरू शकतो. त्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. अलिकडे अद्ययावत वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली आहे, त्याचा उपयोग करण्यासाठी प्रत्येकाच्या सहभागाची गरज आहे,

अपघात ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. प्रत्येकजण मला काय त्याचे म्हणून बेफीकरपणे बगल देऊन निघून जातो. माणुसकीचा झरा आटत चालला आहे. रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढते असून, 2010 सालच्या सर्वेक्षणानुसार भारतामध्ये प्रत्येक तीन मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. एक वर्षामध्ये सुमारे दीड लाख मृत्यू व तीन लाख रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. हे प्रमाण पाहता 2015 साली ही आकडेवारी दोन लाख मृत्यू व तीन लाख पाच हजार दाखल होणाऱ्यांची संख्या असणार आहे. अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये 15 ते 45 वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे.

समाजातील सक्रीय घटकच यामध्ये बळी पडत आहे. त्याशिवाय अपघातामुळे कायमचे अपंगत्व आलेल्यांची संख्या वेगळीच असणार आहे. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. रुग्णालय म्हटले की आर्थिक बाजू आलीच, त्यामुळेही सामान्यांना अनेक अडचणी येत असल्याने ते रुग्णालयापर्यंतही पोहोचत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे.

अपघातातील मृत्यूचे तीन वर्गात विभाजन करता येईल.

पहिला वर्ग-

डोक्‍याला जबर मार लागला तर अपघातानंतर रुग्णाचा सेकंद वा मिनिटांनी मृत्यू होऊ शकतो. तसेच, हृदय अथवा रक्तवाहिन्यांना इजा झालेल्या व्यक्तींना उपचार कमी पडतात. अगदी रुग्णालयासमोर एखादा अपघात झाला, तरी रुग्ण रुग्णालयात पोहोचत नाही. अशा वर्गातील रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न महत्त्वाचा आहे. दुचाकीचालकांनी हेल्मेटचा वापर आणि चारकाची वाहनात बसल्यानंतर सीटबेल्ट वापरण्याची स्वतःच शिस्त लावून घेतली पाहिजे.

दुसरा वर्ग-

पोटात अथवा छातीत रक्तस्त्राव होणे, हाताच्या अथवा पायाच्या, कंबरेच्या हाडातून अतिरक्तस्त्राव झालेल्या रुग्णाचा मृत्यू काही मिनिटांपासून ते काही तासांमध्ये होऊ शकतो.

तिसरा वर्ग-

जंतूसंसर्ग होणे, रक्ताची गाठ हृदयात अथवा फुफ्फुसात अडकलेल्या रुग्णांचा मृत्यू काही दिवसांपासून आठवड्यात होऊ शकतो.

 • अपघातानंतर बघ्याची गर्दी बाजूला करून रुग्णाला वाहनातून वा रस्त्यावरून सुखरूप बाजूला घ्या.
 • रुग्णाला हलविताना मानेची हालचाल न करता अखंड शरीर उचलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण मानेच्या मणक्‍यामध्ये श्‍वसनाचे केंद्र असते व रुग्णाला हलविताना इजा झाल्यास श्‍वसन बंद होऊन रुग्ण दगावण्याची जास्त भीती असते.
 • अपघातग्रस्ताचे श्‍वसन चालू ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रुग्ण स्वतः श्‍वास घेत असल्यास मानेची कोणतीही हालचाल न करता त्याचे तोंड उघडे करावे. तोंडात काही वस्तू अडकली असल्यास अलगद ती बाहेर काढावी.
 • अपघातग्रत व्यक्तीला तातडीने पाणी पाजले जाते. मात्र, बेशुद्ध वा जबर जखमीला पाणी देऊ नये. कारण पाणी श्‍वासन नलिकेत जाऊन जीवावर बेतू शकते. पाणी प्यायला दिल्यामुळे तातडीच्या शस्त्रक्रियेत भूल देताना धोका पोहोचू शकतो.
 • काही गंभीर अपघातात हात अथवा पाय तुटतो किंवा जागेवर पडतो. अशा वेळी रुग्णाला जवळच्या रुग्णालयात नेताना तुटलेला भागसुद्धा बरोबर नेणे महत्त्वाचे आहे. कारण अलिकडे आधुनिक नव्या तंत्रज्ञानामुळे हात वा पाय जोडण्याच्या शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत.
 • तुटलेला अवयव हाताळताना स्वतःची काळजी घेणेही आवश्‍यक आहे. रक्ताने माखलेल्या भागाला सरळ हात न लावता रुमालाने अथवा स्वच्छ कपड्याने हाताळावे. कारण संक्रमीत होणाऱ्या आजारापासून तुमचा बचाव होऊ शकतो. तुटलेला अवयव शक्‍यअसल्यास प्लास्टिक पिशवीत घालून तातडीने रुग्णाबरोबर रुग्णालयात पाठवण्यास विसरू नये.

हे वाचा-

 • जखमेतून होणारा रक्तस्त्राव थांबविल्यास रुग्णाला जीवदान देणारेच ठरू शकतो. रक्तस्त्राव थांबविण्यासाठी रक्त जेथून वाहते तेथे रुमालाने दाबून धरणे महत्त्वाचे आहे.
 • रुग्णाला उपचारासाठी हलविताना काही मंडळींना अमूक रुग्णालयात नेण्याचा हट्ट धरू नये. कारण ते रुग्णालय जवळ नसते, त्यामुळे जवळ असलेल्या रुग्णालयात प्रथम उपचार करून नंतर हव्या रुग्णालयात हलवणे इष्ट ठरेल.
 • पोलिस अथवा ऍम्ब्युलन्सची वाट न पाहता उपलब्ध वाहनाने रुग्णाला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले, तर रुग्णासाठी गोल्डन अवर ठरू शकतो. त्यामुळे त्या व्यक्तींचे कायमचे अपंगत्व वाचू शकते.
 • उपचारासाठी रुग्णालये पाहताना सरकारी रुग्णालय असलेच पाहिजे असे काही नसते. प्रत्येक रुग्णालयाला तातडीने प्राथमिक उपचार करणे नैतिक व कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे प्रत्येकाने भीती, गैरसमज दूर ठेवून अपघातग्रस्तांना मदत केल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतील.
  • (शब्दांकन – अशोक बालगुडे)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा, मुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबई : मराठा(Maratha) समाजाच्या आरक्षणासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांसोबत राज्यपालांची(Governor) भेट घेतली. केंद्र व राष्ट्रपतींना (Presidents)विनंती करण्यासाठी राज्यपालांची भेट

Read More »
rickshaw-drivers-Start-Jugaad-Ambulance

पुण्यात रुग्णांसाठी धावून आली ‘जुगाड अँब्युलन्स’

पुणे, कोरोनाच्या वाढत्या भयानक परिस्थितीमुळे आरोग्य (Health)यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. एकीकडे ऑक्सिजनची(Oxygen) कमी आहे. तर दुसरेकडे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सची(Ambulance) व्यवस्था करणेही

Read More »
Kali Mati

‘काळी माती’ चित्रपटाला 135 दिवसांत 159 विक्रमी पुरस्कार

हेमंतकुमार (Hemantkumar)महाले दिग्दर्शित-निर्मित काळी माती या चित्रपटाने (Cinema)केवळ 135 दिवसांत (Days)159 पुरस्कारांवर (Awards) मोहोर उमटवली आहे. हा एक प्रकारचा जागतिक विक्रम असल्याचा दावा यावेळी दिग्दर्शक

Read More »
Mucormycosis

विदर्भात म्युकरमायकोसीस आजाराचा शिरकाव

अमरावती : राज्यात कोरोनाचा(corona) कहर किंचित प्रमाणात कमी होताना दिसत आहे. म्हणून काही दिवसात राज्याला दिलासा मिळेल अशी आशा असतानाच एका वेगळ्या आजाराने पुन्हा डोके वर

Read More »
infections in children

पुण्यात लहान मुलांना सर्वाधिक कोरोनाची लागण

पुणे : कोरोनाच्या(Corona) तिसर्‍या लाटेमुळे लहान मुलांमध्ये संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज्यातील काही बालरोग

Read More »

कोंढव्यातील दोन बड्या बेकायदेशीर इमारती होणार जमिनदोस्त

पुणे,  कोंढवा (Kondwa) परिसरात क्लोवर हायलॅंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून (Clover Highlands Cooperative Society) बांधलेल्या दोन 22 मजली इमारती जमिनदोस्त करण्याचा आदेश पुणे सिव्हील कोर्टाकडून (Civil Court)

Read More »