उद्धव ठाकरे दीड वर्षाने घराबाहेर पडले याचा आनंद..

पुणे – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आपण हवाई पाहणी नाही तर जमिनीवरून दौरा केला असे सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांचे पाय जमिनीवर आले. याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कधी नव्हे ते बाहेर पडले आहेत.सरकार आल्यापासून उद्धव ठाकरे यांचे पाय जमिनीपासून वर गेले होते ते जमिनीवर आहेत .याचा आनंद आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी केली. ते पुण्यात बोलत होते.

पुण्यात पाटील यांच्या हस्ते लोककलावंतांना शिधा वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोघे सभागृहातील विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे त्यांनी कोकणात नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून आढावा घेतला. दोघांनी जमिनीवरून प्रवास केला, हवाई पाहणी केली नाही. पंतप्रधान हे असे पद आहे यांच्याबाबत धोका पत्करणे अवघड असते. त्यांची सुरक्षा महत्वाची आहे. अधिकाधिक पाहणी करण्यासाठी पंतप्रधानाना हवाई पाहणी करण्यास सुचवले जात असते, अशी परंपरा आहे. इंदिरा गांधीही असेच करत होत्या. टीकाटिप्पणी करताना काही तरी इतिहासाचे ज्ञान पाहिजे अशी टीका पाटील यांनी केली.

पंतप्रधानांनी महाराष्ट्राबाबत कुठलाही दुजाभाव केलेला नाही, उगाच वावड्या आणि चर्चा केल्या जातात. महाराष्ट्र्त हवाई पाहणी करण्यासाठी अनुकूल वातावरण नसल्याचे हवामान विभागाने सांगितल्याने पंतप्रधान महाराष्ट्रात आले नाहीत. त्यांनी गुजरातची पाहणी केली असे पाटील यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधानांनी फक्त गुजरातसाठी नाही तर सर्वांसाठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारला पंचनामे अहवाल लवकर सादर करा मी मदत देईल, असे पंतप्रधानांनी सांगितले असे पाटील म्हणाले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट यांच्या वतीने 300 लोकांना पुरेल एवढं राशन

हडपसर, ” कारोना पाठोपाठ आलेल्या निसर्गाच्या प्रकोपाला पुन्हा एकदा पुण्यातील डॉक्टर पुढे सरसावले आहेत यामध्ये पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट ,पुणे यांच्या

Read More »

आश्रमशाळेतील इ. 8 वी ते 12 वी चे वर्ग 2 ऑगस्ट पासून होणार सुरु

नाशिक, ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.            कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार

Read More »
agralekh

प्रशासनाचा वृद्धांसाठी स्वतंत्र कक्ष दिलासा देणारा ठरावा

पूर्वी म्हातापणाची काठी म्हणून मुलांकडे पाहिले जात होते. काळ बदलला, एकत्र कुटुंब पध्दत जावून काळच्या गरजेनुसार विभक्त कुटुंब पध्दतीचा स्विकार केला गेला. तर काही कुटुंबात

Read More »

हडपसर-सासवड रस्त्यावर दुचाकी-ट्रकच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

पुणे, प्रतिनिधीहडपसर-सासवड रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरून ट्रकखाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंतरवाडीजवळील हॉटेलसमोर शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) रोजी झाला. ट्रकचालकाला ताब्यात

Read More »

‘या’ शाळेत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने मैत्रीदिन साजरा

पुणे, प्रतिनिधी आपल्या देशात रोज कोणता ना कोणता दिन ‘खास’ दिन म्हणून साजरा केला जातो. आज अमका दिन उद्या फलाणा दिन सरकारतर्फे किंवा खासगीरीत्या साजरा

Read More »

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची कर्जमुक्ती व वीजबिल माफी हवेत- विठ्ठल पवार राजे

नवी दिल्ली,केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती आणि वीजबिलमाफीची घोषणा केवळ राजकीय फायद्यासाठी केली होती. त्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे,

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place