कठीण प्रसंगामधील मदत देते जगण्याची उमेद- मोहिनी मोहिते


पुणे: प्रतिनिधी
नैसर्गिक आपत्ती कठीण प्रसंगामध्ये मूठभर धान्य आणि उबदार कपडेरूपी मदत जगण्याची नवी उमेद मिळवून देते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी उभा महाराष्ट्र धावून जातो, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे कितीही मोठे संकट आले, तरी दुःखाचा डोंगर कोसळलेल्या मंडळींना जगण्याची नवी उमेद मिळते, असे मत पत्रकार व संकल्प फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा मोहिनी मोहिते यांनी व्यक्त केले.

भवानी पेठेतील (कासेवाडी) संकल्प फाउंडेशनच्या वतीने रत्नागिरी (चिपळूण) येथील पूरग्रस्तांसाठी धान्य, कपडे आदी साहित्य जमा केल्याची माहिती मोहिनी मोहिते यांनी दिली. याप्रसंगी संस्थापक राजेश गाडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोविंद जाधव, निखील आरणे, विजय मोहिते, किरण शिंदे, नितीन वायदंडे, गौतम वानखेडे, रफिक शेख, अमित पांडे, राहुल कांबळे, अनिल कदम, विजय जगताप, शैलेंद्र म्हेत्रे, भुपेंद्र शेंडगे, विजय जगताप, विशाल ठाकूर, जितेंद्र गायकवाड, विजय चव्हाण, प्रीतम परदेशी, शतुल नाडे, अमर पाटोळे आदी उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष गोविंद जाधव म्हणाले की, मागिल दीड वर्षांपासून कोरोना महामारीमध्ये सामान्यांचे जनजीवन कोलमडले आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यांना आज मदतीची गरज आहे. एकाच वेळी गर्दी करून पुन्हा रोगराईला आमंत्रण दिले जाणार नाही, याचीही दक्षता घेतली पाहिजे. कोरोनाचे नियम पाळत आपल्याला मदत करायची आहे, याचे भान राखणे गरजेचे आहे, चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूरूपी मदत थेट घरोघरी जाऊन दिली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, संस्थापक अध्यक्ष राजेश गाडे यांनी सांगितले की, चिपळूणमधील पूरग्रस्त भागामधील नागरिकांना घरोघरी जाऊन मदत दिली जाणार आहे. यामध्ये गहू, तांदूळ, बिस्कीट, मेणबत्ती, कपडे, पाणी बॉटल असे साहित्य आहे. ज्यांना पूरग्रस्तांसाठी मदत करावयाची आहे, त्यांनी भवानी पेठेतील संकल्प फाउंडेशनमध्ये आणून द्यावी, ती थेट पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

वापरलेल्या घातक खाद्यतेलांचा काळाबाजार , अन्नसाखळीत पुनर्प्रवेशाची शक्यता .

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्विक फूड डिलीव्हरी चेन आणि फूड बिझनेस ऑपरेटर यांनी टाकलेले तेल अनेक वेळा अनियंत्रित बाजारातील भेसळखोरांद्वारा ब्लिचिंग करून आणि ताज्या तेलामध्ये भेसळ म्हणून

Read More »
agralekh

शासनाच्या सहाय्यक योजना नक्कीच दिलासा देणाऱ्या ठरोत

पीएम केअर फॉर चिल्ड्रन या योजनेअंतर्गत कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या मुलांचे भवितव्य अधांतरी राहूनये यासाठी दर महिन्याला केंद्र सरकारने मदत देण्याची योजना आखली. त्याच प्रमाणे

Read More »

“इंजिनिअर्स जगत असतात , प्रत्येक कल्पक क्षण – 60X60X7X 24”

नुकताच “इंजिनीअर्स डे” जगभर साजरा झाला.सकाळपासून ढीगभर शूभेच्छा फिरत होत्या.कांहीं उपहासात्मक जोक्स पण येत होते.असे वाटले की आजचा दिवस खरं म्हणजे आपला मानाचा दिवस आहे.सकाळी

Read More »
agralekh

लाखोंचा पोशिंदा जगाला तर आपण जगू हे ध्यानात घेऊ या

आपण थांबलो, कारागीर थांबला, कष्टकरी थांबला, उद्योगधंद्यात मंदी आली अशा कितीतरी गोष्टींवर कोरोनामुळे मंदावल्या/थाबल्या हे सर्वांना माहीत आहे. स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेकांनी विविध मार्ग

Read More »

“मेरे अपने” …

मी सोलापूर येथे 1980 साली मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला शिकत होतो.भरपूर खेळणे जास्त करून क्रिकेट ग्राऊंडवर असणे ,खूप पिक्चर पाहणे, हॉस्टेल मधील बेफिकीर धम्माल

Read More »

शाळा उघडण्यासाठी आंदोलन का करत नाही सामान्यजनांची हाक- आता तरी… गरिबांच्या मुलांसाठी शाळा उघडा

अशोक बालगुडे पुणे, प्रतिनिधी“आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो. तितकेच महत्त्व शिक्षण प्रसार यांना दिले पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय आपल्याला माऱ्यांच्या जागा काबीज करता येणार नाहीत

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place