अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षा कशी आहे.

पुणे : प्रतिनिधी
राज्यात इयत्ता अकरावी प्रवेशासाठी प्रथमच प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना सीईटीसाठी (CET) 20 जुलै ते 26 जुलै या कालावधीत परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल. तर सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेतली जाईल. इंग्रजी, गणित (भाग 1 व 2), विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग 1 व 2) सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या प्रत्येक घटकावर प्रत्येकी 25 गुणांचे एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) विचारले जाणार आहेत.

कोरोना महामारीमुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी विषयनिहाय 25 टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला असून या अभ्यासक्रमावर सीईटीमध्ये प्रश्न विचारले जातील. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी सीईटीसाठी परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, सीबीएसईसह इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी 178 रुपये शुल्क भरावे लागेल.

  • अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशी असेल?
  • अकरावीची प्रवेशासाठी CET परीक्षा
  • इयत्ता 11 वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षा
  • प्रवेश परीक्षेत राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न
  • गुण – 100
  • बहुपर्यायी प्रश्न
  • परीक्षा OMR पद्धतीने
  • परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी
  • कॉलेजमध्ये प्रवेशाचे निकष काय?
  • CET परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश
  • CET परीक्षा देणाऱ्यांना 11 वी प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य
  • त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश
  • CET परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इयत्ता 10 वीच्या पद्धतीनुसार
  • सीबीएसई बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार?

सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आता संपणार आहे. सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

सीबीएसईंनं तयार केलेल्या 20+80 या फॉर्म्यल्यानुसार दहावीचा निकाल जाहीर होई.ल प्रत्येक विषयामध्ये विद्यार्थ्यांचे 100 गुणांचा मूल्यांकन केले जाईल. या मधील 20 गुण पहिल्या पद्धतीप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनावर दिले जातील. तर 80 गुण नव्या धोरणानुसार दिले जातील. यामध्ये 10 गुण युनिट टेस्ट, 30 गुण सत्रांत परीक्षा तर 20 गुण पूर्वपरीक्षेला दिले जातील.

2 thoughts on “अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षा कशी आहे.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट यांच्या वतीने 300 लोकांना पुरेल एवढं राशन

हडपसर, ” कारोना पाठोपाठ आलेल्या निसर्गाच्या प्रकोपाला पुन्हा एकदा पुण्यातील डॉक्टर पुढे सरसावले आहेत यामध्ये पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट ,पुणे यांच्या

Read More »

आश्रमशाळेतील इ. 8 वी ते 12 वी चे वर्ग 2 ऑगस्ट पासून होणार सुरु

नाशिक, ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.            कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार

Read More »
agralekh

प्रशासनाचा वृद्धांसाठी स्वतंत्र कक्ष दिलासा देणारा ठरावा

पूर्वी म्हातापणाची काठी म्हणून मुलांकडे पाहिले जात होते. काळ बदलला, एकत्र कुटुंब पध्दत जावून काळच्या गरजेनुसार विभक्त कुटुंब पध्दतीचा स्विकार केला गेला. तर काही कुटुंबात

Read More »

हडपसर-सासवड रस्त्यावर दुचाकी-ट्रकच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

पुणे, प्रतिनिधीहडपसर-सासवड रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरून ट्रकखाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंतरवाडीजवळील हॉटेलसमोर शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) रोजी झाला. ट्रकचालकाला ताब्यात

Read More »

‘या’ शाळेत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने मैत्रीदिन साजरा

पुणे, प्रतिनिधी आपल्या देशात रोज कोणता ना कोणता दिन ‘खास’ दिन म्हणून साजरा केला जातो. आज अमका दिन उद्या फलाणा दिन सरकारतर्फे किंवा खासगीरीत्या साजरा

Read More »

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची कर्जमुक्ती व वीजबिल माफी हवेत- विठ्ठल पवार राजे

नवी दिल्ली,केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती आणि वीजबिलमाफीची घोषणा केवळ राजकीय फायद्यासाठी केली होती. त्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे,

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place