करिअर; IAS की IPS?

IAS आणि IPS अधिकारी ही दोन्ही जिल्ह्यातील महत्वाची पदे आहेत. IAS आणि IPS हे एकमेकांना पूरक असतात. ही दोन्ही पदे भारतीय समाजाच्या विकासासाठी आवश्यकच आहेत. IAS आणि IPS या अग्रगण्य अखिल भारतीय सेवा आहेत ज्यामध्ये आयएएस ही उमेदवारांची पहिली पसंत असते. एका जिल्ह्यात एकापेक्षा जास्त IAS आणि IPS तैनात असतात. मात्र सर्वात महत्त्वाची पदे ही जिल्ह्याचे DM आणि SSP यांची असतात.

 • IAS आणि IPS या दोघांची निवड ही यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेद्वारे केली जाते. इच्छुकांनी यूपीएससीच्या Detailed Application फॉर्ममध्ये (DAF) पसंतीच्या सेवेचे प्राधान्य भरतात आणि अंतिम निकालामध्ये त्यांना त्यांच्या रँकनुसार योग्य ती सर्व्हिस दिली जाते. Indian Administrative Service मध्ये रुजू झाल्यानंतर उमेदवार सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा देऊ शकत नाही मात्र आयपीएस मध्ये सामील झाल्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा देऊ शकतात.
  • Cadre Controlling Authority
 • आयएएस आणि आयपीएस हे दोघेही ALL India Services आहेत पण दोघांचेही Cadre Controlling Authority या वेगवेगळ्या आहेत.
 • आयएएसचे Cadre Controlling Authority, Ministry of Personnel जे थेट पंतप्रधानांच्या अखत्यारीत असते.
 • पण आयपीएसचे Cadre Controlling Authority, Home Ministry असून ते गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत असते.
  • ट्रेनिंग
 • आयएएस आणि आयपीएसचे सुरुवातीचे तीन महिन्याचे ट्रेनिंग ,
 • ज्याला फाउंडेशन कोर्स असे म्हणतात ते लाल बहादूर शास्त्री नॅशनल अ‍ॅकॅडमी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) येथे होते.
 • त्यानंतर आयपीएस प्रशिक्षणार्थी हे सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अ‍ॅकॅडमी (SVPNPA) हैदराबाद येथे पाठवले जातात.
 • जेथे त्यांचे पोलिस ट्रेनिंग घेतले जाते.

आयएएस ट्रेनिंगमध्ये अव्वल स्थान मिळवलेल्या उमेदवारांना पदक तर आयपीएस प्रशिक्षणात अव्वल स्थान पटकाविणाऱ्या उमेदवारांना Sword of Honour दिले जाते. त्या तुलनेत, आयपीएस ट्रेनिंग अधिक कठीण आहे आणि अधिक मेहनतीची आवश्यकता असते. यात घोडेस्वारी, परेड, शस्त्रे इत्यादींचा समावेश असतो.

 • पावर आणि जबाबदाऱ्या
 • आयएएस आणि आयपीएस या दोन्ही सेवांचे जॉब प्रोफाइल खूप विस्तृत आहे आणि दोघेही अतिशय Powerful Postsवर पोस्ट केलेले असतात,
 • परंतु आयएमएस हा डीएम म्हणून अधिक Powerful असतो. आयपीएसकडे फक्त त्याच्या विभागाची जबाबदारी असते.
 • पण जिल्ह्यातील सर्व विभागांची ही जबाबदारी आयएएस (डीएम) ची असते.
 • डीएम म्हणून एक आयएएस अधिकारी पोलिस विभाग तसेच इतर विभागांचा प्रमुख असतो.
 • जिल्हा पोलिस यंत्रणेच्या व्यवस्थेलाही डीएम जबाबदार असतो.
 • शहरातील कर्फ्यूमध्ये कलम 144 वगैरे कायदा व सुव्यवस्थेसंबंधित सर्व निर्णय हे डीएम घेतात.
 • गर्दीवर डीएम फायरिंगचा देखील आदेश देखील देऊ शकतो. आयपीएस हे गर्दीवर गोळीबार करण्याचा आदेश देऊ शकत नाही.
 • एवढेच नव्हे तर पोलिस अधिकाऱ्यांच्या tranfer साठीही डीएमची मंजूरी आवश्यक असते.
 • एक प्रोटोकोल असेही सांगतो की जर एखादा आयपीएस अधिकारी आयएएसबरोबरच्या बैठकीला गेले तर त्यांनी आयएएसला सलाम करायलाच हवा.
 • पण हे तेव्हाच घडेल जेव्हा आयपीएस हा आपल्या पूर्ण गणवेशात आला असेल, जर आयपीएसने त्याची कॅप घातली नसेल तर त्याने आयएएसला सलाम करणे बंधनकारक नसते.
 • म्हणूनच बर्‍याच वेळा असे दिसून येते की आयएएसशी झालेल्या बैठकीत आयपीएस अधिकारी आपली टोपी घालत नाहीत.
 • काही राज्यांनी त्यांच्या काही शहरांमध्ये commissionerate system लागू केली आहे.
 • या प्रणालीत, पोलिस अधिकाऱ्यांकडे अधिक अधिकार आहेत, परंतु तरीही ते आयएएसपेक्षा कमी आहेत.

स्कोप ऑफ़ ड्यूटी
डीएम म्हणून आयएएस अधिकाऱ्याच्या कर्तव्याची व्याप्ती ही जिल्ह्यातील सर्व विभागात आहे. आयपीएस हा एसएसपी असताना केवळ पोलिस विभाग आणि वाहतूक विभागात काम करू शकतो. डीएमचे कार्य क्षेत्र हे भूमी अभिलेख, महसूल, कायदा एन ऑर्डर, शेती इत्यादी जिल्ह्यातील सर्व विभागांचे आहे.

 • पगार
 • सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर भारतातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या पगारामध्ये बरीच सुधारणा झालेली आहे.
 • आयपीएसचा पगार दरमहा, 56,100 रुपये ते 2,25,000 रुपयांपर्यंत असू शकतो. Seniority नुसार हे बदलते.
 • सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनंतर आयएएसचा पगारही चांगला झाला आहे.
 • आयएएसचा पगार दरमहा, 56,100 रुपये ते 2,50,000 रुपये असू शकतो. Seniority नुसार हे देखील बदलते.
 • आयएएसचा पगार हा आयपीएसपेक्षा जास्त आहे.
 • या व्यतिरिक्त दोन्ही अधिकाऱ्यांना शासकीय निवास व्यवस्था, वाहने इत्यादी सुविधा पुरविल्या जातात.
 • त्याचबरोबर वीज, पाणी, वैद्यकीय इत्यादी खर्चाच्या देयकामध्ये सूट असते.
 • युनिफॉर्म
 • युनिफॉर्म आयएएस आणि आयपीएसला वेगळे करतो. आयएएस अधिकाऱ्यांसाठी विशेष असा गणवेश नसतो,
 • त्यांना फक्त सरकारी कार्यक्रमांमध्येच औपचारिक असे कपडे घालावे लागतात.
 • मात्र आयपीएसला त्यांचा निर्धारित युनिफॉर्म हा घालावा लागतो.
 • आयपीएसचा युनिफॉर्म हा promotions सह बदलतात.
 • त्यांना प्रत्येक खांद्यावर स्टार्स, तलवारी आणि अशोक लाठ घालाव्या लागतात.
 • सामान्य लोक कपड्यांवरून आयएएस आणि आयपीएसला ओळखतात.
 • टॉप पोस्ट
 • आयएएससाठी भारतातील पहिली पोस्ट कॅबिनेट सेक्रेटरीचे आहे.
 • हे भारतातील सर्वोच्च पद आहे जिथे फक्त एक आयएएस अधिकारीच नियुक्त केले जाऊ शकतात.
 • राज्यातील सर्वोच्च पद हे मुख्य सचिवाचे असते, जो आयएस अधिकारी असतो.
 • गृहसचिव पदावरही फक्त आयएएस अधिकाऱ्यालाच तैनात केले जाते.
 • आयपीएस हे त्याच्या राज्याचे पोलिस महासंचालक होऊ शकतात.
 • केंद्र सरकारमधील आयपीएस अधिकारी सीबीआय, आयबी आणि रॉचे संचालक होऊ शकतात.
 • यासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरही आयपीएस अधिकाऱ्याला तैनात करता येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट यांच्या वतीने 300 लोकांना पुरेल एवढं राशन

हडपसर, ” कारोना पाठोपाठ आलेल्या निसर्गाच्या प्रकोपाला पुन्हा एकदा पुण्यातील डॉक्टर पुढे सरसावले आहेत यामध्ये पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट ,पुणे यांच्या

Read More »

आश्रमशाळेतील इ. 8 वी ते 12 वी चे वर्ग 2 ऑगस्ट पासून होणार सुरु

नाशिक, ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.            कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार

Read More »
agralekh

प्रशासनाचा वृद्धांसाठी स्वतंत्र कक्ष दिलासा देणारा ठरावा

पूर्वी म्हातापणाची काठी म्हणून मुलांकडे पाहिले जात होते. काळ बदलला, एकत्र कुटुंब पध्दत जावून काळच्या गरजेनुसार विभक्त कुटुंब पध्दतीचा स्विकार केला गेला. तर काही कुटुंबात

Read More »

हडपसर-सासवड रस्त्यावर दुचाकी-ट्रकच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

पुणे, प्रतिनिधीहडपसर-सासवड रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरून ट्रकखाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंतरवाडीजवळील हॉटेलसमोर शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) रोजी झाला. ट्रकचालकाला ताब्यात

Read More »

‘या’ शाळेत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने मैत्रीदिन साजरा

पुणे, प्रतिनिधी आपल्या देशात रोज कोणता ना कोणता दिन ‘खास’ दिन म्हणून साजरा केला जातो. आज अमका दिन उद्या फलाणा दिन सरकारतर्फे किंवा खासगीरीत्या साजरा

Read More »

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची कर्जमुक्ती व वीजबिल माफी हवेत- विठ्ठल पवार राजे

नवी दिल्ली,केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती आणि वीजबिलमाफीची घोषणा केवळ राजकीय फायद्यासाठी केली होती. त्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे,

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place