म्युकर बुरशीची लक्षणे आढळली तर त्वरित उपचार करून घ्या- डॉ. संजय धर्माधिकारी

अशोक बालगुडे, विसभा न्यूज नेटवर्क
कोरोना महामारीमध्ये म्युकर(Mucker) नावाची बुरसी या आजाराने डोके वर काढले आहे. म्युकर ही बुरशी सर्वव्यापी आहे. माती, ओल्या भिंती, पालापाचोला आदीमध्ये आढळून येते. कोरोनाबाधित झाल्यावर जर गालावर सूज, बधीरपणा, वेदना, जखम दिसली किंवा नाक गच्च होणे, नाकाला रक्तमिश्रित पाणी, पू (फस) येत असेल व डोळ्यात वेदना, अंधुक दिसणे, डोळ्याची हालचाल नीट न होणे जाणवले, हिरड्या बधीर होणे, दात हलणे, टाळूला जखम दिसली तर त्वरित कान नाक घसा तज्ञाला भेटून म्युकॉर नाही ना याची खात्री करून घ्या. नाकात दुर्बीण टाकून निदान लवकर झाल्यास म्युकोर डोळ्यात व मेंदूत जाण्याचा धोका टळतो. कोरोनाबाधित रुग्णाची वरचे वर रक्तातील साखर तपासावी, जर ती १८० चे वर जात असल्यास त्वरीत वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करून घेणे आवश्यक आहे, असे कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. संजय धर्माधिकारी यांनी सांगितले.

डॉ. धर्माधिकारी म्हणाले की, म्युकर ही बुरशी सर्वव्यापी आहे. माती, ओल्या भिंती, पालापाचोळा इत्यादी ठिकाणी दिसून येते. कारोना महामारीच्या पूर्व काळातदेखील ज्यांची रोगप्रतिकार शक्ती मधुमेह, कॅन्सरमुळे क्षीण झाली आहे. त्या व्यक्तींमध्ये म्युकोरमायकोसिस या बुरशीचा प्रादुर्भाव क्वचित आढळून येत होता.


कोरोना महामारी आणि मधुमेह हे एकत्र असणे म्युकॉरसाठी पोषक आहे. म्यूकरमुळे नाकातून रक्त येणे, श्वासाला त्रास होतो, नाकातून डोळ्यामध्ये गेले, डोळ्याला सूज, दृष्टी कमी होते, डोळ्याची हालचाल बंद होते, डोळ्यातून मेंदूपर्यंत जाऊ नये म्हणून सर्जरी करून डोळा काढून टाकावा लागू शकतो. मेंदूपर्यंत बुरशी पोहोचली, तर रुग्ण दगावण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नाकाला त्रास होऊ लागला, तर तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करून घेणे क्रमप्राप्त आहे,

कोरोना महामारीच्या उपचारात काही वेळा जीवरक्षक म्हणून स्टरोईड औषधे वापरावी लागतात. परंतु, त्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते. ती नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. म्यूकोर ही बुरशी नाकावाटे मानवी शरीरामध्ये प्रवेश करते. रक्तातील साखर जास्त असेल, तर वेगाने सायनस, डोळे, मेंदू बाधित होतात.


कोरोनाबाधित झाल्यावर जर गालावर सूज, बधीरपणा, वेदना, जखम दिसली किंवा नाक गच्च होणे, नाकाला रक्तमिश्रित पाणी, पू (फस) येत असेल व डोळ्यात वेदना, अंधुक दिसणे, डोळ्याची हालचाल नीट न होणे जाणवले, हिरड्या बधीर होणे, दात हलणे, टाळूला जखम दिसली तर त्वरित कान नाक घसा तज्ञाला भेटून म्युकॉर नाही ना याची खात्री करून घ्या. नाकात दुर्बीण टाकून निदान लवकर झाल्यास म्युकोर डोळ्यात व मेंदूत जाण्याचा धोका टळतो. कोरोना पेशंटने वरचे वर रक्तातली साखर तपासून १८० चे वर जात असल्यास त्वरीत डॉक्टरशी संपर्क साधावा.

बागेत, शेतात काम करताना मास्क नक्की वापरा. म्युकॉरने बाधित झालेला भाग काळा पडत असल्याने त्याला काळी बुरशी म्हणतात. डोळे व मेंदू व सायनसचा एमआरआय स्कॅन करून आजाराची व्याप्ती समजते. नाकातील स्राव बुरशीसाठी प्रयोग शाळेत पाठवून निदान पक्के होते. सर्जरी लवकर करून नाकातील व सायनसचा बाधित झालेला भाग काढून टाकला, तर डोळे व मेंदू बाधित होणे टळते. त्यानंतरदेखील बुरशी नाशक औषधे देणे आवश्यक असते. डॉक्टरांना न विचारता अँटिबायोटिक, स्टरोईड, टॉनिक घेणे टाळावे. महत्वाचे म्हणजे म्युकोरमायकोसिस संसर्गजन्य आजार नाही, असे डॉ. धर्माधिकारी यांनी स्पष्ट केले.

6 thoughts on “म्युकर बुरशीची लक्षणे आढळली तर त्वरित उपचार करून घ्या- डॉ. संजय धर्माधिकारी”

 1. Pratima Ashok Kedar

  This information is very important and useful for corona patients and also diabetic patients.
  Thanks Dr. Dharmadhikari for your valuable guidance through this article.

 2. Liladhar Patil

  खुप खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

 3. Taur MACHINDRA Bajirao

  very informative Medical Artical. Good for community awareness.
  Congratulations Dr Dharmadhikari. Sir
  Prof Taur MACHINDRA. B

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

वापरलेल्या घातक खाद्यतेलांचा काळाबाजार , अन्नसाखळीत पुनर्प्रवेशाची शक्यता .

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्विक फूड डिलीव्हरी चेन आणि फूड बिझनेस ऑपरेटर यांनी टाकलेले तेल अनेक वेळा अनियंत्रित बाजारातील भेसळखोरांद्वारा ब्लिचिंग करून आणि ताज्या तेलामध्ये भेसळ म्हणून

Read More »
agralekh

शासनाच्या सहाय्यक योजना नक्कीच दिलासा देणाऱ्या ठरोत

पीएम केअर फॉर चिल्ड्रन या योजनेअंतर्गत कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या मुलांचे भवितव्य अधांतरी राहूनये यासाठी दर महिन्याला केंद्र सरकारने मदत देण्याची योजना आखली. त्याच प्रमाणे

Read More »

“इंजिनिअर्स जगत असतात , प्रत्येक कल्पक क्षण – 60X60X7X 24”

नुकताच “इंजिनीअर्स डे” जगभर साजरा झाला.सकाळपासून ढीगभर शूभेच्छा फिरत होत्या.कांहीं उपहासात्मक जोक्स पण येत होते.असे वाटले की आजचा दिवस खरं म्हणजे आपला मानाचा दिवस आहे.सकाळी

Read More »
agralekh

लाखोंचा पोशिंदा जगाला तर आपण जगू हे ध्यानात घेऊ या

आपण थांबलो, कारागीर थांबला, कष्टकरी थांबला, उद्योगधंद्यात मंदी आली अशा कितीतरी गोष्टींवर कोरोनामुळे मंदावल्या/थाबल्या हे सर्वांना माहीत आहे. स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेकांनी विविध मार्ग

Read More »

“मेरे अपने” …

मी सोलापूर येथे 1980 साली मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला शिकत होतो.भरपूर खेळणे जास्त करून क्रिकेट ग्राऊंडवर असणे ,खूप पिक्चर पाहणे, हॉस्टेल मधील बेफिकीर धम्माल

Read More »

शाळा उघडण्यासाठी आंदोलन का करत नाही सामान्यजनांची हाक- आता तरी… गरिबांच्या मुलांसाठी शाळा उघडा

अशोक बालगुडे पुणे, प्रतिनिधी“आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो. तितकेच महत्त्व शिक्षण प्रसार यांना दिले पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय आपल्याला माऱ्यांच्या जागा काबीज करता येणार नाहीत

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place