कोंढव्यातील दोन बड्या बेकायदेशीर इमारती होणार जमिनदोस्त

पुणे,  कोंढवा (Kondwa) परिसरात क्लोवर हायलॅंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून (Clover Highlands Cooperative Society) बांधलेल्या दोन 22 मजली इमारती जमिनदोस्त करण्याचा आदेश पुणे सिव्हील कोर्टाकडून (Civil Court) देण्यात आला आहे. संबंधित बेकायदेशीर इमारती पाडण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून शहरातील 9 रहिवासी न्यायालयीन लढा देत होते. आता त्यांच्या लढ्याला यश आलं असून या बेकायदेशीर इमारती पाडण्याचा आदेश पुणे सिव्हील कोर्टाकडून 30 एप्रिल रोजी देण्यात आला आहे.

संबंधित दोन्ही इमारती बेकायदेशीर असून या इमारती मुळ आराखड्याचा भाग नाहीत, असा आरोप करून शहरातील 9 रहिवाशांनी 2018 साली न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर त्यांच्या लढ्याला आता यश आलं आहे. या खटल्याचे प्रमुख न्यायाधीश एसएमए सय्यद (SMS Sayyad) यांनी 30 एप्रिल रोजी 95 पानांचा सविस्तर निकाल दिला आहे. या आदेशात त्यांनी म्हटलं की, 2007 साली रहिवाशांना इमारतीचा ताबा दिल्यानंतर इमारतीच्या आराखड्यात करण्यात आलेले सर्व बदल रद्दबातल करण्यात येत आहेत. तसेच संबंधित बेकायदेशीर इमारती पाडण्याचा आदेश दिल्याच्या तारखेपासून 4 महिन्याच्या आत या इमारती पाडणं अनिवार्य आहेत, असंही न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं आहे.

संबंधित डेव्हलपर्स निर्धारित वेळेत कारवाई पूर्ण करण्यात अपयशी झाले, तर फिर्यादीकडून या इमारती पाडल्या जातील. त्यासाठी येणारा सर्व खर्च प्रतिवाद्यांकडून (Devlopers) वसूल केला जाईल, असंही या आदेशात म्हटलं आहे. तसेच फिर्यादींना झालेला मानसिक त्रास, छळ याची भरपाई म्हणून विकसकांनी आणि सोसायटीतील अन्य रहिवाशांनी 5,00,000 रुपये फिर्यादींना द्यावेत असंही न्यायमूर्तीनी म्हटलं आहे.

दुसरीकडे संबंधित विकसकानं (डेव्हलपर्सनं) आपली बाजू मांडतांना सांगितलं की, संबंधित इमारतीच्या आराखड्याबद्दल रहिवाशांना सांगण्यात आलं होतं. त्यावेळी कोणीही आक्षेप नोंदवला नाही. यांच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना न्यायाधिशांनी आपल्या निकालात म्हटलं की, फिर्यादींना  6 फेब्रुवारी 2007 रोजी सोसायटी रहिवाशांच्या ताब्यात देण्यात आली. त्यावेळी या इमारतीबाबतचा कोणताही उल्लेख संबंधित लेआऊटमध्ये करण्यात आला नव्हता. त्यामुळे यानंतर रहिवाशांच्या संमतीशिवाय मंजूर केलेली कोणतीही योजना बेकायदेशीर मानली जात आहे.

सध्या ज्या जागेत इमारत क्रमांक 8 आणि इमारत क्रमांक 9 उभारली आहे. ती जागा संबंधित इमारतीच्या पार्किंसाठी राखीव ठेवण्यात आली होती. पण त्या जागेवर या बेकायदेशीर 22 मजली इमारती उभारण्यात आल्या असल्याचंही रहिवाशांनी सांगितलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

नोंद घ्यावी अशी सिल्व्हर क्रेस्ट स्कूल मधील ऑनलाईन शिक्षण पद्धत

सध्या अचानक उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून शाळा बंद आहेत.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचणं कठीण झालंय.पण हे जरी खरं असलं तरी शासनाने वेळीच राबवलेल्या online

Read More »
agralekh

वेळचं नाही-अग्रलेख

संभ्रमात पडलात ना ! वेळच नाही हे छोटेखानी वाक्य एकूण, अहो अशीच काहींशी परिस्थिती सध्या चालू आहे. कामात व्यस्त असणारे आणि नसणारी मंडळी सुद्धा सर्रास

Read More »

बारावीच्या विद्यार्थ्यांची गणिताची भीती दूर व्हावी- प्रा. बोराडे

पुणे ः प्रतिनिधी बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये गणिती संकल्पना रुजावी, तसेच गणित संज्ञा स्पष्ट होऊन गणित विषयाची भीती दूर होऊन आवड निर्माण झाली पाहिजे. प्रश्नमंजुषाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील

Read More »

थोपटेवाडी येथे बैलगाडा शर्यती प्रकरणी पोलिसांची कारवाई

नीरा , थोपटेवाडी (ता.पुरंदर ) येथे एका माळरानावर बेकायदा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी यावर कारवाई करून दहा बैलगाडे व बारा मोटार सायकल

Read More »

पायी वारीबाबत वारकऱ्यांच्या आशा पल्लवीत

पुणे : प्रतिनिधीकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी शासन सांगेल, त्या संख्येत संपूर्ण पायी व्हावी, अशी अद्यापही वारकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, यंदाही राज्य सरकारने वाहनांनी त्या

Read More »