पायी वारीबाबत वारकऱ्यांच्या आशा पल्लवीत

पुणे : प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी शासन सांगेल, त्या संख्येत संपूर्ण पायी व्हावी, अशी अद्यापही वारकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, यंदाही राज्य सरकारने वाहनांनी त्या त्या गावातून दहा पालख्या पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर वारकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, मानाचे दहा पालखी प्रमुख आणि देवस्थानांचे विश्वस्त यांच्या आणखी काही मागण्या असल्यास याबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा करावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये सांगितल्याने पायी वारीबाबत वारकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.


कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी पायी करण्याऐवजी मानाच्या दहा पालख्या त्या त्या गावांहून वाहनाने पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पायी वारीची परंपरा खंडित होऊ नये, म्हणून वाखरी ते पंढरपूर पोलीस बंदोबस्तात पायी वारी होणार आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख संजय मोरे म्हणाले, ‘पायी वारीबाबत शासनाचा निर्णय झाल्याची अधिकृत प्रत अद्याप मिळालेली नाही. वारकऱ्यांच्या आणखी काही मागण्या विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे मांडू.’

आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक म्हणाले, ‘मर्यादित संख्येत पायी वारी होण्याबाबत आम्ही सर्वांनीच प्रयत्न के ला. वारकरी शिस्त पाळतील, मात्र पालख्या रस्त्याने निघाल्यानंतर होणाऱ्या संभाव्य गर्दीबाबत शासनाला चिंता होती. कोरोना महामारीच्या दोन लाटांचा बसलेला तडाखा आणि संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता शासनाने हा निर्णय प्राप्त परिस्थितीनुरूप घेतला आहे. शासनाचा निर्णय ही तडजोड असून प्राप्त परिस्थितीत अपरिहार्य आहे. पायी वारी नेण्याचा निर्णय घेतल्यास संसर्गाच्या अनुषंगाने येणारे सर्व मुद्दे टाळता येणारे नाहीत. परिणामी शासनाचा निर्णय यंदाही स्वीकारावा लागणार आहे.’

दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आम्ही कोणताही संख्येचा आग्रह नाही. मात्र, पायी पालखी सोहळा असावा, अशी मागणी सरकार दरबारी केली होती. मात्र, या सहिष्णू विनंतीला झुगारत प्रशासकीय वर्गाने आपल्यावरील ताण वाढू नये यासाठी वाहनांनी वारी करण्याची शिफारस केली. वारीची परंपरा जपण्यासाठी अल्पसंख्येत का होईना, संपूर्ण पायी वारीला परवानगी देण्याची मागणी वारकरी संप्रदाय संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर यांनी केली आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती शासन स्थापित असल्याने राज्य शासनाच्या निर्णयाशी बांधील आहोत. मात्र, वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचे कामही करावे लागते. राज्यातील इतर सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. वारकऱ्यांनादेखील स्वत:च्या जिवाची पर्वा आहे. त्यामुळे शासनाने पायी वारीला परवानगी देण्याची वारकऱ्यांची आणि माझी व्यक्तिश: मागणी आहे, असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट यांच्या वतीने 300 लोकांना पुरेल एवढं राशन

हडपसर, ” कारोना पाठोपाठ आलेल्या निसर्गाच्या प्रकोपाला पुन्हा एकदा पुण्यातील डॉक्टर पुढे सरसावले आहेत यामध्ये पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट ,पुणे यांच्या

Read More »

आश्रमशाळेतील इ. 8 वी ते 12 वी चे वर्ग 2 ऑगस्ट पासून होणार सुरु

नाशिक, ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.            कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार

Read More »
agralekh

प्रशासनाचा वृद्धांसाठी स्वतंत्र कक्ष दिलासा देणारा ठरावा

पूर्वी म्हातापणाची काठी म्हणून मुलांकडे पाहिले जात होते. काळ बदलला, एकत्र कुटुंब पध्दत जावून काळच्या गरजेनुसार विभक्त कुटुंब पध्दतीचा स्विकार केला गेला. तर काही कुटुंबात

Read More »

हडपसर-सासवड रस्त्यावर दुचाकी-ट्रकच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

पुणे, प्रतिनिधीहडपसर-सासवड रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरून ट्रकखाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंतरवाडीजवळील हॉटेलसमोर शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) रोजी झाला. ट्रकचालकाला ताब्यात

Read More »

‘या’ शाळेत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने मैत्रीदिन साजरा

पुणे, प्रतिनिधी आपल्या देशात रोज कोणता ना कोणता दिन ‘खास’ दिन म्हणून साजरा केला जातो. आज अमका दिन उद्या फलाणा दिन सरकारतर्फे किंवा खासगीरीत्या साजरा

Read More »

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची कर्जमुक्ती व वीजबिल माफी हवेत- विठ्ठल पवार राजे

नवी दिल्ली,केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती आणि वीजबिलमाफीची घोषणा केवळ राजकीय फायद्यासाठी केली होती. त्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे,

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place