मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा, मुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबई : मराठा(Maratha) समाजाच्या आरक्षणासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांसोबत राज्यपालांची(Governor) भेट घेतली. केंद्र व राष्ट्रपतींना (Presidents)विनंती करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. लवकरच पंतप्रधानांची भेट घेवू. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

मराठा समाजाला आरक्षणाचा (Reservation)हक्क मिळायला हवा. राज्यांचे अधिकार राज्याकडे असावेत. हा मुद्दा आहे. मराठा समाजाने समजूतदारपणा दाखवला आहे. राज्यपालांना याबाबत पत्र दिलेले आहे, त्याचे उत्तर लवकर मिळावे. राज्यपालही सहमत आहेत. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

याआधी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्याने मराठा समाजात पुन्हा एकदा आक्रमक प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. पण त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजाला शांततेचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आज त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. 

‘आरक्षणाचा अधिकार राज्याला नाही तर केंद्राला आहे. त्यामुळे आम्ही केंद्राला आणि राष्ट्रपतींना आमच्या भावना कळवण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी ही आपल्या भावना केंद्रापर्यंत पोहोचू, असं सांगितलं. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आम्ही लवकरच पंतप्रधानांना भेटू. महाराष्ट्राच्या विधीमंडळाने एकमताने निर्णय घेतला होता. त्याला विरोध झाला. पण आता जो निर्णय झाला तो जनतेचा आहे. समाजाला न्यायहक्क मिळाला पाहिजे.’ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

नोंद घ्यावी अशी सिल्व्हर क्रेस्ट स्कूल मधील ऑनलाईन शिक्षण पद्धत

सध्या अचानक उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून शाळा बंद आहेत.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचणं कठीण झालंय.पण हे जरी खरं असलं तरी शासनाने वेळीच राबवलेल्या online

Read More »
agralekh

वेळचं नाही-अग्रलेख

संभ्रमात पडलात ना ! वेळच नाही हे छोटेखानी वाक्य एकूण, अहो अशीच काहींशी परिस्थिती सध्या चालू आहे. कामात व्यस्त असणारे आणि नसणारी मंडळी सुद्धा सर्रास

Read More »

बारावीच्या विद्यार्थ्यांची गणिताची भीती दूर व्हावी- प्रा. बोराडे

पुणे ः प्रतिनिधी बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये गणिती संकल्पना रुजावी, तसेच गणित संज्ञा स्पष्ट होऊन गणित विषयाची भीती दूर होऊन आवड निर्माण झाली पाहिजे. प्रश्नमंजुषाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील

Read More »

थोपटेवाडी येथे बैलगाडा शर्यती प्रकरणी पोलिसांची कारवाई

नीरा , थोपटेवाडी (ता.पुरंदर ) येथे एका माळरानावर बेकायदा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी यावर कारवाई करून दहा बैलगाडे व बारा मोटार सायकल

Read More »

पायी वारीबाबत वारकऱ्यांच्या आशा पल्लवीत

पुणे : प्रतिनिधीकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी शासन सांगेल, त्या संख्येत संपूर्ण पायी व्हावी, अशी अद्यापही वारकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, यंदाही राज्य सरकारने वाहनांनी त्या

Read More »