मराठा आरक्षणावरून राज्यातील नेत्यांनी राजकारण करू नये-रोहित पवार

मुंबई, मराठा आरक्षणावरून कोणीही राजकारण ( politics ) करू नये. कारण जे वकील आधीच्या सरकारने दिले होते. तेच वकील आपण कायम ठेवले होते. संबंधित वकीलांनी चांगल्याप्रकारे युक्तीवाद केल्याचं देखील आपण पाहिलं आहे. पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतो,

 संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाचा  (Maratha Reservation) निर्णय सुप्रीम कोर्टाने (Supreme Court)  रद्द केला आहे. या निर्णयावरून आता राजकीय आखाडा तापाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनीही उडी घेतली असून भाजपवर निशाणा साधला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आहेत. तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (Rastravadi Congress) नेते आणि कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. यामुळे माझ्या सारख्या अनेक लोकांना वाईट वाटत आहे. आरक्षण मिळालं असतं तर लोकांना त्याचा फायदा झाला असता. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. त्यामुळे मी फक्त एकच विनंती करू इच्छितो की, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन याबाबत चर्चा करायला हवी. मराठा समाजामधील युवा वर्गाच्या हिताचा निर्णय राज्य पातळीवर कसा घेता येईल? याबाबतचा विचार करण्याची गरज आहे असंही रोहित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

नोंद घ्यावी अशी सिल्व्हर क्रेस्ट स्कूल मधील ऑनलाईन शिक्षण पद्धत

सध्या अचानक उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून शाळा बंद आहेत.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचणं कठीण झालंय.पण हे जरी खरं असलं तरी शासनाने वेळीच राबवलेल्या online

Read More »
agralekh

वेळचं नाही-अग्रलेख

संभ्रमात पडलात ना ! वेळच नाही हे छोटेखानी वाक्य एकूण, अहो अशीच काहींशी परिस्थिती सध्या चालू आहे. कामात व्यस्त असणारे आणि नसणारी मंडळी सुद्धा सर्रास

Read More »

बारावीच्या विद्यार्थ्यांची गणिताची भीती दूर व्हावी- प्रा. बोराडे

पुणे ः प्रतिनिधी बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये गणिती संकल्पना रुजावी, तसेच गणित संज्ञा स्पष्ट होऊन गणित विषयाची भीती दूर होऊन आवड निर्माण झाली पाहिजे. प्रश्नमंजुषाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील

Read More »

थोपटेवाडी येथे बैलगाडा शर्यती प्रकरणी पोलिसांची कारवाई

नीरा , थोपटेवाडी (ता.पुरंदर ) येथे एका माळरानावर बेकायदा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी यावर कारवाई करून दहा बैलगाडे व बारा मोटार सायकल

Read More »

पायी वारीबाबत वारकऱ्यांच्या आशा पल्लवीत

पुणे : प्रतिनिधीकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी शासन सांगेल, त्या संख्येत संपूर्ण पायी व्हावी, अशी अद्यापही वारकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, यंदाही राज्य सरकारने वाहनांनी त्या

Read More »