२०२२ मध्ये पुण्याचा महापौर मनसे ठरविणार – वसंत मोरे

पुणे, प्रतिनिधी

शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, उद्याने वीज, पाणी यासह सर्व मुलभूत सुविधा दूरदृष्टीने देण्याची गरज आहे. पालिकेच्या अनेक शाळांची अवस्था वाईट असली तरी, काही शाळा नक्कीच चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. त्यातील कात्रजमधील शाळा, उद्याने, पाण्यासह इतरही सुविधा ज्या पद्धतीने दिल्या आहेत, त्याच पद्धतीने नगरसेवकांनी काम करण्याची गरज आहे. नागरिक चांगल्या कामाचा स्वीकार करतात. शहरामध्ये आतापर्यंत सर्व पक्षांना संधी दिली आहे. मात्र, आता मनसेला मतदार संधी देईल आणि पुण्याचा महापौर बनविण्याच अधिकार मनसेकडे असणार आहे, असे मत मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश सातपुते, मनसे महिला शहराध्यक्षा रुपाली ठोबरे पाटील, मनसे प्रदेश उपाध्यक्ष रणजित शिरोळे, मनसे कसबा विधानसभा अध्यक्ष गणेश भोकरे, अॅड. मनिषा कावेडीया व हर्षद मालुसरे आदी उपस्थित होते.

यावेळी कोरोना महामारीमध्ये शहरात देवदूत म्हणून मंडई विद्यापीठ कट्टा, पुणेचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांच्यातर्फे मनसे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांचा विषेश सत्कार करण्यात आला. दरम्यान, शहराच्या विविध प्रश्नावर, राजकीयदृष्ट्या शहरातील कामे व विकास योजना कशा पद्धतीने राबविण्यात याव्यात या मुद्यावर विषेश लक्ष केंद्रित करून चर्चा करण्यात आली.

वसंत मोरे म्हणले, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये होऊ घातल्या आहेत. त्यामध्ये दोन वॉर्डांचा एक प्रभाग अशी रचना सध्या तरी मानली जात आहे, मागील काही काळात पक्षाने जे शहरातील प्रमुख भागात परिक्षण केले, त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उत्तम प्रतिसाद आहे. नागरिकांसाठी नगरसेवकांनी काम कसे करावे, याचा अभ्यास करायचा असेल तर कात्रजमधील प्रभागाची पाहणी करावी, त्यानुसार विकासाची कामे केली पाहिजेत. मनसेच्या वतीने शहरातील सर्व भागात कात्रजचा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे.

मंडई विद्यापीठ कट्टाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे म्हणाले की, सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरातील मान्यवरांच्या विचारप्रदानाचे आदानप्रदान करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणारी ही कट्टा संस्कृती आहे. मंडई विद्यापीठ कट्टा हा त्यातील एक शहरातील महत्त्वाचा कट्टा आहे. मागिल सात वर्षांपासून विविध क्षेत्रातील अभ्यासकांना एकत्र आणून विविध विषयावर केली जात आहे. त्यातून समविचार समाजासाठी उपयुक्त ठरत आहेत. राजकारणाच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी आज शहरातील मनसेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले होते. यावेळी येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे कशी भूमिका घेऊन काम करेल, यावर आज चर्चा झाली. येत्या काळात एक एक करून सर्व प्रमुख पक्षाना आम्ही कट्टावर आमंत्रित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट यांच्या वतीने 300 लोकांना पुरेल एवढं राशन

हडपसर, ” कारोना पाठोपाठ आलेल्या निसर्गाच्या प्रकोपाला पुन्हा एकदा पुण्यातील डॉक्टर पुढे सरसावले आहेत यामध्ये पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट ,पुणे यांच्या

Read More »

आश्रमशाळेतील इ. 8 वी ते 12 वी चे वर्ग 2 ऑगस्ट पासून होणार सुरु

नाशिक, ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.            कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार

Read More »
agralekh

प्रशासनाचा वृद्धांसाठी स्वतंत्र कक्ष दिलासा देणारा ठरावा

पूर्वी म्हातापणाची काठी म्हणून मुलांकडे पाहिले जात होते. काळ बदलला, एकत्र कुटुंब पध्दत जावून काळच्या गरजेनुसार विभक्त कुटुंब पध्दतीचा स्विकार केला गेला. तर काही कुटुंबात

Read More »

हडपसर-सासवड रस्त्यावर दुचाकी-ट्रकच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

पुणे, प्रतिनिधीहडपसर-सासवड रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरून ट्रकखाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंतरवाडीजवळील हॉटेलसमोर शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) रोजी झाला. ट्रकचालकाला ताब्यात

Read More »

‘या’ शाळेत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने मैत्रीदिन साजरा

पुणे, प्रतिनिधी आपल्या देशात रोज कोणता ना कोणता दिन ‘खास’ दिन म्हणून साजरा केला जातो. आज अमका दिन उद्या फलाणा दिन सरकारतर्फे किंवा खासगीरीत्या साजरा

Read More »

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची कर्जमुक्ती व वीजबिल माफी हवेत- विठ्ठल पवार राजे

नवी दिल्ली,केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती आणि वीजबिलमाफीची घोषणा केवळ राजकीय फायद्यासाठी केली होती. त्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे,

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place