लाँकडाऊनच्या काळात गोरगरीबांसाठी मोफत मुक्ताई थाळी

कोंढवा खुर्द : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून, त्यावर मात करण्यासाठी राज्य शासन सर्वोत्परी प्रयत्न करत आहे. आगामी काळात काय होणार हे कुणीही सांगू शकत नाही. माञ आपल्या जिवलगांना व स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुयात. असे आवाहन शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी केले आहे. कोंढवा खुर्द परिसरात मोलमजूर व गोरगरीब, निराधार लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या नागरिकांचे लाँकडाऊनच्या काळात जेवणाचे मोठे हाल होतात. अशा लोकांना वेळेत अन्न मिळावे हा हेतू समोर ठेवून स्वखर्चातून माजी आमदार महादेव बाबर, पै. प्रसाद बाबर यांच्यावतीने कै. मुक्ताबाई रामचंद्र बाबर यांच्या स्मरणार्थ, मोफत मुक्ताई थाळी सुरु करण्यात आली आहे. त्याच्या उदघाटनप्रसंगी आमदार बाबर बोलत होते. भाजी भात वरण दोन चपात्या अशी ही थाळी आहे.

यावेळी पंढरीनाथ नाना लोणकर, सुनील कामठे, अजिज शेख, फारुख भाई, मुज्जू भाई, नूर शेख, माऊली भोईटे, अमर पवळे, सुनील मोरे, माऊली बिबवे, सचिन कापरे, शंकर लोणकर, धनराज भणगे, नदीम भाई, सतीश गोते, लक्ष्मण लोणकर, सौरभ चौधरी, नाना भाडळे, बालाजी ग्रुप, जीवन गोते, गोविंद जावळकर, उमेद शहा, सर्व भजनी मंडळ कोंढवा खुर्द ग्रामस्थ, उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

नोंद घ्यावी अशी सिल्व्हर क्रेस्ट स्कूल मधील ऑनलाईन शिक्षण पद्धत

सध्या अचानक उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून शाळा बंद आहेत.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचणं कठीण झालंय.पण हे जरी खरं असलं तरी शासनाने वेळीच राबवलेल्या online

Read More »
agralekh

वेळचं नाही-अग्रलेख

संभ्रमात पडलात ना ! वेळच नाही हे छोटेखानी वाक्य एकूण, अहो अशीच काहींशी परिस्थिती सध्या चालू आहे. कामात व्यस्त असणारे आणि नसणारी मंडळी सुद्धा सर्रास

Read More »

बारावीच्या विद्यार्थ्यांची गणिताची भीती दूर व्हावी- प्रा. बोराडे

पुणे ः प्रतिनिधी बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये गणिती संकल्पना रुजावी, तसेच गणित संज्ञा स्पष्ट होऊन गणित विषयाची भीती दूर होऊन आवड निर्माण झाली पाहिजे. प्रश्नमंजुषाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील

Read More »

थोपटेवाडी येथे बैलगाडा शर्यती प्रकरणी पोलिसांची कारवाई

नीरा , थोपटेवाडी (ता.पुरंदर ) येथे एका माळरानावर बेकायदा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी यावर कारवाई करून दहा बैलगाडे व बारा मोटार सायकल

Read More »

पायी वारीबाबत वारकऱ्यांच्या आशा पल्लवीत

पुणे : प्रतिनिधीकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी शासन सांगेल, त्या संख्येत संपूर्ण पायी व्हावी, अशी अद्यापही वारकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, यंदाही राज्य सरकारने वाहनांनी त्या

Read More »