२०२२ मध्ये राष्ट्रवादीचा महापौर ; त्यासाठी समविचारी पक्ष आमच्या बरोबर : शहराध्यक्ष प्रशांत जगताप

पुणे, प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे महानगरपालिकेची निवडणूक सर्व प्रभागात स्वबळावर लढण्यासाठी ताकदीने उभी आहे. मात्र, राज्यात आम्ही महाविकास आघाडी म्हणून सत्तेत असल्याने सर्वप्रथम सत्ताधारी व भ्रष्टाचारी भाजपाला सत्तेतून पायउतार करून उद्याचे सक्षम प्रशासन देण्याचा आमचा अजेंडा असणार आहे. पुणे महापालिकेचा २०२२ मध्ये शंभर टक्के राष्ट्रवादीचा महापौर असणार आहे, त्यासाठी समविचारी पक्ष आमच्या बरोबर असणार आहे. मात्र, याबाबतचा सर्व निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

मंडई विद्यापीठ कट्टाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांनी महापालिका निवडणुका व्हीजन २०२२चे चर्चासत्र आयोजित केले होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर अंकुश काकडे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक वनराज आंदेकर, नितीन कदम, बाळासाहेब बोडके, नीलेश निकम, महेश हांडे, गणेश नलावडे उपस्थित होते. यावेळी शहराचा विकास आणि राजकीय घडामोडी या विषयावर संवाद झाला.

जगताप म्हणाले की, पुणे शहरातील मेट्रोसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्रेय आहे. मेट्रो एका दिवसात किंवा महिन्यात उभी राहिली नाही. पुणे महापालिकेमध्ये २००७ साली राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला महापौर बसला, तेव्हा राज्यात आघाडी तर केंद्रित युपीए सरकार होते. त्यावेळी सर्व नेत्यांचा विचार विमार्ष झाल्यावर राज्याच्या कॅबिनेटमध्ये ठराव मंजूर करण्यात आला. तेव्हा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार होते. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केंद्रीय कॅबिनेटमध्ये २००७ ते २०१४ दरम्यानच्या काळात ठराव मंजू झाले. दुर्दैवाने २०१४ मध्ये सत्ता परिवर्तन झाल्याने मेट्रो मंजुरी शेवटच्या सहीसाठी विषय राहिला होता. २०१६ मध्ये राष्ट्रवादीचे महापौर प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोचे भूमी पूजन झाले होते. त्यामुळे मेट्रोच्या सर्व मान्यता या राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असताना झाल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, माजी महापौर अंकुश काकडे म्हणाले, की भाजप-शिवसेनेची हिंदुत्वावर युती तुटेल असे कोणालाही वाटले नव्हते. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन होईल, अशी सुतराम शक्यता नव्हती. मात्र, मुख्यमंत्री पदाच्या वादावर शिवसेना-भाजप युती तुटली. त्यामध्ये राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा हात नव्हता. शरद पवार साहेब तोडण्याच नाही तर जोडण्याच काम नेहमी करतात. हे त्रिवार सत्य आहे. पवार साहेबांनी पुढाकार घेतला नसता, तर राज्य माहाविकास आघाडी जन्मालाच आली नसती, असे त्यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब बोडके म्हणाले की, केंद्र, राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर अनेक नगरसेवकांवर दबाव आणून पक्षांतर करवून घेतले गेले, त्यामुळे भाजप महापालिकेमध्ये सत्तेत आली. मात्र, व्हीजन नसल्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या गावांसह शहराच्या विकासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसने थेट नागरिकांशी संवाद सुरू केला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष असणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मंडई विद्यापीठ कट्टाचे संस्थापक अध्यक्ष
बाळासाहेब मालुसरे यांनी मागिल सात वर्षांपासून दर शनिवारी सर्व क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र आणून वैचारिक देवाणघेवाण सुरू ठेवली आहे. आतापर्यंत कट्टावर अडीच हजारहून अधिक मान्यवरांनी शहरातील विविध विषयावर संवाद साधला आहे. शहरीकरण आणि शहराच्या पाऊलखुणांचा आढावा घेतला जातो. तसेच राजकारणाच्या दृष्टीने पुणे शहर किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरातील प्रमुख पदाधिकारी आमंत्रित केले होते. व्हीजन २०२२ महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका कशी असणार आहे, याविषयावर चर्चा झाली. एक एक करून सर्व प्रमुख पक्षाना कट्टावर आमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

वापरलेल्या घातक खाद्यतेलांचा काळाबाजार , अन्नसाखळीत पुनर्प्रवेशाची शक्यता .

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्विक फूड डिलीव्हरी चेन आणि फूड बिझनेस ऑपरेटर यांनी टाकलेले तेल अनेक वेळा अनियंत्रित बाजारातील भेसळखोरांद्वारा ब्लिचिंग करून आणि ताज्या तेलामध्ये भेसळ म्हणून

Read More »
agralekh

शासनाच्या सहाय्यक योजना नक्कीच दिलासा देणाऱ्या ठरोत

पीएम केअर फॉर चिल्ड्रन या योजनेअंतर्गत कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या मुलांचे भवितव्य अधांतरी राहूनये यासाठी दर महिन्याला केंद्र सरकारने मदत देण्याची योजना आखली. त्याच प्रमाणे

Read More »

“इंजिनिअर्स जगत असतात , प्रत्येक कल्पक क्षण – 60X60X7X 24”

नुकताच “इंजिनीअर्स डे” जगभर साजरा झाला.सकाळपासून ढीगभर शूभेच्छा फिरत होत्या.कांहीं उपहासात्मक जोक्स पण येत होते.असे वाटले की आजचा दिवस खरं म्हणजे आपला मानाचा दिवस आहे.सकाळी

Read More »
agralekh

लाखोंचा पोशिंदा जगाला तर आपण जगू हे ध्यानात घेऊ या

आपण थांबलो, कारागीर थांबला, कष्टकरी थांबला, उद्योगधंद्यात मंदी आली अशा कितीतरी गोष्टींवर कोरोनामुळे मंदावल्या/थाबल्या हे सर्वांना माहीत आहे. स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेकांनी विविध मार्ग

Read More »

“मेरे अपने” …

मी सोलापूर येथे 1980 साली मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला शिकत होतो.भरपूर खेळणे जास्त करून क्रिकेट ग्राऊंडवर असणे ,खूप पिक्चर पाहणे, हॉस्टेल मधील बेफिकीर धम्माल

Read More »

शाळा उघडण्यासाठी आंदोलन का करत नाही सामान्यजनांची हाक- आता तरी… गरिबांच्या मुलांसाठी शाळा उघडा

अशोक बालगुडे पुणे, प्रतिनिधी“आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो. तितकेच महत्त्व शिक्षण प्रसार यांना दिले पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय आपल्याला माऱ्यांच्या जागा काबीज करता येणार नाहीत

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place