हडपसर-सासवड रस्त्यावर दुचाकी-ट्रकच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू


पुणे, प्रतिनिधी
हडपसर-सासवड रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरून ट्रकखाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंतरवाडीजवळील हॉटेलसमोर शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) रोजी झाला. ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

इस्माईल ईलाही मुजावर (वय ३६, रा. भेकराईनगर ) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. सचिन विलास डोळसे (वय ३५, रा. उरुळी देवाची, खंडोबावाडी ) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ट्रकचालक दिवानजी शिवाजी मांढरे (वय २४, रा. हाथवे बु।।, सणसवाडी, ता. भोर, जि. पुणे) याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सांगितले. की, इस्माइल मुजावर दुचाकीवर हडपसर-सासवड रस्त्यावरून मंतरवाडीकडून पुण्याकडे जात होते, त्यावेळी खड्ड्यामध्ये घसरून दुचाकी पडली. दरम्यान, पाठीमागून आलेला ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने दुचाकीला अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीचालकाचा मृत्यू झाला असून, ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.


राष्ट्रीय महामार्ग विभागाला आणखी किती बळी हवेत
मागिल आठवड्यात संततधार पावसामुळे हडपसर-सासवड रस्त्याची दुर्दशा झाली आहे. खड्डे आणि चिखलमय रस्त्यामुळे दुचाकी घसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी एक दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एकाचा बळी गेला आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग रस्त्याचे डांबरीकरण करणार आहे, असा संतप्त सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

वापरलेल्या घातक खाद्यतेलांचा काळाबाजार , अन्नसाखळीत पुनर्प्रवेशाची शक्यता .

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्विक फूड डिलीव्हरी चेन आणि फूड बिझनेस ऑपरेटर यांनी टाकलेले तेल अनेक वेळा अनियंत्रित बाजारातील भेसळखोरांद्वारा ब्लिचिंग करून आणि ताज्या तेलामध्ये भेसळ म्हणून

Read More »
agralekh

शासनाच्या सहाय्यक योजना नक्कीच दिलासा देणाऱ्या ठरोत

पीएम केअर फॉर चिल्ड्रन या योजनेअंतर्गत कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या मुलांचे भवितव्य अधांतरी राहूनये यासाठी दर महिन्याला केंद्र सरकारने मदत देण्याची योजना आखली. त्याच प्रमाणे

Read More »

“इंजिनिअर्स जगत असतात , प्रत्येक कल्पक क्षण – 60X60X7X 24”

नुकताच “इंजिनीअर्स डे” जगभर साजरा झाला.सकाळपासून ढीगभर शूभेच्छा फिरत होत्या.कांहीं उपहासात्मक जोक्स पण येत होते.असे वाटले की आजचा दिवस खरं म्हणजे आपला मानाचा दिवस आहे.सकाळी

Read More »
agralekh

लाखोंचा पोशिंदा जगाला तर आपण जगू हे ध्यानात घेऊ या

आपण थांबलो, कारागीर थांबला, कष्टकरी थांबला, उद्योगधंद्यात मंदी आली अशा कितीतरी गोष्टींवर कोरोनामुळे मंदावल्या/थाबल्या हे सर्वांना माहीत आहे. स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेकांनी विविध मार्ग

Read More »

“मेरे अपने” …

मी सोलापूर येथे 1980 साली मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला शिकत होतो.भरपूर खेळणे जास्त करून क्रिकेट ग्राऊंडवर असणे ,खूप पिक्चर पाहणे, हॉस्टेल मधील बेफिकीर धम्माल

Read More »

शाळा उघडण्यासाठी आंदोलन का करत नाही सामान्यजनांची हाक- आता तरी… गरिबांच्या मुलांसाठी शाळा उघडा

अशोक बालगुडे पुणे, प्रतिनिधी“आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो. तितकेच महत्त्व शिक्षण प्रसार यांना दिले पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय आपल्याला माऱ्यांच्या जागा काबीज करता येणार नाहीत

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place