पुणे मेट्रोमध्ये विविध पदांसाठी भरती

 •  महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maharashtra Metro Rail Corporation LTD) अंतर्गत येणाऱ्या पुणे मेट्रो (Pune Metro) प्रकल्पासाठी सुरू असलेल्या कार्यासाठी रिक्त पदांसाठी भरती (Recruitment) प्रक्रिया होत आहे.
 • यासाठी अनुभवी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. या भरती प्रक्रियेसाठी पुणे मेट्रोकडून इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
 • यामध्ये उपमहाव्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता, अकाऊंट असिस्टंट या पदांचा समावेश आहे.

पदाचे नाव – उपमहाव्यवस्थापक (Dy. General Manager – Finance E3

 • रिक्त पदांची संख्या – 2
 • वयोमर्यादा – कमाल 45 वर्षे

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (Jr.Engineer – Signal and Telecom S1)

 • रिक्त पदांची संख्या – 2
 • वयोमर्यादा – कमाल 32 वर्षे

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (Jr.Engineer – Mechanical S1)

 • रिक्त पदांची संख्या – 2
 • वयोमर्यादा – कमाल 32 वर्षे

पदाचे नाव – अकाऊंट असिस्टंट (Account Assistance – Fin – NS4)

 • रिक्त पदांची संख्या – 5
 • वयोमर्यादा – कमाल 32 वर्षे

अर्ज कसा करावा 

ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होत असून अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 15 मे 2021 आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवार अर्जाच्या नमुन्यासह आवश्यक कागपत्र जोडून आपला अर्ज सादर करु शकतात. अपात्र आणि अपूर्ण अर्ज भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

या भरती प्रक्रियेच्या संदर्भातील अधिक माहितीसाठी महामेट्रोच्या www.mahametro.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. भरती प्रकियेसाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी. संपूर्ण जाहिरात आणि अर्जाचा नमूना www.mahametro.org येथे पहायला मिळेल.

निवड प्रक्रिया

अर्ज केल्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना ई-मेल द्वारे कळवण्यात येईल. यानंतर या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल. उमेदवाराला मुलाखतीसाठी तारीख आणि वेळ देण्यात येईल आणि त्यावेळी सर्व कागदपत्रे, प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह उमेदवाराने मुलाखतीच्या ठिकाणी हजर रहावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट यांच्या वतीने 300 लोकांना पुरेल एवढं राशन

हडपसर, ” कारोना पाठोपाठ आलेल्या निसर्गाच्या प्रकोपाला पुन्हा एकदा पुण्यातील डॉक्टर पुढे सरसावले आहेत यामध्ये पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट ,पुणे यांच्या

Read More »

आश्रमशाळेतील इ. 8 वी ते 12 वी चे वर्ग 2 ऑगस्ट पासून होणार सुरु

नाशिक, ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.            कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार

Read More »
agralekh

प्रशासनाचा वृद्धांसाठी स्वतंत्र कक्ष दिलासा देणारा ठरावा

पूर्वी म्हातापणाची काठी म्हणून मुलांकडे पाहिले जात होते. काळ बदलला, एकत्र कुटुंब पध्दत जावून काळच्या गरजेनुसार विभक्त कुटुंब पध्दतीचा स्विकार केला गेला. तर काही कुटुंबात

Read More »

हडपसर-सासवड रस्त्यावर दुचाकी-ट्रकच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

पुणे, प्रतिनिधीहडपसर-सासवड रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरून ट्रकखाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंतरवाडीजवळील हॉटेलसमोर शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) रोजी झाला. ट्रकचालकाला ताब्यात

Read More »

‘या’ शाळेत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने मैत्रीदिन साजरा

पुणे, प्रतिनिधी आपल्या देशात रोज कोणता ना कोणता दिन ‘खास’ दिन म्हणून साजरा केला जातो. आज अमका दिन उद्या फलाणा दिन सरकारतर्फे किंवा खासगीरीत्या साजरा

Read More »

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची कर्जमुक्ती व वीजबिल माफी हवेत- विठ्ठल पवार राजे

नवी दिल्ली,केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती आणि वीजबिलमाफीची घोषणा केवळ राजकीय फायद्यासाठी केली होती. त्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे,

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place