नव्या Covid रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

पुणे, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाने (Coronavirus) हाहाकार माजवला आहे. वाढती रुग्णसंख्या, अपूरी आरोग्य सुविधा यामुळे नागरिकांची चिंता वाढली होती. दरम्यान एक सराकारात्मक बातमी समोर आली आहे. गेल्या 6 दिवसात शहरात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आजपासून लॉकडाऊन (Strict Lockdown) अधिक कडक असल्याने येत्या काही दिवसात ही संख्या अधिक कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या आठवड्यापासून पुण्यात कोरोनाबाधिकांच्या संख्येत बरीच घट पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार 16 ते 21 एप्रिल या दरम्यान शहरात सुमारे 27 हजार 694 रुग्ण सापडले असून बरे झालेल्यांची संख्या 35 हजार 175 इतकी आहे.

गेल्या 24 तासात 4539 पाझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून 4851 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात 80 रुग्णांचा मृत्यू झाला असून यापैकी  24 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. 1313 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 387030 असून ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 51552 इतकी आहे.

– एकूण मृत्यू -6330.

  • आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 329148.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 22277

बरे होणाऱ्यांची संख्या अधिक…

  • 16 एप्रिल – नवीन रुग्ण 5373 – बरे झालेले 5049
  • 17 एप्रिल – नवीन रुग्ण 6006 – बरे झालेले 5609
  • 18 एप्रिल – नवीन रुग्ण 6634 – बरे झालेले 4712
  • 19 एप्रिल – नवीन रुग्ण 4587 – बरे झालेले 6473
  • 20 एप्रिल – नवीन रुग्ण 5138 – बरे झालेले 6802
  • 21 एप्रिल – नवीन रुग्ण 5529 – बरे झालेले 6530
  • 22 एप्रिल – नवीन रुग्ण 4539 – बरे झालेले 4851

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा, मुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबई : मराठा(Maratha) समाजाच्या आरक्षणासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांसोबत राज्यपालांची(Governor) भेट घेतली. केंद्र व राष्ट्रपतींना (Presidents)विनंती करण्यासाठी राज्यपालांची भेट

Read More »
rickshaw-drivers-Start-Jugaad-Ambulance

पुण्यात रुग्णांसाठी धावून आली ‘जुगाड अँब्युलन्स’

पुणे, कोरोनाच्या वाढत्या भयानक परिस्थितीमुळे आरोग्य (Health)यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. एकीकडे ऑक्सिजनची(Oxygen) कमी आहे. तर दुसरेकडे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सची(Ambulance) व्यवस्था करणेही

Read More »
Kali Mati

‘काळी माती’ चित्रपटाला 135 दिवसांत 159 विक्रमी पुरस्कार

हेमंतकुमार (Hemantkumar)महाले दिग्दर्शित-निर्मित काळी माती या चित्रपटाने (Cinema)केवळ 135 दिवसांत (Days)159 पुरस्कारांवर (Awards) मोहोर उमटवली आहे. हा एक प्रकारचा जागतिक विक्रम असल्याचा दावा यावेळी दिग्दर्शक

Read More »
Mucormycosis

विदर्भात म्युकरमायकोसीस आजाराचा शिरकाव

अमरावती : राज्यात कोरोनाचा(corona) कहर किंचित प्रमाणात कमी होताना दिसत आहे. म्हणून काही दिवसात राज्याला दिलासा मिळेल अशी आशा असतानाच एका वेगळ्या आजाराने पुन्हा डोके वर

Read More »
infections in children

पुण्यात लहान मुलांना सर्वाधिक कोरोनाची लागण

पुणे : कोरोनाच्या(Corona) तिसर्‍या लाटेमुळे लहान मुलांमध्ये संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज्यातील काही बालरोग

Read More »

कोंढव्यातील दोन बड्या बेकायदेशीर इमारती होणार जमिनदोस्त

पुणे,  कोंढवा (Kondwa) परिसरात क्लोवर हायलॅंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून (Clover Highlands Cooperative Society) बांधलेल्या दोन 22 मजली इमारती जमिनदोस्त करण्याचा आदेश पुणे सिव्हील कोर्टाकडून (Civil Court)

Read More »