पुण्यात रुग्णांसाठी धावून आली ‘जुगाड अँब्युलन्स’

पुणे, कोरोनाच्या वाढत्या भयानक परिस्थितीमुळे आरोग्य (Health)यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. एकीकडे ऑक्सिजनची(Oxygen) कमी आहे. तर दुसरेकडे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सची(Ambulance) व्यवस्था करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे पुण्यात अँब्युलन्ससाठी एक भन्नाट जुगाड करण्यात आला आहे. पुण्यात रिक्षावाला फोरम संघटनेने रिक्षांचे(Riksha) रुपांतर तात्पुरत्या अँब्युलन्समध्ये केले आहे. आणि अँब्युलन्सला जुगाड अँब्युलन्स असे नाव दिले आहे. विशेष म्हणजे रुग्णांना योग्य वेळी ऑक्सिजन सोय उपलब्ध व्हावी यासाठी यासाठी रिक्षामध्ये ऑक्सिजन सिलेंडरही बसवण्यात आला आहे. सध्या या जुगाड अँब्युलन्सची पुण्यात खूप चर्चा सुरु आहे.

पुण्यात सुरु असलेली कोरोनाची भयंकर परिस्थिती पाहता रुग्णांची मदत करण्यासाठी पुण्यातील रिक्षावाला फोरम संघटनेने त्यांच्या रिक्षांचे रुपांतर तात्पुरत्या अँब्युलन्समध्ये केले आहे. अँब्युलन्स प्रमाणे रिक्षामध्ये ऑक्सिजन सिलेंडर,सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे.अँब्युलन्ससाठी हेल्पलाईन नंबरही देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रिक्षाचालकालाही पीपीई किट देण्यात आले आहेत व रिक्षाचालकाला ट्रेनिंगही देण्यात आले आहे.

पुण्यात सध्याची परिस्थितीही अनपेक्षित व असामान्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपायही काहीसा अनपेक्षित आणि असामान्य असायला हवा यासाठी जुगाड अँब्युलन्स हा उपक्रम आम्ही राबवत असल्याचे रिक्षा संघटनेने सांगितले. रुग्णालयात भरती होणारा रुग्ण हा बऱ्याचदा रिक्षामधू रुग्णालयात जातो. मात्र बऱ्याचदा रिक्षामधून जात असतानाच रुग्णांची परिस्थिती बिघडते. कधी ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णांचे हाल होतात. त्यामुळे केवळ ऑक्सिजन मिळेपर्यंत रुग्णांना जुगाड अँब्युलन्सचा उपयोग होईल,असेही त्यांनी सांगितले.

जुगाड अँब्युलन्ससाठी सरकारने ठरवून दिलेली रिक्षाची भाडी आकारली जातात. ऑक्सिजनसाठी तासाला १०० रुपये आकारले जातात. त्याचबरोबर ऑक्सिजन मास्कचे शंभर रुपये वेगळे आकारले जातात. त्यामुळे ३००-४०० रुपयात ही जुगाड अँब्युलन्स रुग्णांचा मदतीसाठी धावून येत आहे. पुणे चिंचवडच्या काही परिसरात या जुगाड रिक्षा रुग्णांना मदत करत आहेत.

1 thought on “पुण्यात रुग्णांसाठी धावून आली ‘जुगाड अँब्युलन्स’”

  1. Pingback: पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस पुण्यात दाखल | vsabha.com | News, Political Guide, City Guide

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

नोंद घ्यावी अशी सिल्व्हर क्रेस्ट स्कूल मधील ऑनलाईन शिक्षण पद्धत

सध्या अचानक उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून शाळा बंद आहेत.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचणं कठीण झालंय.पण हे जरी खरं असलं तरी शासनाने वेळीच राबवलेल्या online

Read More »
agralekh

वेळचं नाही-अग्रलेख

संभ्रमात पडलात ना ! वेळच नाही हे छोटेखानी वाक्य एकूण, अहो अशीच काहींशी परिस्थिती सध्या चालू आहे. कामात व्यस्त असणारे आणि नसणारी मंडळी सुद्धा सर्रास

Read More »

बारावीच्या विद्यार्थ्यांची गणिताची भीती दूर व्हावी- प्रा. बोराडे

पुणे ः प्रतिनिधी बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये गणिती संकल्पना रुजावी, तसेच गणित संज्ञा स्पष्ट होऊन गणित विषयाची भीती दूर होऊन आवड निर्माण झाली पाहिजे. प्रश्नमंजुषाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील

Read More »

थोपटेवाडी येथे बैलगाडा शर्यती प्रकरणी पोलिसांची कारवाई

नीरा , थोपटेवाडी (ता.पुरंदर ) येथे एका माळरानावर बेकायदा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी यावर कारवाई करून दहा बैलगाडे व बारा मोटार सायकल

Read More »

पायी वारीबाबत वारकऱ्यांच्या आशा पल्लवीत

पुणे : प्रतिनिधीकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी शासन सांगेल, त्या संख्येत संपूर्ण पायी व्हावी, अशी अद्यापही वारकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, यंदाही राज्य सरकारने वाहनांनी त्या

Read More »