प्रशासनाचा वृद्धांसाठी स्वतंत्र कक्ष दिलासा देणारा ठरावा

पूर्वी म्हातापणाची काठी म्हणून मुलांकडे पाहिले जात होते. काळ बदलला, एकत्र कुटुंब पध्दत जावून काळच्या गरजेनुसार विभक्त कुटुंब पध्दतीचा स्विकार केला गेला. तर काही कुटुंबात “हम दो हमारे दो” एवजी हम दो और हमारा एक ही संकल्पना रुजल्या गेली. त्यातही नोकरी निमित्ताने जास्त पगाराची अपेक्षाने आपला एक मुलगा तोहि परदेशात स्थायिक होण्याचा मार्ग अवलंबू लागला त्यामुळे सहाजिकच वृद्धपणी एकाकी राहाण्याची वेळ येत आहे.

हा एकाकीपणा उतार वयात असाहाय्य होतो आहे असेही अधूनमधून ऐकण्यात येते आहे.
मागील काही वर्षात वृद्ध नागरिकांचे अनेक प्रश्न मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. त्याचे निराकरण होणे गरजेचे असल्याने वृद्धांना तक्रार दाखल करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील समाजकल्याण कार्यालयात खास वृद्धांसाठी म्हणून स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे व ते कार्यरत केले आहेत ही नक्कीच दिलासा देणारे आहे.

आपल्या मुलां प्रतीच्या कर्तव्यात कुठलीही कमतरता न ठेवता, वेळप्रसंगी स्वतः च्या पोटाला चिमटा काढून त्यांना पालक घडवितात. पण काही मुलांना आपल्या पालकांच्या अपरिमित कष्टाची जाणीव असते. अशी मुलं आणि त्यांचे कुटुंब या मंडळींवर जीवापाड प्रेम करत त्यांची सर्वतोपरी काळजी घेतात. मात्र, काही ठिकाणी कुटुंबातील मुलं वृद्ध नागरिकांकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात. मग त्यांचा उतारवयातला जीवनप्रवास विरह आणि असंख्य समस्यांनी भरलेला असतो. आरोग्य संबधात अनेक समस्या समोर असतात यात धक्कादायक बाब म्हणजे अशा नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे याची आज गरज होतीच.कायद्याचा आधार घेत या तक्रारींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सामाजिक न्याय विभागाकडून केला जाणार आहे.

मुले सांभाळ करत नसतील तर अशा वृद्धांंच्या तक्रारींची सुनावणी घेण्याचे, त्यांना पोटगी मिळवून देण्याचे अधिकार कायद्याने महसूल विभागातील विभागीय प्रांत अधिकाऱ्यांना आहेत. अनेक सरकारी योजनांमध्ये वृद्धांना खास सवलती आहेत, पण याची माहितीच नसल्याने त्यासाठी कोणीही दावा करत नव्हते, किंवा तक्रारही दाखल करत नसत.

त्यामुळेच समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पुढाकार घेत या स्वतंत्र कक्षाची योजना तयार केली. त्यानुसार आता प्रत्येक जिल्हा कार्यालयात हा कक्ष असलेल वरिष्ठ लिपिक दर्जाचा अधिकारी कक्षाचा प्रमुख असेल. आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल तो घेईल. त्यासाठी कायद्याच्या आधारे पाठपुरावा करेल व तक्रारीचे निवारण करून घेईल.


सरकारी योजनांची माहितीही त्याच्याकडून वृद्ध नागरिकांना दिली जाईल. तक्रारदार व सरकारी यंत्रणा यांच्यातील समन्वयक म्हणून तो काम करेल. यामुळे वृध्द व निराधार व्यक्तींना आधार मिळेल व उर्वरित आयुष्यत सुखसमाधान मिळू शकेल असे वाटते. – सुधीर मेथेकर, मुख्य संपादक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

वापरलेल्या घातक खाद्यतेलांचा काळाबाजार , अन्नसाखळीत पुनर्प्रवेशाची शक्यता .

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्विक फूड डिलीव्हरी चेन आणि फूड बिझनेस ऑपरेटर यांनी टाकलेले तेल अनेक वेळा अनियंत्रित बाजारातील भेसळखोरांद्वारा ब्लिचिंग करून आणि ताज्या तेलामध्ये भेसळ म्हणून

Read More »
agralekh

शासनाच्या सहाय्यक योजना नक्कीच दिलासा देणाऱ्या ठरोत

पीएम केअर फॉर चिल्ड्रन या योजनेअंतर्गत कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या मुलांचे भवितव्य अधांतरी राहूनये यासाठी दर महिन्याला केंद्र सरकारने मदत देण्याची योजना आखली. त्याच प्रमाणे

Read More »

“इंजिनिअर्स जगत असतात , प्रत्येक कल्पक क्षण – 60X60X7X 24”

नुकताच “इंजिनीअर्स डे” जगभर साजरा झाला.सकाळपासून ढीगभर शूभेच्छा फिरत होत्या.कांहीं उपहासात्मक जोक्स पण येत होते.असे वाटले की आजचा दिवस खरं म्हणजे आपला मानाचा दिवस आहे.सकाळी

Read More »
agralekh

लाखोंचा पोशिंदा जगाला तर आपण जगू हे ध्यानात घेऊ या

आपण थांबलो, कारागीर थांबला, कष्टकरी थांबला, उद्योगधंद्यात मंदी आली अशा कितीतरी गोष्टींवर कोरोनामुळे मंदावल्या/थाबल्या हे सर्वांना माहीत आहे. स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेकांनी विविध मार्ग

Read More »

“मेरे अपने” …

मी सोलापूर येथे 1980 साली मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला शिकत होतो.भरपूर खेळणे जास्त करून क्रिकेट ग्राऊंडवर असणे ,खूप पिक्चर पाहणे, हॉस्टेल मधील बेफिकीर धम्माल

Read More »

शाळा उघडण्यासाठी आंदोलन का करत नाही सामान्यजनांची हाक- आता तरी… गरिबांच्या मुलांसाठी शाळा उघडा

अशोक बालगुडे पुणे, प्रतिनिधी“आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो. तितकेच महत्त्व शिक्षण प्रसार यांना दिले पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय आपल्याला माऱ्यांच्या जागा काबीज करता येणार नाहीत

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place