मागिल चार दिवसांपासून पावसाची हजेरी


अशोक बालगुडे

पुणे,मागिल चार दिवसांपासून दररोज दिवसभर उकाडा आणि सायंकाळनंतर पावसाची हजेरी सुरू झाली आहे. दिवसभर उकाड्याने हैराण होऊन घामाघूम झालेल्या नागरिकांना दिलासादायक ठरत आहे. मात्र, भाजीविक्रेत्यांसह चाकरमान्यांची मात्र तारांबळ उडत आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनने अद्याप कडक निर्बंध उठविले नाहीत. त्यामुळे दुकाने बंद असल्याने नागरिकांची आणि वाहनांची दुपारनंतर रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी दिसत आहे.

वाहतूक नियमन करण्यासाठी वाहतूक सज्ज आहेत. मात्र, वाहनांची गर्दीच नाही, त्यामुळे ही मंडळीसुद्धा कंटाळवाणे होऊन एका बाजूला थांबलेली पाहायला मिळत आहेत. खच्चून गर्दी आणि त्यात सिग्नल बंद आणि पावसाची रीपरीप सुरू हा प्रकार दुर्मिळ झाला आहे.
मागिल चार दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यामुळे हडपसर परिसरातील फ्लेक्स आणि होर्डिंग्जबरोबर वृक्षांच्या फांद्या आणि काही वृक्षही जमीनदोस्त झाले. सायंकाळी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली.


हडपसर, रामटेकडी, केशवनगर, मुंढवा, घोरपडी, मांजरी, शेवाळेवाडी, फुरसुंगी, उरुळी देवाची, लोणी काळभोर, उरुळी कांचन परिसरात पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कोरोना महामारीमुळे मागिल दोन महिन्यांपासून नागरिक कमालीचे त्रासले आहेत. नातेवाईकांसह मित्र, शेजाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात त्यांची दमछाक होत आहे. अनेक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड आणि रेमडिसिव्ह इंजेक्सन मिळत नाही, अशी कठीण परिस्थिती होती ती काहीशी कमी झाली आहे.

त्यातच घरामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले असल्यामुळे प्रत्येकजण घराबाहेर पडण्यास नकार देत आहे. वातावरणात मोठा बदल झाला आहे, त्यामुळे थंडी-ताप, अंगदुखीचे आजार वाढतात की काय, अशी भीतीही सतावू लागली आहे.


मांजरी खुर्दमधील शेतकरी अशोक आव्हाले म्हणाले की, कोलवडी, आव्हाळवाडी, केसनंद, वाघोली, वाडेबोल्हाई, साष्टे, लोणी काळभोर, थेऊर, फुरसुंगी, साडेसतरानळी, केशवनगर परिसरात सोसाट्याच्या वादळामुळे आंब्याचे नुकसान झाले. ऊसाचे पिक आडवे झाले आहे. शेतामध्ये पावसाचे पाणी साचले, तर काही ठिकाणी घळ पडून बांध फुटल्याने पिकासह शेतीचा लोणा वाहून गेला आहे. काही ठिकाणी वीज अखंडित झाला होता, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

आश्रमशाळेतील इ. 8 वी ते 12 वी चे वर्ग 2 ऑगस्ट पासून होणार सुरु

नाशिक, ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.            कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार

Read More »
agralekh

प्रशासनाचा वृद्धांसाठी स्वतंत्र कक्ष दिलासा देणारा ठरावा

पूर्वी म्हातापणाची काठी म्हणून मुलांकडे पाहिले जात होते. काळ बदलला, एकत्र कुटुंब पध्दत जावून काळच्या गरजेनुसार विभक्त कुटुंब पध्दतीचा स्विकार केला गेला. तर काही कुटुंबात

Read More »

हडपसर-सासवड रस्त्यावर दुचाकी-ट्रकच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

पुणे, प्रतिनिधीहडपसर-सासवड रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरून ट्रकखाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंतरवाडीजवळील हॉटेलसमोर शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) रोजी झाला. ट्रकचालकाला ताब्यात

Read More »

‘या’ शाळेत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने मैत्रीदिन साजरा

पुणे, प्रतिनिधी आपल्या देशात रोज कोणता ना कोणता दिन ‘खास’ दिन म्हणून साजरा केला जातो. आज अमका दिन उद्या फलाणा दिन सरकारतर्फे किंवा खासगीरीत्या साजरा

Read More »

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची कर्जमुक्ती व वीजबिल माफी हवेत- विठ्ठल पवार राजे

नवी दिल्ली,केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती आणि वीजबिलमाफीची घोषणा केवळ राजकीय फायद्यासाठी केली होती. त्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे,

Read More »

२०२२ मध्ये राष्ट्रवादीचा महापौर ; त्यासाठी समविचारी पक्ष आमच्या बरोबर : शहराध्यक्ष प्रशांत जगताप

पुणे, प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे महानगरपालिकेची निवडणूक सर्व प्रभागात स्वबळावर लढण्यासाठी ताकदीने उभी आहे. मात्र, राज्यात आम्ही महाविकास आघाडी म्हणून सत्तेत असल्याने सर्वप्रथम सत्ताधारी

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place