‘या’ शाळेत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने मैत्रीदिन साजरा

पुणे, प्रतिनिधी

आपल्या देशात रोज कोणता ना कोणता दिन ‘खास’ दिन म्हणून साजरा केला जातो. आज अमका दिन उद्या फलाणा दिन सरकारतर्फे किंवा खासगीरीत्या साजरा केला जातो. दिन कोणताही असो तो शाळेतील विद्यार्थी साजरा करतात. काही जागतिक दिन तर युनो किंवा युनेस्कोच्या आदेशाप्रमाणे रोज साजरे केले जातात. अर्थात हा खास साजरा करण्यामागे एक स्तुत्य हेतू असतो, असे मत प्रशालेच्या प्राचार्या कल्पना निलाखे यांनी व्यक्त केले.

जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव जलसंधारण मंत्री, प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रेरणेने हडपसर संकुलातील सिग्नेट पब्लिक स्कूलमध्ये पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने मैत्रीदिन साजरा केला. यावेळी इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनी कु.मयुरी उबाळे, गार्गी खूपसे, मृगजा धांगेकर यांनी वृक्ष आपले कसे जिवलग मित्र आहेत हे आपल्या वक्तृत्वातून पटवून दिले.

मैत्रीदिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी मोनोॲक्टद्वारे ऑनलाइन पद्धतीने मित्रांमधील नाते यावर आधारित नाटिका सादर केल्या. तसेच मैत्रीवर स्वलिखित कवितांचे वाचनही केले. प्राचार्या कल्पना निलाखे यांच्या मार्गदर्शनाखाली मैत्री दिन कार्यक्रम आयोजित केला होता. हडपसर संकुलाचे संचालक डॉ. संजय सावंत, व्ही. ए. बुगडे, उपप्राचार्या काकोली माहतो, मुख्याध्यापिका दिपाली शितोळे, पर्यवेक्षिका संगीता पाटील, रमा कापडी आदींनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता.

प्रशालेच्या प्राचार्या कल्पना निलाखे म्हणाल्या की, वृक्ष हेच आपले सगे – सोयरे व मित्र आहेत. वृक्ष आपल्याला खूप काही शिकवतात यांच्यातील गुण आपण आत्मसात करायला हवेत. “एक तरी झाड जगवा” या आजच्या युगाच्या संदेशाप्रमाणे आपण वागलो तर ही पृथ्वी पुन्हा हिरवाईने नटेल व आपणास बहु हाताने समृद्ध करेल, यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प केला. तसेच, शाळेच्या आवारातही वृक्षारोपणही केले, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

वापरलेल्या घातक खाद्यतेलांचा काळाबाजार , अन्नसाखळीत पुनर्प्रवेशाची शक्यता .

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्विक फूड डिलीव्हरी चेन आणि फूड बिझनेस ऑपरेटर यांनी टाकलेले तेल अनेक वेळा अनियंत्रित बाजारातील भेसळखोरांद्वारा ब्लिचिंग करून आणि ताज्या तेलामध्ये भेसळ म्हणून

Read More »
agralekh

शासनाच्या सहाय्यक योजना नक्कीच दिलासा देणाऱ्या ठरोत

पीएम केअर फॉर चिल्ड्रन या योजनेअंतर्गत कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या मुलांचे भवितव्य अधांतरी राहूनये यासाठी दर महिन्याला केंद्र सरकारने मदत देण्याची योजना आखली. त्याच प्रमाणे

Read More »

“इंजिनिअर्स जगत असतात , प्रत्येक कल्पक क्षण – 60X60X7X 24”

नुकताच “इंजिनीअर्स डे” जगभर साजरा झाला.सकाळपासून ढीगभर शूभेच्छा फिरत होत्या.कांहीं उपहासात्मक जोक्स पण येत होते.असे वाटले की आजचा दिवस खरं म्हणजे आपला मानाचा दिवस आहे.सकाळी

Read More »
agralekh

लाखोंचा पोशिंदा जगाला तर आपण जगू हे ध्यानात घेऊ या

आपण थांबलो, कारागीर थांबला, कष्टकरी थांबला, उद्योगधंद्यात मंदी आली अशा कितीतरी गोष्टींवर कोरोनामुळे मंदावल्या/थाबल्या हे सर्वांना माहीत आहे. स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेकांनी विविध मार्ग

Read More »

“मेरे अपने” …

मी सोलापूर येथे 1980 साली मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला शिकत होतो.भरपूर खेळणे जास्त करून क्रिकेट ग्राऊंडवर असणे ,खूप पिक्चर पाहणे, हॉस्टेल मधील बेफिकीर धम्माल

Read More »

शाळा उघडण्यासाठी आंदोलन का करत नाही सामान्यजनांची हाक- आता तरी… गरिबांच्या मुलांसाठी शाळा उघडा

अशोक बालगुडे पुणे, प्रतिनिधी“आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो. तितकेच महत्त्व शिक्षण प्रसार यांना दिले पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय आपल्याला माऱ्यांच्या जागा काबीज करता येणार नाहीत

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place