कोरोनामुळे यावर्षीही शाळा कुलुपबंद, पाऊस सुरू झाला पण, मुलांचा किलबिलाट नाही

अशोक बालगुडे,

पुणे, मागिल वर्षभरापासून कोरोना महामारीने थैमान घातल्यामुळे शाळा-महाविद्यालयांचे दरवाजे बंद झाले. पावसाने वेळेवर हजेरी लावली. मात्र, कोरोनाच्या भीतीने शाळा दुसऱ्यावर्षीही कुलुंपबंद असल्याने मुलांचा किलबिलाट ऐकू येणार नाही. रिक्षा-स्कूल बसची चाके जागेवर रुतली आहेत. लॉकडाऊन आणि कडक निर्बंधामुळे स्टेशनरी, गणवेशाची दुकानेही बंद आहेत. सुरुवातीला शाळा बंद असल्याचा मुलांनी आनंद लुटला असला तरी तो अवघ्या काही दिवसांत हवेत विरला. केव्हा एकदा शाळा सुरू होत्या, अशी विचारणा चिमुकल्यांकडून होऊ लागली आहे. मात्र, कोरोनाचे सावट हटायला तयार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शाळेत जाऊन अभ्यास करता येत नसला तरी मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने अभ्यास सुरू आहे. त्यामध्ये अनेकांच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत, त्यावर मात केली जात असल्याचे बोलले जात आहे.

उन्हाळ्याच्या सुटीनंतर सुरू होणाऱ्या शाळेच्या पहिल्या दिवसाची उबदार आठवण मागिल वर्षभरापासून हवेतच विरली जात आहे. नवीन शाळा, नवे सवंगडी, दप्तर, वह्या-पुस्तकं, पेन-पेन्सिल-कंपास अशा चिमुकल्यांच्या निरागस नजरेपलीकडचा शाळेचा पहिला दिवस शिक्षकांसाठीही नवेपण घेऊन येणाराच असतो. दोन दिवसांनी सुरू होणाऱ्या शाळांच्या ‘पहिलेपणाच्या’ निमित्तानं वर्तमानपत्राच्या रकान्याची जागा कोरोना महामारीने घेतली आहे, असे उपहासात्मक म्हणण्याची वेळ आली आहे.

जून उजाडला की, पालक, मुले व शिक्षकांना वेध लागतात ते शाळा सुरू होण्याचे. संपूर्ण महाराष्ट्रात १५ जून रोजी शाळा सुरू होतील. एकीकडे पालकांची नजर असते ती वरुणराजावर. एकदा पाऊस पडला की, खेड्यातील पालक मंडळी शेतीतील पीक लागवडीच्या कामात दिवसभर असतात. एकीकडे बी-बियाणे घेण्याची धावपळ, तर दुसरीकडे बाबा मला डझनभर वह्या, दोन पेन, कंपास, रंगकांड्या वगैरे हवंय, असं सांगणारी लहान मुलं. मुलांचं अख्खं भावविश्व त्या दप्तरात सामावलेलं असतं. ते परिपूर्ण असावं, यासाठी ती बाबा किंवा आईमागे हेका लावून धरतात व तेही आनंदाने पूर्ण करतात. त्या वेळी त्यांच्या मनात एकच भावना असते ती म्हणजे माझ्या लेकरानं माझ्यासारखं शेतकरी होऊ नये! महाराष्ट्र ही शैक्षणिक प्रयोगशाळा आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. या साऱ्यावर कोरोनाने पाणीच फिरवले आहे का, याचे उत्तर सध्या तरी अनुत्तरीतच आहे.

सातत नव्याचा घेत शोघ घेत नवे उपक्रम, प्रकल्प राबवून बालकेंद्रित शिक्षणपद्धतीद्वारे शिक्षणप्रकिया दुहेरी करण्याचा प्रयत्न दरवर्षी शिक्षक व मुले करतात. प्राथमिक शिक्षणात नेहमी बोलीभाषा ही अडचण दाखवली जाते व यामुळे मुले शिक्षणप्रवाहाबाहेर जातात, असे विधान बरेच जण करतात. मात्र, शिक्षणतज्ज्ञांशी झालेल्या चर्चेनंतर असं प्रकर्षाने जाणवलं की, भाषा ही शिकण्यातील अडचण असूच शकत नाही. मूल शाळेत येते तेव्हा ते भाषेच्या चार क्षेत्रांपैकी भाषण व श्रवण घेऊन आलेले असते. अशा वेळी शिक्षकांनी मुलांना बोलू दिले पाहिजे. समाज, कुटुंब व परिसरातून अनुभव घेऊन मूल शाळेत दाखल झालेलं असतं. पण आपली शिक्षणपद्धती शाळेत दाखल झालं की, लेखन व वाचन या दोनच क्षेत्रांवर शिक्षकांना भर द्यायला लावते. मी तरी यंदापासून मुलांना ऐकून घेणार आहे. बोलीभाषेसोबतच मुलांना व्यक्त होण्यासाठी कला हे एक वैश्विक माध्यम आहे. पहिल्या दिवशी मुले शाळेत आली की, त्यांच्या कलाविषयक आवडीनिवडी जाणून घेणे गरजेचे आहे. यातून मुलांचा स्वभाव व व्यक्तिमत्त्व समजून येतं. मुलांना कलेची आवड निर्माण व्हावी, यासाठी देशस्तरावर आर्ट इंटेग्रेटेड लर्निंग या नवीन महत्त्वाकांक्षी उपक्रमाची अंमलबजावणी होण्यास सुरुवात झाली आणि लॉकडाऊन पडले.

अलीकडच्या बदलत्या शिक्षणप्रवाहाविषयी : शिक्षण ही सातत्याने बदल होणारी प्रकिया आहे. बदललेल्या जागतिक परिप्रेक्ष्यातून शिक्षणाकडे बघायचे झाल्यास राज्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावलेला दिसतो. यात महत्त्वाची भूमिका बजावली ती अभ्यासक्रमाने. सद्य:स्थितीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८८, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० व राज्य पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ यानुसार राज्यातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ व शिक्षकांच्या विचारमंथनातून २०१३-२०१४पासून टप्प्याटप्प्याने इयत्तानिहाय नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात केली आहे. इयत्ता आठवी वगळता सातवीपर्यंत सर्व वर्गांचा अभ्यासक्रम बदलला आहे. बदललेल्या अभ्यासात पाठ्यपुस्तकाच्या आकाराची चर्चा होणे क्रमप्राप्त आहे.

सर्व मुलांकडे ए-४ आकाराचीच पुस्तके आता दिसायला लागलीत. याचा फायदा मुलांना शाळेत गोडी लावण्यासाठी झाला, हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. जुन्या पाठ्यपुस्तकात पाठ्यघटक किंवा पाठांचा नुसता भडिमार होता, आता तो अजिबात दिसत नाही. मोजकेच व आशयपूर्ण पाठ असलेली पुस्तके आता बघायला मिळतील. तसेच रचनावादी पद्धतीने व मुलांच्या सृजनशीलतेला चालना देण्याच्या दृष्टीने विविधांगी कृती, उपक्रम व स्वाध्यायांचा समावेश यात केलेला आहे. महाराष्ट्रातील शिक्षणप्रकिया एका स्थित्यंतरातून जात आहे. “प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र” या २०१५ मध्ये सुरू झालेल्या अभियानामुळे प्राथमिक शिक्षणाला संजीवनी मिळाली असून, यात सर्वात मोठा सहभाग आहे तो पालकांचा. पालकांनी ज्या पद्धतीने शिक्षकांवर व यंत्रणेवर विश्वास दाखविला, त्याचीच परिणती म्हणजे देशात प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या पाच राज्यांमध्ये येऊ शकला, ही बाब निश्चितच सर्वांसाठी आल्हाददायक आहे.

शिक्षकांचा पहिला दिवस
शिक्षणप्रकिया ही दुहेरी आहे, यात अध्ययन -अध्यापन या दोन क्रिया असतात. अध्ययन म्हणजे मुलांनी स्वतःहून शिकणे व अध्यापन म्हणजे शिक्षकाने शिकविणे. या दोघांची आंतरक्रिया वेळीच न झाल्यास त्याचा गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. यासाठी शिक्षकांसाठीसुद्धा शाळा सुरू होण्याचा पहिला दिवस महत्त्वाचा असतो. दीड-दोन महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर शाळेच्या प्रवाहात समरस होण्यासाठी शिक्षकांनी अनास्थेची जळमटं दूर सारणे गरजेचे असते. आज शिक्षकही खूप जोमाने व उत्साहाने काम करत आहेत. ज्ञानरचनावादी, कृतियुक्त अध्ययन पद्धती, डिजिटल वर्ग अशा नवनवीन शिक्षणप्रवाहाचा उपयोग करत आहेत.
शिक्षकांना खऱ्या अर्थाने शैक्षणिक प्रगल्भ करायचे झाल्यास त्यांनी स्वत:हून अधिकाधिक वाचन करणे गरजेचे आहे. यातही विशेषत: बालसाहित्य व शैक्षणिक संदर्भसाहित्य आवश्यक आहे. शाळेतील मुलांसोबत शिक्षकांचा पहिला दिवस पुस्तक, गणवेश वाटप, पहिलीच्या वर्गातील प्रवेश तर पाचवी व सातवी उत्तीर्ण मुलांच्या टी.सी. (शाळा सोडल्याचा दाखला) देण्यात जातो.

मुलांचा पहिला दिवस
बालपणापासून आईच्या कुशीत व कौटुंबिक वातावरणात वावरणाऱ्या छोट्या मुलांना प्रथमच दिवसभर कुटुंबातील सदस्यांविना म्हणजेच मुख्यत: आईविना राहावे लागते. अशा वेळी मुले भेदरलेली असतात. या भेदरलेल्या मानसिकतेतून बाहेर काढून शाळेची व शिक्षणप्रवाहाची गोडी लावण्याचे महत्त्वाचे काम शिक्षक करतात. या दिवशी काही शिक्षक मुलांना बैलगाडीत, स्वतःच्या चारचाकी किंवा दुचाकी, तर काही कडेवर घेऊन घेऊन येतात, हे दृश्य कोरोनामुळे मागिल वर्षभरापासून पाहयला मिळत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट यांच्या वतीने 300 लोकांना पुरेल एवढं राशन

हडपसर, ” कारोना पाठोपाठ आलेल्या निसर्गाच्या प्रकोपाला पुन्हा एकदा पुण्यातील डॉक्टर पुढे सरसावले आहेत यामध्ये पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट ,पुणे यांच्या

Read More »

आश्रमशाळेतील इ. 8 वी ते 12 वी चे वर्ग 2 ऑगस्ट पासून होणार सुरु

नाशिक, ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.            कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार

Read More »
agralekh

प्रशासनाचा वृद्धांसाठी स्वतंत्र कक्ष दिलासा देणारा ठरावा

पूर्वी म्हातापणाची काठी म्हणून मुलांकडे पाहिले जात होते. काळ बदलला, एकत्र कुटुंब पध्दत जावून काळच्या गरजेनुसार विभक्त कुटुंब पध्दतीचा स्विकार केला गेला. तर काही कुटुंबात

Read More »

हडपसर-सासवड रस्त्यावर दुचाकी-ट्रकच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

पुणे, प्रतिनिधीहडपसर-सासवड रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरून ट्रकखाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंतरवाडीजवळील हॉटेलसमोर शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) रोजी झाला. ट्रकचालकाला ताब्यात

Read More »

‘या’ शाळेत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने मैत्रीदिन साजरा

पुणे, प्रतिनिधी आपल्या देशात रोज कोणता ना कोणता दिन ‘खास’ दिन म्हणून साजरा केला जातो. आज अमका दिन उद्या फलाणा दिन सरकारतर्फे किंवा खासगीरीत्या साजरा

Read More »

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची कर्जमुक्ती व वीजबिल माफी हवेत- विठ्ठल पवार राजे

नवी दिल्ली,केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती आणि वीजबिलमाफीची घोषणा केवळ राजकीय फायद्यासाठी केली होती. त्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे,

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place