राज्य सरकार पुण्याबाबत दुजाभाव करत आहे-जगदीश मुळीक

पुणे ,  महाराष्ट्रात ज्या शहरांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. त्या शहरात राज्य सरकारच्या माध्यमातून दुजाभाव केला जात आहे. कोरोनाबाबत मदत असू द्या किंवा रेमडेसिवीर व लस असू द्या; प्रत्येक गोष्ठीतच राज्य सरकार दुजाभाव करत आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे. पुण्याच्या लसीकरणाबाबत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली.

येत्या 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू होणार आहे. याच्या नियोजनाबाबत आढावा घेण्यात आला. तसेच काही सूचना देखील करण्यात आल्या आहेत. 1 मे नंतर सर्व पुणेकरांना लस मिळाली पाहिजे. यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 1 तारखेनंतर जसजशी लस उपलब्ध होईल, तसतसे लसीकरण करण्याचे काम पुणे महापालिकेच्या माध्यमातून होणार आहे. मात्र लसीसाठी राज्य सरकार पुण्याबाबत दुजाभाव करत आहे. राज्य सरकारचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. पुण्यात ससून सोडून कुठेही राज्य शासनाच्यावतीने कोविडबाबत काम सुरू नाही, अशी टीका देखील यावेळी मुळीक यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे हे झोपी गेलेल्या अवस्थेत आहेत. घरातून बाहेर देखील पडत नाहीत. फक्त भाजपावर टीका करत आहेत. माझी त्यांना विनंती आहे की आपण केवळ टीका करण्यापेक्षा बाहेर येऊन लोकांमध्ये काम केलं पाहिजे. आजची परिस्थिती खूप भयंकर आहे. लोकांना व्हेंटिलेटर भेटत नाही. रेमडेसिवीर भेटत नाही. यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असेही यावेळी मुळीक म्हणाले.

‘पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षाचे प्रतिनिधी तिथे गेले होते. तिथे प्रचार करणे ही आमची जबाबदारी आहे. परंतु आमच्या प्रतिनिधींनी जाताना प्रभागातील लोकांना विविध आरोग्य सुविधा तसेच मदत केंद्र देखील सुरू ठेवले होते. त्यामुळे पश्चिम बंगलला प्रचाराला जाणे त्यात काही गैर नाही. महापालिकेची जबाबदारी ही प्राथमिक आरोग्य सुविधा देण्याची आहे. आम्ही कुठल्याही जबाबदारीपासून मागे हटत नाही. आम्ही पूर्ण क्षमतेने पुणेकरांना उपचार देत आहोत. तसेच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून 5 हजार सीसीसी बेड सुरू करण्यात येणार आहेत’

– जगदीश मुळीक


राज्य सरकारच्यावतीने ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत 1 मेपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्यातील कोरोनाची वाढती स्थिती पाहता अजून 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्यात येईल, असं सांगितलं जात आहे. राज्य सरकारने अजून 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला तर गोर गरोब, बारा बलुतेदार यांच्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी देखील मुळीक यांनी केली.

दरम्यान मी घराबाहेर पडतच नाही. अशी वैयक्तिक स्वरूपाची टीका विकृत मनोवृत्तीचे मनोरुग्ण जगदीश मुळीक यांनी केली आहे. असा आरोप आमदार चेतन तुपे यांनी केला आहे

मी कोरोना बाधित झाल्यामुळे रुग्णालयामध्ये ऑक्सीजन सपोर्ट वर होतो.आजही औषध उपचार सुरूच आहेत परंतु ज्यांना पुणेकरांच्या जीवनाची किंमतच नाही अशा भाजपा नेत्यांकडून व त्यांच्या मनोरुग्ण अध्यक्षांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार? पुणेकरांचे हाल होत आहेत, मृत्यू होत आहेत, त्याच्यावर उपाययोजना न करता यांना विकृत राजकारण करायचे आहे.मनोरुग्ण विकृत विचारसरणीचे भाजपायी व मुळीक लवकर बरे होवोत व पुणेकरांची व्यथा हाल-अपेष्टा मधून लवकर सुटका होवो एवढीच प्रार्थना.

-चेतन तुपे, आमदार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा, मुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबई : मराठा(Maratha) समाजाच्या आरक्षणासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांसोबत राज्यपालांची(Governor) भेट घेतली. केंद्र व राष्ट्रपतींना (Presidents)विनंती करण्यासाठी राज्यपालांची भेट

Read More »
rickshaw-drivers-Start-Jugaad-Ambulance

पुण्यात रुग्णांसाठी धावून आली ‘जुगाड अँब्युलन्स’

पुणे, कोरोनाच्या वाढत्या भयानक परिस्थितीमुळे आरोग्य (Health)यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. एकीकडे ऑक्सिजनची(Oxygen) कमी आहे. तर दुसरेकडे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सची(Ambulance) व्यवस्था करणेही

Read More »
Kali Mati

‘काळी माती’ चित्रपटाला 135 दिवसांत 159 विक्रमी पुरस्कार

हेमंतकुमार (Hemantkumar)महाले दिग्दर्शित-निर्मित काळी माती या चित्रपटाने (Cinema)केवळ 135 दिवसांत (Days)159 पुरस्कारांवर (Awards) मोहोर उमटवली आहे. हा एक प्रकारचा जागतिक विक्रम असल्याचा दावा यावेळी दिग्दर्शक

Read More »
Mucormycosis

विदर्भात म्युकरमायकोसीस आजाराचा शिरकाव

अमरावती : राज्यात कोरोनाचा(corona) कहर किंचित प्रमाणात कमी होताना दिसत आहे. म्हणून काही दिवसात राज्याला दिलासा मिळेल अशी आशा असतानाच एका वेगळ्या आजाराने पुन्हा डोके वर

Read More »
infections in children

पुण्यात लहान मुलांना सर्वाधिक कोरोनाची लागण

पुणे : कोरोनाच्या(Corona) तिसर्‍या लाटेमुळे लहान मुलांमध्ये संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज्यातील काही बालरोग

Read More »

कोंढव्यातील दोन बड्या बेकायदेशीर इमारती होणार जमिनदोस्त

पुणे,  कोंढवा (Kondwa) परिसरात क्लोवर हायलॅंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून (Clover Highlands Cooperative Society) बांधलेल्या दोन 22 मजली इमारती जमिनदोस्त करण्याचा आदेश पुणे सिव्हील कोर्टाकडून (Civil Court)

Read More »