“कोविड मुक्तीचा मार्ग” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

            मुंबई , निवृत्त विभागीय आयुक्त तसेच मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी कोरोना काळातील सर्व वाटचालीचे संकलन करून लिहिलेल्या  कोविड मुक्तीचा मार्ग या पुस्तकाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

            याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेले दीड-पावणेदोन वर्षांपासून आपण सर्वजण  कोविडचा मुकाबला करतो आहोत. या सगळ्या प्रवासात आपण वेगवेगळ्या समस्यांना तोंड दिले, वेगवेगळी आव्हाने स्वीकारली, अनेक पावले उचलली.  आज दुसऱ्या लाटेचा मुकाबला करत असताना तिसऱ्या संभाव्य लाटेची पण  शक्यता आहे, अशा वेळी आपल्या सर्व अनुभवांचे संकलन आवश्यक आहे. जेणेकरून पुढच्या येणाऱ्या पिढीला आपण या संकटाचा मुकाबला कसा केला त्या विषयी विस्तृत माहिती मिळू शकेल.

            कोविडच्या विषाणूमध्ये देखील उत्परिवर्तन होत आहे, आणि या विषाणूंच्या नवीन नवीन अवतारामुळे जगामध्ये आव्हाने उभी राहिली आहेत. आज आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये देखील परत एकदा  संसर्ग वाढताना दिसतो आहे. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना देखील संसर्ग होताना दिसत आहे. त्यामुळे आपल्याला खूप सावध राहावे लागेल आणि आरोग्याच्य्l नियमांचे चांगले पालन देखील करावे लागणार आहे.

             या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना कोरोनाविषयक कामासाठी पुढील चांगली दिशा मिळेल अशी आशा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

            सेवानिवृत्तीनंतर देखील स्वस्थ न बसता राज्य शासनाला या कोरोना संकटांमध्ये मदत करण्याच्या डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या वृत्तीचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले.

            प्रारंभी डॉ. म्हैसेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात कोविड मुक्तीचा मार्ग हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू सांगितला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

वापरलेल्या घातक खाद्यतेलांचा काळाबाजार , अन्नसाखळीत पुनर्प्रवेशाची शक्यता .

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्विक फूड डिलीव्हरी चेन आणि फूड बिझनेस ऑपरेटर यांनी टाकलेले तेल अनेक वेळा अनियंत्रित बाजारातील भेसळखोरांद्वारा ब्लिचिंग करून आणि ताज्या तेलामध्ये भेसळ म्हणून

Read More »
agralekh

शासनाच्या सहाय्यक योजना नक्कीच दिलासा देणाऱ्या ठरोत

पीएम केअर फॉर चिल्ड्रन या योजनेअंतर्गत कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या मुलांचे भवितव्य अधांतरी राहूनये यासाठी दर महिन्याला केंद्र सरकारने मदत देण्याची योजना आखली. त्याच प्रमाणे

Read More »

“इंजिनिअर्स जगत असतात , प्रत्येक कल्पक क्षण – 60X60X7X 24”

नुकताच “इंजिनीअर्स डे” जगभर साजरा झाला.सकाळपासून ढीगभर शूभेच्छा फिरत होत्या.कांहीं उपहासात्मक जोक्स पण येत होते.असे वाटले की आजचा दिवस खरं म्हणजे आपला मानाचा दिवस आहे.सकाळी

Read More »
agralekh

लाखोंचा पोशिंदा जगाला तर आपण जगू हे ध्यानात घेऊ या

आपण थांबलो, कारागीर थांबला, कष्टकरी थांबला, उद्योगधंद्यात मंदी आली अशा कितीतरी गोष्टींवर कोरोनामुळे मंदावल्या/थाबल्या हे सर्वांना माहीत आहे. स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेकांनी विविध मार्ग

Read More »

“मेरे अपने” …

मी सोलापूर येथे 1980 साली मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला शिकत होतो.भरपूर खेळणे जास्त करून क्रिकेट ग्राऊंडवर असणे ,खूप पिक्चर पाहणे, हॉस्टेल मधील बेफिकीर धम्माल

Read More »

शाळा उघडण्यासाठी आंदोलन का करत नाही सामान्यजनांची हाक- आता तरी… गरिबांच्या मुलांसाठी शाळा उघडा

अशोक बालगुडे पुणे, प्रतिनिधी“आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो. तितकेच महत्त्व शिक्षण प्रसार यांना दिले पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय आपल्याला माऱ्यांच्या जागा काबीज करता येणार नाहीत

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place