…..तर महाराष्ट्र खरंच महाराज्य बनून देशाचं आदर्श राज्य ठरेल !

टॉम अँड जेरी हा टीव्ही वरील आपण खेळ पाहिला असेल, ते जसे एकमेकांची खोडी काढून एकमेकांना पडण्याचा प्रयत्न करतात, तसाच काहींसा प्रकार राजकारणात सध्या दिसुन येत आहे असे म्हंटलं तर वावगं ठरु नये !

ही पुढारी मंडळी एखादा खोचक शब्द बोलताना बोलून जातात आणि मग शाब्दीक धुरळा उडायला सुरुवात होते. मग एका पेक्षा एक वरचढ असलेली नेतेमंडळी आपल्या भात्यातून ऐकऐक बाण सोडून एकमेकांना घायाळ करतात यामुळे मात्र नागरिकांची करमणूकच होते असेच म्हणावे लागेल.

“वाघा”च्या विषयावर तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा महाराष्ट्रचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातर आता सातत्याने कलगिरीतुरा एवढा रंगत आहे की थोडाही अवधी ते सोडत नाहीत. चंद्रकांत पाटील म्हणतात आम्ही पिंजऱ्यातीळ वाघ असा शब्द वापरतात तर संजय राऊत म्हणतात वाघ हा वाघच असतो, त्याच्या मिशीला तर हात लावून दाखवा ! असा खेळ चालू आहे.

अधूनमधून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीतरी टीका या त्रयीमैत्र सरकारवर करतात त्यावर मग सरकार मधील काहीं मंत्री मग तोफा डागतातात, तर काहीं वेळा महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे असा एखादा बॉम्ब गोळा टाकतात की राजकारणातील वातावरण एकदम ढवळून निघते आणि आरोप प्रत्यारोप चालू होतात आणि पुन्हा राजकिय वाकयुद्धास सुरू होते !

यातून कोणाला व कसा फायदा होणार ते हे नेतेच जाणो ! परंतु महाराष्ट्रासमोर आवासून उभ्या असलेल्या आरोग्य, शिक्षण, आर्थिक , सामाजिक समस्या सोडवायला हव्यात. हे प्रश्न सोडविण्यासाठी मात्र एकमेकांवर कुरघोडी करणं सोडून द्यावे लागेल. हे होत नसल्याने, एका व्यासपीठावर हे कधी येणार हाच प्रश्न नागरिकांना सतावत आहे ! तो आपण सर्वांनी एकत्र येऊन सोडवला तर महाराष्ट्र खरंच महाराज्य बनून देशाचं आदर्श राज्य ठरेल ! वाट बघूया या सुवर्णकाळाची !

सुधीर मेथेकर,
जेष्ठ पत्रकार

2 thoughts on “…..तर महाराष्ट्र खरंच महाराज्य बनून देशाचं आदर्श राज्य ठरेल !”

 1. Prof. TAUR. M. B.

  Very good Maharashtra political anyalesys.
  Writer of this artical suggested that in
  Indian Democrsy Government appointed by the people. Controlled by the people. and Dismissed by the people. But now days every body not aware about their right. Political party are only interested in Rule the state or nation on the majority support.Given by Citizens or voters but after election representetivs of Of people not protecting & achieving the Promises. Voters are not controlling the govt. Apposit party must protect the interstate of the people but they are interested only fall the govt. For Establish their govt.
  Democratic government of the people by the people and for the people. Now days definition has-been changed that is”Govt.off the People. Buy the people & faraway from the people.
  Congratulations Sudhir Methekar you have given attention on Gstste government& roll of Political partis & their leaders.
  keep it up.

  1. methekar sudhir

   Thank-you so much Sir for your comments (प्रतिसाद). Which is gives me a motivation.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट यांच्या वतीने 300 लोकांना पुरेल एवढं राशन

हडपसर, ” कारोना पाठोपाठ आलेल्या निसर्गाच्या प्रकोपाला पुन्हा एकदा पुण्यातील डॉक्टर पुढे सरसावले आहेत यामध्ये पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट ,पुणे यांच्या

Read More »

आश्रमशाळेतील इ. 8 वी ते 12 वी चे वर्ग 2 ऑगस्ट पासून होणार सुरु

नाशिक, ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.            कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार

Read More »
agralekh

प्रशासनाचा वृद्धांसाठी स्वतंत्र कक्ष दिलासा देणारा ठरावा

पूर्वी म्हातापणाची काठी म्हणून मुलांकडे पाहिले जात होते. काळ बदलला, एकत्र कुटुंब पध्दत जावून काळच्या गरजेनुसार विभक्त कुटुंब पध्दतीचा स्विकार केला गेला. तर काही कुटुंबात

Read More »

हडपसर-सासवड रस्त्यावर दुचाकी-ट्रकच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

पुणे, प्रतिनिधीहडपसर-सासवड रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरून ट्रकखाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंतरवाडीजवळील हॉटेलसमोर शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) रोजी झाला. ट्रकचालकाला ताब्यात

Read More »

‘या’ शाळेत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने मैत्रीदिन साजरा

पुणे, प्रतिनिधी आपल्या देशात रोज कोणता ना कोणता दिन ‘खास’ दिन म्हणून साजरा केला जातो. आज अमका दिन उद्या फलाणा दिन सरकारतर्फे किंवा खासगीरीत्या साजरा

Read More »

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची कर्जमुक्ती व वीजबिल माफी हवेत- विठ्ठल पवार राजे

नवी दिल्ली,केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती आणि वीजबिलमाफीची घोषणा केवळ राजकीय फायद्यासाठी केली होती. त्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे,

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place