कोरोनातून बरे झालेल्यांची योगाभ्यासाला पसंती

पुणे : प्रतिनिधी
कोरोना विषाणू संसर्गातून बरे झालेले रुग्ण योगाभ्यासाला पसंती देत आहेत. कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये प्रकृतीच्या दीर्घकाळापर्यंत तक्रारी दिसून येतात. तसेच मानसिक आरोग्याचे प्रश्नही भेडसावतात. त्यातून बाहेर पडण्यासाठी योगाभ्यास आणि प्राणायामाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे चित्र समोर आले आहे.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये श्वसन विकार, हृदयविकार, फुप्फुसांचे विकार दीर्घकाळापर्यंत आढळत आहेत. धाप लागणे, हृदयाचे ठोके वाढणे अशा तक्रारी रुग्णांकडून नोंदवण्यात येत आहेत. या तक्रारींवर मात करण्यासाठी योगाभ्यास उपयुक्त ठरत असल्याने रुग्ण त्याकडे वळत आहेत.

योगशिक्षक संजय भामे म्हणाले की, कोरोना संसर्ग झालेल्या तसेच करोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना या वर्षभरात योगाभ्यासाचे धडे दिले. रुग्णांना दिसणाऱ्या कोविड पश्चात लक्षणांबरोबरच भीती, नैराश्य असे त्रासही दिसत आहेत. योगाभ्यास पद्धतीतील काही आसने आणि प्राणायाम यांचा एकत्रित वापर रुग्णांना उपयुक्त ठरत आहे, ही बाब समाधान देणारी ठरत आहे.

मांजरीतील योगशिक्षक मधुकर कवडे यांनी सांगितले की, योगासनांमुळे शरीरातील सर्व पेशींमध्ये प्राणवायू पोहोचण्याची क्रिया सुलभ होते. योगाभ्यासामुळे तणावाचे व्यवस्थापन होते, तसेच पचनसंस्था, हृदयक्रिया सुरळीत राखणे शक्य होते. त्यामुळे करोनातून बरे झाल्यानंतर योगाभ्यास के ल्यास त्याचा उत्तम परिणाम दिसतो. कोरोनानंतर श्वसन संस्था आणि मानसिक आरोग्याचे प्रश्न गंभीर होतात. सौम्य ते मध्यम व्यायाम के ल्यास त्याचा उपयोग रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी होतो. योगासने आणि मुद्रा करताना श्वासांच्या सुखासन, सर्वागासन करण्यास प्राधान्य द्यावे. ज्यांना सूर्य नमस्कार करण्याची सवय आहे त्यांनी काळजीपूर्वक सूर्यनमस्कार घालावे. शरीराच्या ताकदीचा अंदाज घेऊन आसने करावीत. खूप थकवा असल्यास ओढून- ताणून आसने करू नयेत.

योगाभ्यास कसा करावा

  • योग प्रशिक्षकाशी शारीरिक आरोग्याचे प्रश्न, चिंता, भीती, नैराश्य याबाबत संवाद ठेवा.
  • योगासने आणि प्राणायाम असे समीकरण ठेवल्यास त्याचा उपयोग करोनातून बरे झाल्यानंतर प्रकृती स्वास्थ्य मिळवण्यासाठी होतो.
  • पोट किं वा छातीखाली आधार घेऊन के लेले शवासन, खुर्ची किं वा पलंग यांच्या आधाराने के लेले पूर्वोत्तानासन, पवनमुक्तासन, सुप्तबद्धकोनासन अशा आसनांचा उपयोग होतो.
  • करोनातून बरे झालेल्यांनी तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करावा. मनाने योगासने करू नयेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट यांच्या वतीने 300 लोकांना पुरेल एवढं राशन

हडपसर, ” कारोना पाठोपाठ आलेल्या निसर्गाच्या प्रकोपाला पुन्हा एकदा पुण्यातील डॉक्टर पुढे सरसावले आहेत यामध्ये पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट ,पुणे यांच्या

Read More »

आश्रमशाळेतील इ. 8 वी ते 12 वी चे वर्ग 2 ऑगस्ट पासून होणार सुरु

नाशिक, ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.            कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार

Read More »
agralekh

प्रशासनाचा वृद्धांसाठी स्वतंत्र कक्ष दिलासा देणारा ठरावा

पूर्वी म्हातापणाची काठी म्हणून मुलांकडे पाहिले जात होते. काळ बदलला, एकत्र कुटुंब पध्दत जावून काळच्या गरजेनुसार विभक्त कुटुंब पध्दतीचा स्विकार केला गेला. तर काही कुटुंबात

Read More »

हडपसर-सासवड रस्त्यावर दुचाकी-ट्रकच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

पुणे, प्रतिनिधीहडपसर-सासवड रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरून ट्रकखाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंतरवाडीजवळील हॉटेलसमोर शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) रोजी झाला. ट्रकचालकाला ताब्यात

Read More »

‘या’ शाळेत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने मैत्रीदिन साजरा

पुणे, प्रतिनिधी आपल्या देशात रोज कोणता ना कोणता दिन ‘खास’ दिन म्हणून साजरा केला जातो. आज अमका दिन उद्या फलाणा दिन सरकारतर्फे किंवा खासगीरीत्या साजरा

Read More »

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची कर्जमुक्ती व वीजबिल माफी हवेत- विठ्ठल पवार राजे

नवी दिल्ली,केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती आणि वीजबिलमाफीची घोषणा केवळ राजकीय फायद्यासाठी केली होती. त्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे,

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place