पुणे रेल्वे स्थानकावर परप्रांतीय प्रवाशांची लूट प्रकरण

पुणे, टाळेबंदीमुळे गावी परत जाण्यासाठी पुणे स्थानकात प्रवाशांची गर्दी आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे, बोगस तिकीट विक्रेते किंवा इतरही काही अनुचित प्रकार होऊ नये. यासाठी लोहमार्ग पोलिसांची नियुक्ती केली जाते. मात्र, काहीजण नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाल्या. त्यावरून या अंमलदारांकडून त्यांची जबाबदारी पार पाडली जात नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी कर्मचाऱ्यांची खडकी येथील पुणे लोहमार्ग पोलीस मुख्यालयात बदली केली आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरून गावाकडे निघालेल्या परप्रांतीय प्रवाशांच्या जवळील पैसे जबरदस्तीने काढून घेतले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला होता. मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आंदोलनही केले होते. त्यानंतर आता पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील तब्बल 22 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांना खडकी मुख्यालयात हजर होण्यास सांगण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या बदलीनंतर पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात नवीन 50 कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

याविषयी अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील म्हणाले, प्रवाशांच्या लुटीशी लोहमार्ग पोलिसांचा संबंध नाही. मात्र, रेल्वे स्थानकात विविध गुन्ह्यात यापूर्वी २३ तोतया पोलिसांवर लोहमार्ग पोलिसांनी कारवाई केली आहे. हेच लोक किंवा अशा प्रवृत्ती वारंवार गुन्हे करत असण्याची शक्यता आहे. या प्रकारांना अटकाव करू न शकल्याने २२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा, मुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबई : मराठा(Maratha) समाजाच्या आरक्षणासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांसोबत राज्यपालांची(Governor) भेट घेतली. केंद्र व राष्ट्रपतींना (Presidents)विनंती करण्यासाठी राज्यपालांची भेट

Read More »
rickshaw-drivers-Start-Jugaad-Ambulance

पुण्यात रुग्णांसाठी धावून आली ‘जुगाड अँब्युलन्स’

पुणे, कोरोनाच्या वाढत्या भयानक परिस्थितीमुळे आरोग्य (Health)यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. एकीकडे ऑक्सिजनची(Oxygen) कमी आहे. तर दुसरेकडे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सची(Ambulance) व्यवस्था करणेही

Read More »
Kali Mati

‘काळी माती’ चित्रपटाला 135 दिवसांत 159 विक्रमी पुरस्कार

हेमंतकुमार (Hemantkumar)महाले दिग्दर्शित-निर्मित काळी माती या चित्रपटाने (Cinema)केवळ 135 दिवसांत (Days)159 पुरस्कारांवर (Awards) मोहोर उमटवली आहे. हा एक प्रकारचा जागतिक विक्रम असल्याचा दावा यावेळी दिग्दर्शक

Read More »
Mucormycosis

विदर्भात म्युकरमायकोसीस आजाराचा शिरकाव

अमरावती : राज्यात कोरोनाचा(corona) कहर किंचित प्रमाणात कमी होताना दिसत आहे. म्हणून काही दिवसात राज्याला दिलासा मिळेल अशी आशा असतानाच एका वेगळ्या आजाराने पुन्हा डोके वर

Read More »
infections in children

पुण्यात लहान मुलांना सर्वाधिक कोरोनाची लागण

पुणे : कोरोनाच्या(Corona) तिसर्‍या लाटेमुळे लहान मुलांमध्ये संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज्यातील काही बालरोग

Read More »

कोंढव्यातील दोन बड्या बेकायदेशीर इमारती होणार जमिनदोस्त

पुणे,  कोंढवा (Kondwa) परिसरात क्लोवर हायलॅंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून (Clover Highlands Cooperative Society) बांधलेल्या दोन 22 मजली इमारती जमिनदोस्त करण्याचा आदेश पुणे सिव्हील कोर्टाकडून (Civil Court)

Read More »