घर बसल्या किल्ल्यांची सफर करू या.

घर बसल्या किल्ल्यांची सफर करूयात . संपूर्ण व्हिडिओ बघा.

Scottish Edge, Fort Lingana, Wazir Cone Jeevdhan Fort, Jeevdhan Fort, Ratangad Fort, Padmadurg Fort, Kamalgad Fort, Kenjalgad Fort, Rajgad Fort, Bhairavgad, Dhak Bahiri, Fort Malhargad, Sandhan Dari, Rohida Fort, Bhuikot Fort, Torna Fort, Tikona Fort, Kalsubai Peak, Tung Fort, Korigad Fort, Paranda Fort, Hudsar Fort, Kalavantin Fort, Chavand Fort,

1) स्कॉटिश कडा किल्ले हरिहर (ड्रोन शूटिंग)-

हरिहर किल्ला किंवा हर्षगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो.ह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे. मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळतो. हरिहरचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे चढायला कातळपायऱ्या आहेत. चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो. काठावर हनुमानचे मंदिर व बाजूला चौथऱ्यावर महादेवची पिंड व नंदी आहेत. आजूबाजूला ४ ते ५ पाण्याने भरलेल्या कातळटाक्या दिसतात. डावीकडे खाली उतरून तटापर्यंत जाता येते. या किल्ल्याला चौफर बेलाग कातळकडा आहे. पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रम्हगिरी दिसतात. दक्षिणेकडे वैतरणा खोरे आहे. गिर्यारोहणप्रेमींकरता हा एक पर्याय आहे.[१] इतिहास : हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुन:स्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्लासुद्धा जिकला.

2) स्वराज्याचे कारागृह, किल्ले लिंगाणा (ड्रोन शूट)
लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे.माणगडसोनगडमहिन्द्रगड, लिंगाणा, कोकणदिवा हे किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या घाटवाटांवर पहारे देतात. कावळ्या, बोचेघोळ, निसनी, बोराटा, सिंगापूर, फडताड, शेवत्या, मढ्या अशी घाटांची नावे आहेत. या वाटांवरून सह्याद्रीवरून खाली कोकणात उतरता येते. बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे. आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा त्याचा सुळका आहे.लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांचे दरम्यान आहे. लिंगाण्याचे खडक २९६९ फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे, बाकी फक्त काही हौद व धान्य कोठाराच्या खुणा शिल्लक आहेत.

3) वजीर सुळका (ड्रोन शूट)-ठाणे जिल्ह्यात शहापूरच्या माहुली किल्ला परिसरातला हा सुळका असून चढाईसाठी अतिशय अवघड असं सुळका आहे. ही जागा पाहूनच जिथं सर्वसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकतो तिथं या वजीर सुळक्याची चढाई करणं याची कल्पनाही करणं अशक्य आहे.वजीर सुळक्याची उंची 200 फूट असून, माहुली किल्ला हा समुद्र सपाटीपासून दोन हजार आठशे फूट आहे.घनदाट जंगल व खोल दर्या यामुळे हा प्रदेश अत्यंत निसर्गरम्य आहे.

4) जीवधन किल्ल्याचा सक्खा शेजारी, वानरलिंगी सुळका (ड्रोन शूट)-महाराष्ट्रातील वानरलिंगी सुळका भल्या भल्या गिर्यारोहकांना आवाहन देणारा कडा आहे. जमिनीपासून सुमारे ४५० मीटर उंच असलेला हा सुळका सरळ ९० अंश कोनात ताठ मानेने उभा आहे. या सुळक्याची गणना गिर्यारोहण क्षेत्रात अतिकठीण श्रेणीत केली जाते. त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठीसुद्धा वांद्रे गावातून तीन तासांची अतिशय दमछाक करावी लागते.

5) किल्ले जीवधन (ड्रोन शूट)-घाटघर च्या परिसरात असलेला हा पूर्वमुखी किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जीवधनच्या पायथ्याचे गांव म्हणजे घाटघर. बांबूची बने हे या गावचे वैशिष्टय !कल्याणअहमदनगर मार्गे नाणेघाट चढून गेल्यानंतर एक पठार लागते. या पठाराच्या उजव्या बाजूला जाणारी वाट व वानरलिंगी नजरेसमोर ठेऊन चालत रहावे. वाटेत दोन ओढे लागतात व त्यानंतर उभी कातळभिंत. या भिंतीला चिटकून उजव्या हाताला असणारी वाट गडाच्या पश्चिम दरवाजाकडे जाते. इ.स. १८१८च्या युद्धात इंग्रजांनी ही वाट चिणून काढली व पश्चिम दरवाजाची वाट बंद केली. वानरलिंगीची ही वाट नावाप्रमाणे वानरयुक्त्या करुनच पार करावी लागते. ही वाट अवघड आहे, त्यामुळे जरा जपूनच चढावे.

6) किल्ले रतनगड (ड्रोन शूट)-रतनगड (डोंगरी किल्ला )हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.रतनवाडीपासून ६ किलोमीटर अंतरावर, भंडारदऱ्यापासून २३ किमी, पुण्यापासून १८३ किमी आणि मुंबईपासून १९७ किमी अंतरावर असलेल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील रतनवाडी गावात हा प्राचीन किल्ला आहे. रतनगड हे महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि भंडारादरा येथील पर्यटन प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे. किल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते डिसेंबर हा आहे.हा किल्ला समुद्रसपाटीपासून ४२५० फूट उंचीवर आहे. रतनगडचा किल्ला शिवाजी महाराज यांनी वापरला होता.किल्ल्याला पुणे, साम्रद, कोकण आणि त्र्यंबक ही चार प्रवेशद्वारे आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील सामरद या गावातून पुढे दीड ते दोन किमी अंतरावर, भंडारदरा भागाच्या पश्चिम बाजूला सांदन दरी आहे. पावसाळ्याचे चार महिने वगळता वर्षभर इथे गर्दी असते.संदन दरीतली वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही. समोर आजोबा पर्वत, रतन गड आणि मागे अलंग-मदन-कुलंग गड आणि कळसूबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही संदन दरीची सैर करणे एक स्मरणीय अनुभव आहे . आशिया खंडातील क्रमांक दोनची खोल दरी असा या दरीचा लौकिक असल्याचे सांगितले जाते.


7) किल्ले पद्मदुर्ग (ड्रोन शूट)-

मुरूडच्या सागर किना-यावरून पश्चिमेला समुद्रात एक किल्ला दिसतो तोच पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला.  मुरुड जंजिरा पहाण्यासाठी आलेले पर्यटक सहसा पद्मदुर्ग पहाण्यासाठी जात नाहीत, कारण जंजी-याला जाण्यासाठी ज्याप्रमाणे बोटी सहज उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे पद्मदुर्ग ला जाण्यासाठी बोटी सहज मिळत नाहीत.  त्यासाठी मुरुडहून खाजगी होडी करून या किल्ल्यावर जावे लागते.छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आजही सुस्थितीत उभा आहे. शिवरायांच्या शब्दात सांगायचे तर ” पद्मदुर्ग वसवून राजापूरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापूरी किली आहे”.  असा हा सुंदर किल्ला एकदा तरी वाकडी वाट करून पहावा असा आहे.


8) किल्ले कमळगड (ड्रोन शूट)-कमळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. याचे नाव काहीजण कमालगड असे उच्चारतात आणि तसेच लिहितात.महाबळेश्वरच्या डोंगररांगांनी अनेक ऐतिहासिक गड अलंकारासारखे धारण केले आहेत. वाई परगण्यातील एक उत्तुंग गिरिदुर्ग आहे, जावळी मोहिमेच्या अगोदर हा गड छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात घेतला, नंतर च्या काळात सतत हा गड पायदळ सेनानी पिलाजी गोळे यांच्याकडे असल्याची नोंद सापडते.छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात सुद्धा हा गड स्वराज्यात होता अन किल्लेदार हे पिलाजी गोळे असल्याचे पुरावे सापडतात


9) किल्ले केंजळगड (ड्रोन शूट)-केंजळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.केंजळगड हा कृष्णा आणि नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यातील एका डोंगरावर आहे. एका बाजूला धोम येथे कृष्णा नदीवर धरण आहे, तर दुसरीकडे नीरा नदीवर देवघर येथे धरण व जवळच रायरेश्वराचे पठार आहे. .त्या पठारावर जाण्यासाठी असलेल्या वाटांची नावे : गणेशदरा, गायदरा, या सोप्या वाटा; आणि कागदरा, लोह्दरा, वाघदरा, सांबरदरा, सुणदरा ह्या अवघड वाटा. केंजळ किल्ल्याकडून रायरेश्वराकडे जाताना वाटेत सुणदरा आहे. सध्या तेथे शिडी लावली आहे. ती वाट चढून रायरेश्वरावर गेल्यावर ती वाट किती अनोखी आहे ते कळून येते. ‘रायरेश्वर’ महादेवाचे देऊळ तेथे आहे.


10) किल्ले राजगड (ड्रोन शूट)-इतिहास -राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे. डोंगराला किल्ल्याचे स्वरुप गौतमीपुत्र सातकर्णी याने दिले. बहुधा सन १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले. मराठेशाहीची २५ वर्षे राजधानी याव्यतिरिक्त सदर किल्ल्यावर शिवाजीमहाराजांनाचे धाकटे चिरंजीव राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून, हा बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली.

11) थरारक मोरोशीचा भैरवगड (ड्रोन शूट)-हजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर! आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर यावी इतकी खोली, सकाळी अकरा वाजताही सूर्यकिरणे अडवली जातील अशा डोंगरांचा शेजार! त्याच्या एका बाजूला सरळसोट भिंत आणि दुसर्‍या बाजूच्या पोटात कोरलेली वेडीवाकडी कातळवाट! त्या भिंतीखाली थोडंस मोकळं पठार, त्याखाली बर्‍यापैकी उताराच्या वाटा आणि पायथ्याला वळसा मारून माळशेजकडे जाणारा कल्याण-नगर रस्ता! – भैरवगड या वर्णनापेक्षाही अधिक काहीतरी आहे!

12) धाक बहिरी (ड्रोन शूट)-लोणावळ्याच्‍या उत्‍तर दिशेला दहा मैल अंतरावर राजमाची आहे. त्‍याभोवती असलेल्‍या निबिड अरण्‍यात बहिरी डोंगरावर ढाकचा किल्‍ला उभा आहे. तो किल्ला म्‍हणजे दक्षिणोत्तर पसरलेला अजस्त्र डोंगर आहे. तो किल्‍ला फारसा परिचित नाही. ढाकचा बहिरी याचा अर्थ ढाकचा किल्‍ला. त्‍या डोंगरात वसलेला आदिवासींचा देव बहिरी. त्‍याच्‍या नावावरून तो किल्‍ला ‘ढाकचा बहिरी’ या नावाने ओळखला जाऊ लागला. त्‍या किल्‍ल्याला ‘गडदचा बहिरी’ असेही म्‍हणतात. गडद या शब्दाचा अर्थ गुहा. त्‍या किल्‍ल्‍यावर कातळाच्‍या पोटात खोदलेल्‍या पश्चिमाभिमुख गुहा आढळतात.

13) किल्ले मल्हारगड (ड्रोन शूट)-मल्हारगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून ‘मल्हारगड’ प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा आहेत. दुसरी डोंगररांग ही पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेवर आहेत. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला ‘सोनोरी’ म्हणूनही ओळखले जाते. पुण्यापासून मल्हारगड सुमारे ३५ किलोमीटर दूर आहे. 

14) सांधण दरी (ड्रोन शूट)-एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 कि.मी लांबवर पसरलेली आहे.पावसळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते.कारण पावसाच पाणी याच दरीतुन खाली कोसळत.त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा.दरीतील ऊन-सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो.दरीत गेल्यावर दोन पाण्याचे पुल लागतात.पहिला पुल २-४ फुट अन दुसरा पुल ४-६ फुट पाण्यात असतो.

15) किल्ले रोहिडा (ड्रोन शूट)-सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहिडेश्वर’. रोहीडखोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसलेले आहे. या खोऱ्यात ४२ गावे होती. त्यापैकी ४१ गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात. रोहिडेश्वर किल्ला हे रोहीड खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. रोहिडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहिडेश्वर किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे देखील संबोधले जाते.

16) पारवाडीचा भुईकोट किल्ला (ड्रोन शूट)-१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली. मोगल बादशहा शाहजहानने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगर काबीज केले. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला, तर इ.स. १८०३ साली ब्रिटिशांनी अहमदनगरवर विजय मिळवला.

17) किल्ले तोरणा-तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील डोंगरी किल्ला आहे.तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, त्यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. पुण्याच्या नैर्ऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये १८.२७६ उत्तर अक्षांश व ७३.६१३ पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. या गडाच्या दक्षिणेला वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. या गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. पुण्यापासून रस्त्याने तोरण्यापर्यंतचे अंतर ६० कि.मी. आहे.


18) किल्ले तिकोना-तिकोना हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण ६० कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० फूट उंच आहे. या किल्ल्यावरून ३-४ कि.मी. अंतरावरील तुंग किल्ला दिसतो. किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले आहे .

19) कळसुबाई शिखर-कळसूबाई हा अकोला तालुक्यातील, अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्राचा सर्वोच्च शिखर असलेला पर्वत आहे. उत्तरेकडील सह्याद्री पर्वत रांगेतील कळसबाई शिखराची उंची 1646 मीटर (किंवा 5400 फीट्स) आहे. हे सर्वप्रथम महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. कळसूबाई शिखर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहेत.

20) किल्ले तुंग- तुंग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. ११ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तुंग हा एक किल्ला होता.या गडावर जाणार्‍या सर्व वाटा पायथ्याच्या तुंगवाडीतूनच जातात. या वाडीतून गडावर जाण्यास साधारणत: ४५ मिनिटे लागतात. गडमाथा तसा लहान असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो.


21) किल्ले कोरीगड- कोरीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३०५० फूट उंच आहे. गडाला चहूबाजूंनी तटबंदी आहे. दक्षिणेकडे बुरुजांची चिलखती तटबंदी आहे. कर्नाळामाणिकगडप्रबळगडमाथेरानमोरगडराजमाचीतिकोनातोरणा, मुळशीचा जलाशय असा बराच मोठा प्रदेश या गडावरून दिसतो.

22) किल्ले परांडा-हा किल्ला केव्हा बांधला गेला याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत परंतु असे समजले जाते की बहामनी सुलतानांचा वजीर महमूद गवानने हा किल्ला सुमारे १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला.इ.स. १५९९ मध्ये मुघल सैन्य अहमद नगर च्या निजाम शहाला हरवण्यात यशस्वी ठरले. जरी मुघल जिंकले असले तरी निजाम शाहीच्या सरदारांनी वयाने लहान अशा मुर्तुजा निजाम शहाच्या नावाने राज्य चालविण्याचा निर्णय घेतला आणि नवीन राजधानी म्हणून अहमद नगर च्या आग्नेयेला सुमारे ८० मैलांवर असलेल्या परंडा किल्ल्याची निवड केली.[२]काही कालावधीसाठी परंडा राजधानी राहिली.इ.स. १६३० च्या सुमारास हा किल्ला शहाजी महाराजांच्या ताब्यात होता नंतर पुन्हा तो मुघलांकडे गेला 

23) किल्ले हडसर-हडसर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका असाच गडकिल्ल्यांनी नटलेला आहे. हडसर हा असाच या भागातील सुंदर किल्ला आहे. नाणेघाटापासून सुरुवात करून जीवधन,चावंडशिवनेरीलेण्याद्रि, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी रांगच आहे. आता गेल्या २१ डिसेंबर २०२०, रोजी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने किल्ले हडसर वरती लोकसहभागातुन भव्य असे महाद्वार लावण्यात आले आहे, आणि प्रचंड अश्या सोहळ्यात,मान्यवरांच्या हस्ते लोकाअर्पण करण्यात आले आहे.


24) किल्ले कलावंतीण दुर्ग (ड्रोन शूट)-किल्याचे नाव : कलावंतीण माची  उंची : २२५० फूट जाण्याचा मार्ग : पनवेल – शेऊंड फाटा -ठाकूरवाडी-प्रबल ळमाची बघण्यासारखे : कलावंतीणचे अखेरचे टोक , प्रबळगडची पसरलेली डोंगररांग माथ्यावरून दिसणारा दक्षिणेकडील बळगडाचा माथा,इरशाळगड,मनेकगड,पूर्वेकडे माथेरान डोंगर,उत्तरेकडे चंदेरी,उत्तर-पश्चिमेकडे पेबचा किल्ला,पश्चिमेकडे मुंबई शहर असा चौफेर मुलुख.  कलावंतीन दुर्ग महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील प्रबलगड किल्ल्याजवळ, पश्चिम घाटात स्थित असून ते एक 2,250 फूट (686 मीटर) उंच शिखर आहे.हे शिखर कलावंतीनीचा सुळका किंवा कलावंतीन शिखर म्हणून देखील ओळखले जाते हे एक लोकप्रिय दुर्गारोहण स्थान आहे. दुर्ग कलावंतीण हा मुंबई-पुणे गतिमार्गावरून पुण्याकडे जाताना पनवेलच्या पूर्वेला माथेरानच्या रांगेत असलेला एक डोंगरवजा किल्ला आहे

25) किल्ले चावंड (ड्रोन शूट)-चावंड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. जुन्नर तालुका हा पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील तालुका आहे. या तालुक्यामधून कुकडीनदी वाहते म्हणून याला पूर्वी कुकडनेर (कुकड मावळ) असेही नाव होते. या कुकडीनदीच्या उगमाजवळ चावंडचा किल्ला आहे. याला चावंडगड उर्फ प्रसन्नगड असेही नाव आहे. या किल्ल्याचा उल्लेख जुंड म्हणूनही आलेला आहे. चावंड हा किल्ला स्थानिक महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता.

2 thoughts on “घर बसल्या किल्ल्यांची सफर करू या.”

  1. Pingback: 'देशाच्या राजाची गादी कायम राहील, तर पृथ्वीवर येणार मोठं संकट', |

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट यांच्या वतीने 300 लोकांना पुरेल एवढं राशन

हडपसर, ” कारोना पाठोपाठ आलेल्या निसर्गाच्या प्रकोपाला पुन्हा एकदा पुण्यातील डॉक्टर पुढे सरसावले आहेत यामध्ये पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट ,पुणे यांच्या

Read More »

आश्रमशाळेतील इ. 8 वी ते 12 वी चे वर्ग 2 ऑगस्ट पासून होणार सुरु

नाशिक, ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.            कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार

Read More »
agralekh

प्रशासनाचा वृद्धांसाठी स्वतंत्र कक्ष दिलासा देणारा ठरावा

पूर्वी म्हातापणाची काठी म्हणून मुलांकडे पाहिले जात होते. काळ बदलला, एकत्र कुटुंब पध्दत जावून काळच्या गरजेनुसार विभक्त कुटुंब पध्दतीचा स्विकार केला गेला. तर काही कुटुंबात

Read More »

हडपसर-सासवड रस्त्यावर दुचाकी-ट्रकच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

पुणे, प्रतिनिधीहडपसर-सासवड रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरून ट्रकखाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंतरवाडीजवळील हॉटेलसमोर शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) रोजी झाला. ट्रकचालकाला ताब्यात

Read More »

‘या’ शाळेत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने मैत्रीदिन साजरा

पुणे, प्रतिनिधी आपल्या देशात रोज कोणता ना कोणता दिन ‘खास’ दिन म्हणून साजरा केला जातो. आज अमका दिन उद्या फलाणा दिन सरकारतर्फे किंवा खासगीरीत्या साजरा

Read More »

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची कर्जमुक्ती व वीजबिल माफी हवेत- विठ्ठल पवार राजे

नवी दिल्ली,केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती आणि वीजबिलमाफीची घोषणा केवळ राजकीय फायद्यासाठी केली होती. त्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे,

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place