विकासआराखडा पीएमपआरडीएकडे, तर गावे पालिकेत समाविष्ट का केली

पुणे, प्रतिनिधी

उपनगरालगतच्या ग्रामस्थांनी नव्हे, राजकारण्यांनी पुणे महापालिकेत जाण्यासाठी चंग बांधला होत. त्याप्रमाणे त्यांनी ११ आणि त्यानंतर २३ गावे समाविष्ट करून इप्सित साध्यही केले. मात्र, तेथील विकास आराखडा आणि बांधकाम परवानग्यांचे अधिकार पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडेच देणे हा शुद्ध बावळटपणाचा कळस आहे. हेच करायचे होते, तर ही गावे पालिकेत आणायची गरजच काय होती? त्यामागील कारण सगळ्यांनाच कळून चुकले आहे. देशातील आकाराने मोठी महानगरपालिका अशी शेखी मिरवण्यापलीकडे या समावेशाचा फारसा काही फायदा होणार नाही, हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. त्याचा फायदा झाला, तर राजकीय पक्षांना होईल.

नव्याने आलेल्या गावांतून आपले अधिक नगरसेवक निवडून आणायचे आणि पालिकेत सत्ता स्थापन करायची, हा मूळ उद्देश आहे. बाकी या गावांचे भले होण्याची सुतराम शक्यता दिसतनाही. ‘कालचा गोंधळ बरा होता,’ अशीच त्या गावकऱ्यांची कायमची भावना असणार आहे. हे सांगण्यासाठी यापूर्वी १९९७ साली पालिकेच्या हद्दीत आलेल्या गावांचा विकास पाहिला, तर उत्तर सहज सापडेल. आजही हडपसरलगतच्या गावात टँकरने पाणीपुरवठा होत असून, विकासाचा दर पाहण्यासाठी दुर्बिणच घ्यावी लागणार आहे.

महापालिकेत समाविष्ट केलेल्या गावांमधून पालिकेला जे काही उत्पन्न मिळणार आहे, त्यापेक्षा अधिक तेथे खर्च रस्ते, कचरा, पाणी, मैलापाण्याची व्यवस्था, शिक्षण, आरोग्य आदी करण्यासाठी पैसे हवेत. त्यासाठी उत्पन्नाचे मार्ग खुंटले आहेत. जकातीमधून पालिकेला सर्वात जास्त उत्पन्न मिळत होते. जकात रद्द झाल्यापासून राज्यातल्या सगळ्याच पालिकांच्या वाटय़ाला आर्थिक वनवास आला आहे. बांधकाम शुल्क हा सध्याचा सर्वात मोठा स्रोत. त्या खालोखाल सर्वसाधारण कर. या तुटपुंज्या उत्पन्नात नव्या गावांचे करायचे काय? असा प्रश्न उभा ठाकला आहे. म्हणजे खर्च करायचा पालिकेने, पण उत्पन्न घेणार प्राधिकरण. हा असला उफराटा कारभार आजवर कधी झाला नाही. परंतु तो झाला, याचे कारण त्यामागे शुद्ध राजकीय हेतू आहेत.

उपनगरालगतच्या गावांमध्ये आधीपासूनच बिल्डरांनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. तेथे त्यांना इमले बांधायचे आहेत. नव्या विकास आराखडय़ात त्यांच्या सगळ्या जमिनी निवासी कारणासाठीच राखून ठेवणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी वाटेल तो व्यवहार करण्यास सगळे तयारही असतील. प्रश्न एवढाच आहे, की पालिकेचे बांधकामाचे नियम आणि प्राधिकरणाचे नियम वेगवेगळे असल्याने नव्याने निर्माण होणारा अभूतपूर्व गोंधळ नंतरच्या काळात भोगावा लागणार आहे. तो भोगण्यासाठी या नव्या गावांतील नागरिकांनी सज्ज राहायला हवे.

महापालिकेत सत्ता मिळण्याने नेमके काय होते? नागरिकांची कामे करता येतात. शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न करता येतात. सामान्य नागरिकाच्या जगण्यात किमान सुख निर्माण करण्यासाठी हातभार लावता येतो… हे सगळे खरे आहे, असे वाटणारा एकही नगरसेवक तुम्हाला सापडणार नाही. जे काही होते, ते कोणत्यातरी कारणाने घडते. त्यालाच विकास म्हणण्याची सध्या पद्धत आहे. ही नवी गावे पालिकेत समाविष्ट करायची आणि तेथील विकासाचे अधिकार मात्र प्राधिकरणाला द्यायचे, हा निर्णय यासाठीच चुकीचा आहे. त्याला उत्तर कसे द्यायचे, हे ज्याचे त्याने ठरवावे. निदान पुढील वर्षी येणाऱ्या निवडणुकांपर्यंत तरी सगळ्यांना थांबावेच लागणार आहे!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट यांच्या वतीने 300 लोकांना पुरेल एवढं राशन

हडपसर, ” कारोना पाठोपाठ आलेल्या निसर्गाच्या प्रकोपाला पुन्हा एकदा पुण्यातील डॉक्टर पुढे सरसावले आहेत यामध्ये पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट ,पुणे यांच्या

Read More »

आश्रमशाळेतील इ. 8 वी ते 12 वी चे वर्ग 2 ऑगस्ट पासून होणार सुरु

नाशिक, ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.            कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. याकाळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार

Read More »
agralekh

प्रशासनाचा वृद्धांसाठी स्वतंत्र कक्ष दिलासा देणारा ठरावा

पूर्वी म्हातापणाची काठी म्हणून मुलांकडे पाहिले जात होते. काळ बदलला, एकत्र कुटुंब पध्दत जावून काळच्या गरजेनुसार विभक्त कुटुंब पध्दतीचा स्विकार केला गेला. तर काही कुटुंबात

Read More »

हडपसर-सासवड रस्त्यावर दुचाकी-ट्रकच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

पुणे, प्रतिनिधीहडपसर-सासवड रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरून ट्रकखाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंतरवाडीजवळील हॉटेलसमोर शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) रोजी झाला. ट्रकचालकाला ताब्यात

Read More »

‘या’ शाळेत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने मैत्रीदिन साजरा

पुणे, प्रतिनिधी आपल्या देशात रोज कोणता ना कोणता दिन ‘खास’ दिन म्हणून साजरा केला जातो. आज अमका दिन उद्या फलाणा दिन सरकारतर्फे किंवा खासगीरीत्या साजरा

Read More »

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची कर्जमुक्ती व वीजबिल माफी हवेत- विठ्ठल पवार राजे

नवी दिल्ली,केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती आणि वीजबिलमाफीची घोषणा केवळ राजकीय फायद्यासाठी केली होती. त्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे,

Read More »

Rajyasabha Members​

Loksabha Members

Famous Place